March 2022

श्रीरामपूर प्रतिनिधी:-ग्लोबल मार्शल आर्ट असोसिएशन श्रीरामपूर या संस्थेचे संस्थापक कलीम बिनसाद यांच्या अकॅडमीचे पंचवीस विद्यार्थी हे समता इंटरनॅशनल स्कूल उक्कलगाव याठिकाणी नुकत्याच पार पडलेल्या कराटे या कॉम्पिटिशन मध्ये विजय झाले यांचा सनमान प्रमाणपत्र व गुणगौरव करण्यासाठी श्रीरामपूर येथील मिनी स्टेडियम या ठिकाणी घेण्यात आलेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामपूर तालुक्याचे तहसीलदार मा.प्रशांत पाटील साहेब,मा. नगराध्यक्षा अनुराधाताई अदीक, शहर पोलीस स्टेशनचे ए पीआय बोरसे साहेब, महाराष्ट्र लघु वृत्तपत्र पत्रकार संघाचे शेख बरकत अली, पत्रकार प्रदीप आहेर, मा.अल्तमश पटेल,

आदित्य अदीक, तिरंगा न्यूज व इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्लोबल मार्शल आर्ट असोसिएशन च्या विजयी विद्यार्थ्यांचा या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणगौरव करून त्यांना प्रशस्तिपत्रक व कलर बेल्ट एक्झाम मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बेल्ट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी  मा. तहसीलदार प्रशांत पाटील साहेब यांनी मुलांना व पालकांना मोलाचे मार्गदर्शन करत या क्षेत्रामध्ये मुलांचं करिअर घडतात यापासून शरीर व बुद्धी खूप वाढते यामध्ये कोणी पोलीस मध्ये कोणी तहसीलदार तर कोणी शिक्षक अशा मोठमोठ्या पदावर जाऊ शकतात यामुळे पालकांनी इतक्या लहान वयात मुलांना मार्शल आर्ट या खेळासाठी पाठवून खूप चांगले काम केले आहे आणि कलीम बिनसाद यांनी मुलांना मोबाईल पासून दूर करून या ग्राऊंड वर मार्शल आर्ट या खेळाकडे आकर्षित केले त्याबद्दल कलीम बिनसाद यांचे आपण मनापासून धन्यवाद देतो असे म्हणत त्यांच्या या कामाचे कौतुक केले तसेच यावेळी माननीय नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी या लहान मुलांचे फाईट ,योगा हे करत अस्थानी या मुलांना मॅट ची गरज आहे

