बेलापूर(प्रतिनिधी)-- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने पुणे विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली. या पुरस्कारात उत्कृष्ट अध्यापक पुरस्कारार्थी म्हणून उक्कलगाव तालुका श्रीरामपूर येथील रहिवाशी प्राध्यापक डॉक्टर अतिश श्रीकिसन मुंदडा यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वर्धापन दिन 10 फेब्रुवारी रोजी होत असतो आणि या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राध्यापकांना सन्मानित करण्यात येते. शैक्षणिक वर्ष 2024-25 चा व्यावसायिक महाविद्यालय (ग्रामीण विभाग) उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार उक्कलगाव येथील रहिवासी श्रीकिसन मोतीलाल मुंदडा यांचे चिरंजीव प्राध्यापक डॉक्टर अतिश मुंदडा यांना दिला जाणार आहे. डॉक्टर अतिश मुंदडा हे सध्या चांदवड फार्मसी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत आहे. डॉक्टर आतिश मुंदडा यांचे शालेय शिक्षण उक्कलगाव येथे झाले असून महाविद्यालयीन शिक्षण अमरावती व नागपूर येथे झाले. ते चांदवड महाविद्यालयात सन 2008 पासून कार्यरत आहे आणि या कालावधीत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले तसेच वेगवेगळे संशोधन प्रकल्प सादर केले तसेच त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची दखल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतली असून पुणे विद्यापीठ ग्रामीण विभागातील विविध व्यावसायिक महाविद्यालयाच्या प्राध्यापकांमध्ये प्राध्यापक अतिश मुंदडा यांचे काम सरस ठरल्यामुळे त्यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण 10 फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या प्रांगणात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. प्राध्यापक डॉक्टर आतिश मुंदडा यांनी एका ग्रामीण भागातून खडतर मेहनत घेऊन आपले शिक्षण पूर्ण केले व या मानाच्या पुरस्काराला गवसणी घातली म्हणून त्यांचे विशेष कौतुक होत आहे. या पुरस्काराच्या घोषणेची माहिती चांदवड फार्मसी महाविद्यालयात समजतात महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला तसेच संस्थेचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष बेबीलालजी संचेती यांच्या हस्ते व आमदार डॉक्टर राहुल आहेर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिनी त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या यशात त्यांचे माता पिता सौ लीलाबाई मुंदडा श्री किसन मुंदडा सौ विमल राठी शरद चांडक यांचा मोलाचा सहभाग आहे या यशाबद्दल उक्कलगावचे उपसरपंच नितीन थोरात ग्रामपंचायत सदस्य दिले थोरात शामराव नागरे संजय थोरात पत्रकार देविदास देसाई गोविंद श्रीगोड तसेच बेलापूर पंचक्रोशीतील त्याच्या मित्र परिवाराने आणि नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले.
Post a Comment