जिवनाचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवणे हाच आनंदी जगण्याचा मंञःखंडागळे
बेलापूरःआज माणूस भौतिक सुखाच्या मोहजालात अडकल्याने त्याचे जिवन कष्टमय बनले आहे.यातून बाहेर पडून जगणे सकारात्मक करणे हाच जिवन आनंदी करण्याचा मंञ असल्याचे प्रतिपादन बेलापूर पञकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे यांनी केले. साविञीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आर.बी.एन.बी काॕलेज व स्वामी सहजानंद भारती काॕलेज आॕफ एज्युकेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित शिबिरात "जिवन जगण्याची कला"या विषयावर श्री.खंडागळे प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते.यावेळी प्रा.डाॕबाबासाहेब तोंडे,प्रा.डाॕ.भागवत शिंदे,प्रा.डाॕ जलाल पटेल,प्रा.डाॕ.किरण थोरात,प्र.किर्ती अमोलिक ,प्रा.वैशाली वाघ,प्रा.डाॕ.मेघराज औटी उपस्थित होते. श्री.खंडागळे म्हणाले की,आधुनिक भौतिक साधनांनी मानवी जिवन बदलून टाकले आहे.या साधनांनी मानवी भौतिक सुखी झाला असला तरी तो मानसिक सुखाला पारखा झाला आहे.माणसातील संवाद हरपला असून जगण्यात कृञिमपणा आला आहे.आज पैशाला नको इतके महत्त्व प्राप्त झाल्याने पैशासाठी जिवघेणी स्पर्धा सुरु झाली आहे.या स्पर्धेत ख-या जगण्याची घुसमट होत आहे. जिवन हे अतिशय सुंदर आहे आणि ते आनंदाने कसे जगावे हे आपल्या हाती आहे.आजकाल माणसे चिंता विकत घेतात घेतात.यामुळे तो दुःखी होतो.जगण्यातला विनोदही हरवत चालला आहे.खरे तर विनोद हे अत्यंत चांगले औषध असून विनोदामुळे जगणे सुसह्य होते.विनादामुळे व हसत खेळत राहिल्याने नकारात्मक विचारांना तिलांजली मिळते.कोणतीही हाव न धरता आणि भौतिक साधनांच्या मागे न पळता सकारात्मकतेने जगणे हा आनंदी जीवनाचा मंञ आहे असे श्री.खंडागळे यांनी अनेक मजेदार किस्से सांगून विशद केले त्यास विद्यार्थ्यांनी मनमुराद दाद दिली. प्रा.डाॕ.भागवत शिंदे यांनी अतिथी परिचय करुन दिला , देविदास गावित याने सूञसंचलन केले तर प्रा.डाॕ.किरण थोरात यांनी उपस्थितांचे आभार मानले.यावेळी अध्यापकांसह विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी आदी उपस्थित होते.आज गुरुवार (ता.९)रोजी सकाळी १० वा.शिबिराचा मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे.
Post a Comment