रयतच्या विद्यार्थ्या च्या 'डायनॅमिक सायकल'ची जिल्ह्यात दखल,अहिल्यानगर येथे झालेल्या जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनामध्ये तृतीय क्रमांक
रयत शिक्षण संस्था, साताराच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालय, कोल्हार बुद्रुक येथील तांत्रिक विभागाचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी समर्थ धनंजय शिरसाठ याने तयार केलेला डायनॅमिक सायकलचा प्रोजेक्ट अहिल्यानगर येथे झालेल्या जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनामध्ये तृतीय क्रमांक मिळाला. या विद्यार्थ्याला तांत्रिक विभागाचे शिक्षक शुभम पवार, ऋषिकेश जाधव, राजेंद्र चव्हाणके, मुख्याध्यापिका संजीवनी आंधळे, प्र. पर्यवेक्षक शब्बीर शेख यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाच्या प्र. मुख्याध्यापिका संजीवनी आंधळे, प्र. पर्यवेक्षक शब्बीर शेख, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव बी. एन. पवार, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष ॲड. सुरेंद्र खडे पाटील, जनरल बॉडी सदस्य रावसाहेब म्हस्के, स्थानिक स्कूल सदस्य बी. के. खर्डे, अजीत मोरे, अशोक आसावा, रविंद्र देवकर, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी नाईकवाडी, श्री. तोरणे यांसह सर्व शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.
Post a Comment