खंडाळा येथे रविवारी दुपारी १:०० वाजेच्या सुमारास विजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाले. त्यामुळे ऊस पिकाला आग लागली. यामध्ये शेतकरी नवनाथ गंगाधर ढोकचौळे, रावसाहेब रंगनाथ ढोकचौळे, बबन किसन ढोकचौळे, सागर शंकर सदाफळ या शेतकर्यांच्या शेतातील ऊस व ठिबक सिंचन जळून गेला.या सर्वांची शेती एकमेकाला लागून असून,या सर्वच ८ ते १० एकरामधील क्षेत्रावर उसाचे पीक होते. या ठिकाणी अचानक वीजवाहक तारांमध्ये घर्षण होत उसाला आग लागली. यावेळी प्रवारा कारखान्याचा अग्निशमन बंब बोलावला गेला होता. पण आटोक्यात काय आग आली नाही.गावातील १०० ते २०० युवकांनी देखील आज आग विजवायचा प्रयत्न केला. यावेळी कामगार तलाठी पवार भाऊसाहेब व त्यांचे सहकारी दिलीप रंधे यांनी घटनास्थळी येऊन जळीताचा पंचनामा केला.
दुर्दैवी!आगीमध्ये १० एकर ऊस खाक; शेतकर्यांचे लाखोंचे नुकसान!!श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावची घटना!!!
खंडाळा (गौरव डेंगळे) : खंडाळा येथील चित्तरंजन येथे गट नंबर ५३,५४,५५ शॉर्टसर्किटमुळे रविवार (दि.५ जानेवारी) लागलेल्या आगीत ८ ते १० एकर ऊस खाक झाल्याने शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.या शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळावी,अशी मागणी त्यांनी केली आहे.
Post a Comment