श्रीरामपूर बाजार समितीचा 16 कोटींचा अर्थसंकल्प - सभापती सुधिर नवले पा.
श्रीरामपूर (प्रतिनिधी ) माजी आ. भानुदास मुरकुटे व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्या अधीपत्याखालील श्रीरामपूर तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीने पुढील आर्थिक वर्ष 2025- 26 या आर्थिक वर्षासाठी 16 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे, अशी माहिती सभापती सुधिर नवले पा. यांनी दिली आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पाप्रमाणे 5 कोटींचे एकुण उत्पन्न अपेक्षित आहे. त्यानुसार 1 कोटी 38 लाखांचा वाढावा होणार आहे.यंदाच्या अर्थसंकल्पात 8 कोटी 70 लाख रुपयांची विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत.त्यात श्रीरामपूर नगर परिषद रोडलगत 5 कोटी खर्चाच्या भव्य शेतकरी मॉलमध्ये शॉपिंग सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे.शेती महामंडळाची जमीन अधिग्रहण करण्यात येणार आहे.
श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालय समोरील मुख्य रस्ता तसेच बेलापूर व टाकळीभान येथील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, टाकळीभान येथे नवीन पेट्रोल पंपाची उभारणी, श्रीरामपूर येथील मुख्य बाजाराच्या आवारात साठवण टाकी अंतर्गत पाईपलाईन करणे व नियोजित डाळिंब मार्केट आदी कामे हाती घेतली आहेत, असेही नवले यांनी सांगितले.
त्यांनी पुढे सांगितले की, सध्या श्रीरामपूर येथील मुख्यालयाच्या आवारात कांदा मार्केटमध्ये 2 कोटी खर्चाच्या रस्त्याचे काँक्रिटिकरण,दिड कोटी रुपये खर्चाच्या 15 गाळ्यांचे पूर्णत्वाकडे आहेत.बेलापूर उपबाजारात 60 लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे काँक्रिटिकरण व 12 लाख खर्चाच्या दुकान गाळ्यांची दुरुस्ती तसेच टाकळीभान येथील उपबाजारात साडेनऊ लाख खर्चाच्या दुकान गाळयांच्या दुरुस्तीचे काम सुरु सुरु आहे.
बाजार समितीची सर्व विकास कामे शेतकरी केंद्रास्थानी ठेऊन सुरु आहेत.प्रस्तावित कामांमबरोबरच श्रीरामपूर येथील पेट्रोल पंप आवारात सीएनजी गॅस केंद्र सुरु करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे.संस्थेची 30 एप्रिल 2023 रोजी निवडणूक होऊन आपण 13 मे 2023 पासुन कारभार हाती घेतला असुन संस्थेचा कारभार काटकसरीने आणि पारदर्शी पद्धतीने सुरु असल्याचे सभापती सुधिर नवले आणि सचिव साहेबराव वाबळे यांनी सांगितले.