आणि हे मॅट आपल्या तर्फे देण्याचे कबुल करत त्वरित आपन ऑर्डर करण्यासाठी प्रशिक्षक कलीम बिनसाद यांना सांगितले संस्थेचे कलीम बिनसाद हे खूप मोठे काम करत आहे आणि हे मुलं माझे संरक्षण करतील असे बोलत मुलांना प्रोत्साहन दिले त्याच पद्धतीने ए पीआय बोरसे यांनी मुलांचे मनोबल वाढवत आपण मुला मुलींचा देखील मोठ्या पदावर या ग्राउंड वर खेळणाऱ्या खेळाच्या बेसवर एक चांगले अधिकारी होऊ शकतात एक चांगला अधिकारी होण्यासाठी ग्राऊंड व फिटनेस खूप महत्त्वाचे असते असे ते म्हणाले व सर्वांनी मार्शल आर्ट च्या सर्व प्रशिक्षक यांना शुभेच्छा दिल्या  यावेळी कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट अजित डोके यांनी केले तर आसलम बिनसाद यांनी आभार मानले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-मासीक बैठक नियमानुसार न घेता आगोदरच सत्ताधारी गटाच्या  सह्या ईतिवृत्तावर घेवुन विरोधकांना गैरहजर दाखविण्याचा चुकीचा प्रकार बेलापुर ग्रामपंचायतीत सुरु असुन तो थांबविण्यात यावा अशी मागणी विरोधी सदस्य रविंद्र खटोड यांनी केली आहे.ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे यांना दिलेल्या निवेदनात माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य रविंद्र खटोड यांनी पुढे म्हटले आहे की बेलापुर ग्रामपंचायतीत सत्ताधारी मन मानेल तसा कारभार करत असुन विरोधकांना विश्वासात न घेता चुकीच्या पध्दतीने कामकाज करत आहेत अशा प्रकारे चुकीचे होणारे कामकाज थांबविण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. बेलापुर ग्रामपंचायतीच्या मासीक बैठकीचे आज दिनांक ३०मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजता आयोजन करण्यात आले होते .मासीक बैठकीसाठी रविंद्र खटोड व भरत साळूंके  सह विरोधी सदस्य ग्रामपंचायत कार्यालयात आले असता  बैठकीची वेळ झालेली असतानाही सत्ताधारी सदस्य हजर नसल्याचे लक्षात येताच खटोड व साळूंके यांनी ईतिवृत्ताची मागणी केली व मासीक बैठकीच्या ईतिवृत्तावर सह्या करण्यासाठी पाहीले असता त्या ईतिवृत्तावर विरोधी सदस्य वगळता सर्वांच्या सह्या असल्याचे लक्षात आहे सदस्य बैठकीला नसतानाही सह्या कशा झाल्या याचे कोडे विरोधकांना उलगडले नाही त्यांनी पत्रकार व इतर कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात बोलविले व सह्या झालेले ईतिवृत्त दाखविले त्या नंतर बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले रविंद्र खटोड भरत साळूंके यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दुरध्वनी केला त्या नंतर सर्व जण तक्रार करण्यासाठी पंचायत समीतीत गेले तेथे त्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना लेखी दिले तसेच सदर बाब ही अतिशय गंभीर असुन त्या बाबत आपण योग्य ती कारवाई न केल्यास गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा ईशाराही खटोड व साळूंके यांनी दिला आहे या बाबत सरपंच महेंद्र साळवी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की बैठकीचे कामकाज नियमानुसारच झालेले आहे मार्च अखेर असल्यामुळे वसुली व इतर कामकाजामुळे बैठक लवकर आटोपती घ्यावी लागली त्या वेळेपर्यत विरोधक आलेले नव्हते परंतु बैठकीचा कोरम पुर्ण झाल्यामुळे बैठक सुरु करुन आटोपती घेण्यात आली असुन विरोधकांचे कामच आहे आरोप करणे परंतु आमचा कारभार स्वच्छ व पारदर्शी असल्यामुळे विरोधकांना तक्रारीस वावच नसल्यामुळे हा खोटा उपद्व्याप केला जात असल्याचे साळवी यांनी म्हटले आहे .

खंडाळा प्रतिनिधी -शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत जवळपास 10-15 एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला. काल दि. 28 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे ही घटना घडली. या आगीचा गावातील चार शेतकर्‍यांना फटका बसला.सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खंडाळा येथील शेतकरी अरविंद डेंगळे, अप्पासाहेब म्हसे, एस. शर्मा, परसराम डेंगळे यांच्या उसाला आग लागली. या आगीत शेतकर्‍यांचा 10 ते 15 एकर क्षेत्रातील ऊस खाक झाला.या घटनेची माहिती मिळताच गणेशनगर सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन बंब त्वरित घटनास्थळी

दाखल झाला. मात्र वार्‍यामुळे आगीची तीव्रता आणखी वाढली. त्यातच अग्निशमन बंबास शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता न मिळाल्यामुळे मदत कार्यात अडथळे आले. त्यामुळे आग आणखी वाढत राहिली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे स्पष्ट झाल्यामुळे नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. यापुर्वी याच महिन्यात येथे आगीची घटना घडली होती. त्यावेळीही सुमारे 10-15 एकर उसाच्या क्षेत्राची हानी झाली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा अशी घटना घडल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 5, रेल्वे स्टेशनसमोर विनापरवाना बेकायदेशिर गावठी कट्टा व जिवंत काडतुस स्वतःजवळ बाळगुन फिरणार्‍या एकास काल पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात आर्मअ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक संजय सानप यांना एक संशयीत इसम हा आपले कब्जात विनापरवाना बेकायदेशिर गावठी कट्टा व जिवंत काडतुस बाळगून रेल्वे स्टेशन समोर वार्ड नं. 5 श्रीरामपूर येथे फिरत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळताच त्यांनी पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी

तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीषक जिवन बोरसे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल रमिजराजा आत्तार यांना कारवाई करण्यासाठी रवाना केले.तपास पथक हे रेल्वे स्टेशन जवळ गेले असता, नमूद बातमीतील वर्णना प्रमाणे एक इसम रेल्वे स्टेशन समोर फिरत असलेला दिसून आला. तपास पथकाला पाहून सदर संशयित इसम पळून लागला. तातडीने या पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करुन त्यास पकडले. सचिन बाळू धुमाळ (वय 30) रा.संभाजी चौक, अशोकनगर, ता. श्रीरामपूर असे या आरोपीचे नाव आहे. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला 25,500 रुपये किमतीचे एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस मिळून आला आहे. त्याप्रकरण पोलीस कॉन्स्टेबल राहुल नहादेव नरवडे यांच्या फिर्यादीवरून गु.र.नं.220/2022 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल लोटके हे करत आहेत.

श्रीरामपूर प्रतिनिधी-पुणे, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर येथून मोटारसायकल चोरी करणार्‍या अट्टल गुन्हेगारांना काल श्रीरामपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणातील दोघा आरोपींना पोलिसांनी काल न्यायालयात हजर केले असताना दोघांनाही दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.श्रीरामपूर येथील अक्षय गाडेकर यांच्याकडून पोलिसांनी नंबर नसलेली मोटारसायकल पकडली. या मोटारसायकलची कोणतीही कागदपत्रे नसल्याने पोलिसांना या गाडीचा संशय आला. त्यांनी अक्षय गाडेकर यास तू गाडी कोणाकडून खरेदी केली याची माहिती घेतली. अक्षय गाडेकर याने मोटारसायकल घेणार्‍याची नावे सांगितली. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय सानप यांना या गुन्ह्यातील मोटार सायकल बाबत गोपनिय माहिती मिळाली. त्यांनी आपल्या सहकार्‍यांना तपासाचे आदेश दिले.शहर पोलीस पथकाने सापळा रचून ज्ञानेश्वर महादेव देवकर रा. नेवासा, नल्ल्या उर्फ आकाश अनिल गायकवाड रा. नेवासा यांना अटक करुन त्यांचेकडून तपास करत होन्डा शाईन कंपनीचे 3

मोटारसायकल, एक हिरो एच.एफ. डिलक्स, एक होन्डा अ‍ॅक्टीवा असे एकूण 5 मोटारसायकल (एकूण किम्मत 3,50,000रुपये). मुद्देमाल जप्त केला आहे. सदर मोटार सायकल पुणे, नाशिक अहमदनगर औरंगाबाद येथून चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. आरोपी ज्ञानेश्वर महादेव देवकर यांचेवर वैजापूर, सांगवी, पुणे ग्रामिण, सोनईे, नेवासो, हडपसर, बदलापूर आदी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधिक्षक, संदिप मिटके, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर शहर पोस्टेचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांचेसह पोलीस निरीक्षक जिवन बोरसे व पोलीस नाईक पंकज गोसावी, पोलीस नाईक रघुवीर कारखेले, पोलीस नाईक एम. के. शेलार, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड, पोलीस कॉन्स्टेबल रमिज आत्तार यांचे पथकाने केली आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - शहर आणि तालुक्यात प्रचंड प्रमाणात अवैध व्यवसाय वाढले आहेत, जुगार,सट्टा,मटका,गुटखा,आकडे गावठी दारु,वाळू तस्करी,भांडणे, दादागीरीने अक्षरशः शहरांसह तालुकाभर रहांकाळ मांडला आहे,याविरुद्ध समाजवादी पक्षाचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी येथील मेनरोडवरील महात्मा गांधी पुतळ्यासमोर दिनांक २२ मार्च २०२२ पासून अमरण उपोषण छेडले होते त्याचा आज तीसरा दिवस होता, मात्र अवैध व्यावसायांवर पोलिसांद्वारे धाडी टाकून होत असलेल्या कारवाईबाबत समाधान व्यक्त करत उप विभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके यांच्या हस्ते त्यांनी आपले उपोषण अखेर आज (दि.२४/०३/२०२२ रोजी) तीसऱ्या दिवशी सोडले,

