
दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळीभान या ठिकाणी भेट दिली आसता त्या ठिकाणी वृत्तपत्रात प्रसिध्द झालेली प्रसूती महिलेची झालेले हेडसांड या आशयाच्या बातमीच्या अनुषंगाने भेट दिली असता दोन्ही वैद्यकीय अधिकारी आपल्या कर्तव्यावर हजर नसल्याचे आढळून आले प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये केवळ तीनच कर्मचारी हजर होते परंतु बातमीदार आल्याचे समजतात हळूहळू एक एक जण गोळा होऊ लागले मागील महिन्यात परिसरातील रात्री प्रसुती रुग्ण महिला बेलपिंपळगाव तालुका नेवासा येथून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रसूतीसाठी रात्री साडेनऊ वाजता आल्याचे समजले त्यावेळी त्यांना निवासी सिस्टर यांनी तपासले होते त्यानंतर तिला प्रसूतीला वेळ लागेल व पोटात दुखत असल्यामुळे तिला ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूर या ठिकाणी संदर्भित केले सदर रुग्णाला घेऊन जाण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ॲम्बुलन्स त्यांनी मागणी केली त्यावेळी त्या ठिकाणी ड्रायव्हर उपस्थित होते त्यांनी गाडीची चावी यापूर्वी त्या ठिकाणी काम करत असणाऱ्या स्थानिकप्राथमिक आरोग्य केंद्रात राहणाऱ्या सिस्टर यांच्याकडे स्थानिक वैद्यकीय अधिकारी यांच्या आदेशाने जमा केली असल्याची माहिती मिळाली
या संदर्भात महिला पेशंटच्या नातेवाईकांनी त्यांना विनंती करून देखील त्यांनी अंबुलन्स दिली नसल्याची माहिती वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती त्या ठिकाणी कंत्राटी बेसवरील कर्मचारी ड्रायव्हर यांची ऑर्डर संपलेली होती त्यामुळे त्यांनी रुग्णास ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन जाण्यास नकार दिला त्यामुळे रुग्ण हे गावातील एका व्यक्तीच्या वाहनाने ग्रामीण रुग्णालय पोहोचले त्या ठिकाणी सदर रुग्नेची लगेच प्रसूती झाली नाही तिची प्रसूती ही चवथ्या पाचव्या दिवशी संध्याकाळी झाली असल्याची माहिती पंचायत समिती तालुका आरोग्य अधिकारी डॉकटर मोहन शिंदे यांच्याकडे संपर्क साधला असता मिळाली या वेळी बातमीत सत्यता नसून बातम्या कुठल्याही प्रकारची शहानिशा झाली नाही
असे डॉक्टर शिंदे यांनी सांगितले तसेच या टाकळीभान प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर अनेक वेळा गैर हजर राहतात याविषयी माहिती विचारली आसता या संदर्भात आपण वरिष्ठांना पत्रव्यवहार पूर्वीही वेळोवेळी केल्याचे त्यांनी सांगितले
Post a Comment