बेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर गावकरी मंडळाच्या सौ. कु-हे यांची बिनविरोध निवड
बेलापूरःबेलापूर बु ग्रामंचायतीच्या उपसरपंच पदावर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील तसेच जि.प.सदस्य शरद नवले व कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्या नेतृत्वाखालील गावकरी मंडळाच्या सौ.प्रियंका प्रभात(केशव) कु-हे यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंच पदासाठी सरपंच स्वाती अमोलिक यांचे अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक संपन्न झाली.बैठकीस मावळत्या उपसरपंच तबसुम बागवान ,अभिषेक खंडागळे,मुश्ताक शेख,चंद्रकांत नवले,उज्वला कुताळ,सुशिलाबाई पवार, मीना साळवी, शिलाताई पोळ,वैभव कु-हे,भरत साळुंके,रमेश अमोलिक आदी सदस्य उपस्थित होते.निर्धारित वेळेत सौ.प्रियका कु-हे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची उपसरपंच पदावर बिनविरोध निवड झाल्याचे ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे यांनी जाहीर केले. निवडीनंतर आभाराच्या सभेत शरद नवले,अभिषेक खंडागळे,जालिंदर कुऱ्हे,भास्करराव खंडागळे,विष्णुपंत डावरे, भाऊसाहेब कुताळ आदिंची भाषणे झाली.याप्रसंगी जालिंदर कु-हे,भाऊसाहेब कुताळ,प्रफुल्ल डावरे,बाळासाहेब दाणी,सुरेश बाबुराव कुऱ्हे,रावसाहेब अमोलिक,सचिन वाघ, रमेश काळे,भाऊसाहेब तेलोरे,अजिज शेख, जब्बार पठाण,अशोक कुऱ्हे,विष्णूपंत कुऱ्हे,शफिक बागवान,बाबुलाल पठाण,प्रशांत मुंडलिक, मास्तर हुडे, हेमंत मुथा,योगेश राकेचा,बाबुराव पवार,महेश कु-हे,विशाल आंबेकर,दादासाहेब कुताळ,रफिक शेख,शशिकांत तेलोरे, सुभाष शेलार,अशोक आंबिलवादे,बाळासाहेब शेलार,पञकार देविदास देसाई,दिलिप दायमा,सोमनाथ शिरसाठ,अभिषेक निर्मळ, नितीन खोसे, प्रकाश साळुंके, राम कुऱ्हे,कान्हा लगे,ग्रामस्थ तसेच यांचेसह गावकरी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment