गावकरी पतसंस्थेला प्रथम क्रमांकाचा कार्यक्षम पतसंस्था पुरस्कार प्रदान
बेलापूर (वार्ताहर)श्रीरामपूर तालुका सहकारी फेडरेशनच्या वतीने पहिल्या गटात गावकरी सहकारी पतसंस्थेला श्रीरामपूर तालुक्यातील सर्वोत्तम कार्यक्षम पतसंस्था म्हणून प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.यावेळी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक व तालुका फेडरेशनचे अध्यक्ष वासुदेव काळे , अनिरुद्ध महाले, याकुबभाई बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड येथील गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्षा सौ.राजश्री पाटील आणि श्रीमंत थोरले बाजीराव पतसंस्थेचे चेअरमन नारायण वाझे यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक चेअरमन साहेबराव वाबळे यांच्यासह संचालक मंडळाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.कार्यक्रमास सर्वश्री संचालक व्हा.चेअरमन रामेश्वर सोमाणी,जालिंदर पा. कु-हे, शशिकांत उंडे, जनार्दन ओहोळ, रावसाहेब अमोलीक,अजीज शेख, कुलकर्णी यांच्यासह व्यवस्थापक व सेवकवृंद उपस्थीत होते. या सुयशाबद्दल सभासद, खातेदार आणि ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
Post a Comment