कचरा व्यवस्थापन संदर्भात बेलापूर बु ग्रामपंचायत येथे बैठक संपन्न
बेलापूरःबेलापूर-ऐनतपूर गावाची लोकसंख्या मोठ्याप्रमाणात वाढत आहे.भविष्यात वाढत्या नागरीकरणामुळे कच-याच्या विल्हेवाटीची समस्याही वाढणार आहे.यादृष्टिने उपाययोजना म्हणून ओल्या व सुक्या कच-याचे स्वतंञ संकलन करुन भविष्यात त्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यासंदर्भात बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे ,सरपंच मीना साळवी,उपसरपंच चंद्रकांत नवले, ग्रामपंचायत आधिकारी निलेश लहारे,कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे शशिकांत दुशिंग,प्रेरणा ठाणगे,अनिता पाचपिंड,अॕड.अविनाश साळवी आरोग्य विभागाचे दत्ताञय वक्ते,अविनाश शेलार यांची संयुक्त बैठक झाली. सदर बैठकीत वाढत्ती लोकसंख्या व नागरीकरण गृहित धरुन मागील काळात कचरा व्यवस्थापनाबाबत काहिच उपाययोजना करण्यात आली नाही.त्यामुळे दुर्गंधी तसेच आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.याचा सारासार विचार करुन राज्याचे जलसंपदामंञी तथा जिल्ह्याचे पालकमंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.यांनी ग्रामपंचायतीस शेतीमंडळाची जी जमीन दिली आहे तिथे कचरा डंपींग यार्ड केले जाणार आहे. गावातील ओला व सुका कचरा स्वतंञपणे सकलित करुन गौळा करण्याचे नियोजन केले जाणार आहे.यासाठी नागरिकांनी ओला व सुका कचरा, पिशव्या ,पाण्याच्या बाटल्या,कॕरीबॕग्ज,भाजीपाला आवशेष स्वतंञपणे जमा करुन ठेवावेत. ओल्या कचऱ्या मध्ये प्लास्टिक मिसळले गेल्यास कचऱ्याचे विघटन होत नाही व दुर्गंधी वाढून आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.त्यामुळे नागरिकांनी याबाबत दक्षता घेवून सहकार्य करावे.ओला व सुका कचरा घंटा गाडीत स्वतंत्र पणे जमा करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.हा जमा झालेला कचरा नियोजित डंपिंग यार्ड येथे टाकून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे.यासाठी महिला बचत गट,अंगणवाडी कर्मचारी,आशा सेविका व ग्रामपंचायत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.यामुळे नजिकच्या काळात कचरा विल्हेवाटिची मोठी समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.अशातहेने कचरा व्यवस्थापनावर बैठकीसत सविस्तर चर्चा करण्यात आली.
Post a Comment