भारताच्या ग्रामीण भागासह शहरी भागात देखील खो-खो खेळ प्रसिद्ध असून या खेळाचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. आता हा खेळ जागतिक पातळीवर खेळला जाणार असल्याने खो-खो प्रेमींसाठी ही एक पर्वणी असणार आहे. भारताचे पारडे या विश्वकरंडक स्पर्धेत जड वाटत असले तरी शेजारील आशियाई देशांकडून देखील चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. #TheWorldGoesKho हा हॅशटॅग या स्पर्धेसाठी वापरण्यात येत असून नुकतेच शुंभकर म्हणून तेजस आणि तारा यांचे देखील अनावरण झाले आहे.पुरुष आणि महिला यांची एकत्रितपणे होणारी ही स्पर्धा खो-खो खेळाच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरेल यात काही शंका नाही. खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख सुधांशू मित्तल यांनी खो-खो हा खेळ ऑलम्पिक पर्यंत घेऊन जाण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.त्यामुळे या खेळाकडे शाळकरी मुलांसह तरुण वर्ग अजून आकर्षित होईल. भारताचा स्वतःचा असणारा हा खेळ जागतिक स्तरावर खेळला जात असल्याचा आनंद खो-खो प्रेमींमध्ये दिसून येत आहे.
कोण असणार पहिल्या खो-खो विश्वचषकाचा दावेदार,२४ देशांचा सहभाग!!!
गौरव डेंगळे/दिल्ली ५/१/२०२५: सोमवार दि १३ जानेवारी २०२५ पासून भारताची राजधानी दिल्ली येथे पहिली खो-खो विश्वचषक स्पर्धा सुरू होत आहे.यामध्ये एकूण २४ संघांनी सहभाग नोंदवला असून यजमान भारतासह अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भूतान, ब्राझील, इंग्लड, जर्मनी, घाना, इंडोनेशिया, इराण, केनिया, मलेशिया, नेपाळ, नेदरलँड, न्यूझीलंड, पाकिस्तान, पेरू, पोलंड, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, श्रीलंका, युगांडा आणि अमेरिका एवढे देश सहभागी होत आहेत.
Post a Comment