सहयोग सामाजिक मंचच्या कार्यकर्त्यांनी राबविला आगळावेगळा उपक्रम
बेलापूर (प्रतिनिधी)-बेलापूर खुर्द येथील सहयोग सामाजिक मंचच्या वतीने मारुती मंदिर बेलापूर खुर्द येथे भाविकांना बसण्यासाठी दोन बाक त्याचबरोबर बेलापूर खुर्द येथील स्मशानभूमीकरिता दोन बाक व एक तिरडी तसेच शिकळी प्रदान करण्यात आली. बेलापूर खुर्द येथील सहयोग सामाजिक मंच नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असते गावात होणारे निधन व त्यानंतर नातेवाईकांची होणारे धावपळ हे लक्षात घेऊन सहयोग सामाजिक मंचने बेलापूर खुर्द येथील ग्रामपंचायतीला एक तिरडी व शीकळी प्रदान केली तसेच बेलापूर खुर्द येथील मारूती मंदिरात दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांसाठी बसण्याकरता दोन बाक व बेलापूर खुर्द येथील स्मशानभूमीसाठी दोन बाक भेट देण्यात आले. यावेळी सहयोग सामाजिक मंचचे ज्येष्ठ सदस्य पंढरीनाथ बोर्डे ज्ञानदेव महाडिक बाबुराव फुंदे भाऊसाहेब म्हसे जगन्नाथ महाडिक पुंजाहरी सुपेकर गुरुजी नंदकुमार कुर्हे अशोक सुळ अशोक क्षीरसागर सहयोग पुरुष बचत गटाचे अध्यक्ष प्रशांत बडदे उपसरपंच दीपक बारहाते ग्रामपंचायत सदस्य नयनाताई बडदे राणीताई पुजारी ग्राम विकास अधिकारी तुकाराम जाधव निलेश बडदे जगन्नाथ बडदे विलास भालेराव अर्जुन गोरे सुनील बाराते जगन्नाथ बडदे आधीच ग्रामस्थ उपस्थित होते. सहाय्यक सामाजिक सहयोग मंचावतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले
Post a Comment