यावेळी समाजवादीचे वरिष्ठ नेते फहाद अहमद,प्रदेश महासचिव रऊफ शेख, डॉ.आरिश कमर, ज्येष्ठ कामगार नेते नागेशभाई सांवत,समता फाऊंडेशनचे शौकतभाई शेख,ऍड.मोहसिन शेख,मतीन शेख,अब्दुल सैय्यद, कलीम वेल्डर,अज़हर शेख, इमरान शेख,सोहेल शेख, समीर पठाण,जिशान शेख,अयाज मिर्ज़ा,आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपोषणास श्रीसाईबाबा संस्थान विस्वस्त तथा माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, मा.उपनगराध्यक्ष हाजी अंजुमभाई शेख,मा.नगरसेवक हाजी मुखतारभाई शहा,भाजपा चे शहराध्यक्ष मारुती बिंगले, भाजपाचे गणेश राठी ,राष्ट्रवादी शहराध्यक्ष लक्क़ी सेठी,असलम बिनसाथ,श्रीमती रामादेवी धीवर,ऍड.मिलिंद धीवर,पूनम जाधव,रितेश एडके,मूसा पटेल,सलीम शेख,रईस शेख, राजदचे जिल्हाध्यक्ष इमरान शेख, राजेश बोर्डे,अविनाश भोसले, हरिभाऊ शिंदे, सलमान पठाण, अहमद नासीर,श्रीकांत त्रिभुवन,अ.भा.लहूजी सेनेचे  बाळासाहेब बागुल,हनिफभाई पठाण,सलाउद्दीन शेख,इमरान पटेल,गणेश पवार, ज्ञानेश्वर, सुभान पटेल,अजहर शेख, किशोर गाड़े,मनोज बागुल,संतोष मोकळ,सुनील लोखंडे,आदी

विविध राजकीय पक्ष, संघटना, आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत असल्याने पोलिस यंत्रणा देखील खडबडून जागी झाली, कारवाईसाठी नाशीक पोलिस कमिशनर पथक आणि अहमदनगर गुन्हे अन्वेषण पथक सोबतच उपविभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके यांचे स्वतंत्र पथकासह शहर आणि तालुका पोलिस पथकाने ठिकाणी अवैध व्यावसायांवर जागोजागी धाडी टाकून अवैध व्यवसाय उध्वस्त करत लाखोंचा मुद्देमाल ही हस्तगत केला आहे.

यावेळी बोलताना जोएफ जमादार म्हणाले की शहर आणि तालुक्यातील अवैध व्यावसायामुळे मोठ्या प्रमाणात गुन्हेगार वाढली आहे, जनसामान्यांचे जीवन जगने मोठे मुश्किल झाले आहे,सर्वत्र गुंडांनी हैदोस मांडला आहे,यात जनसामान्यांचे मोठे नुकसान आणि परवड होत आहे, पोलिसांनी जर वेळीच आपली चोख भुमिका पार पाडलीतर सर्वत्र शांतता नांदेल मात्र असे होत नसल्याने सामाजिक कार्यकर्त्यांना उपोषण करण्याची वेळ येते ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे,मात्र सध्या अवैध व्यवसायांवर होत असलेल्या कारवाईबाबत आपण समाधानी असुन असेच धाडसत्र यापुढे देखील पोलिसांनी सुरू ठेवत शहर व तालुक्यातील अवैध व्यावसायांचा बिमोड करावा,ही कारवाई केवळ जुज्बी आणि फार्स स्वरुपाची ठरु नये, कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके आणि पक्षश्रेष्टींच्या शब्दाचा मान राखत आपण जरी उपोषण तृर्त स्थगित करत असलो तरी पुन्हा अवैध व्यवसाय आढळून आल्यास यापेक्षाही उग्र स्वरुपाचे धरणे, आंदोलने आणि उपोषणाचा मार्ग अवलंबला जाईल असेही ते म्हणाले, 

यावेळी समाजवादीचे आसिफ तांबोळी,अय्युब पठाण,सौ. सुल्तानाबानो शाह,अब्दुल सैय्यद, मतीन शेख,जकरिया सैय्यद, अरबाज कुरेशी, मुबसशिर पठाण, शोएब कुरेशी ,अमन इनामदार, फैजान काज़ी, साद पठाण, रफीक शेख,गुड्डू जमादार,अनवर तांबोळी,दानिश शाह,कालु आदी उपस्थित होते.


अहमदनगर प्रतिनिधी - २३मार्च २०२२ जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर  कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, यांना दिले होते .त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे ,पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप कचरू पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोज सिताराम गोसावी ,पोलीस नाईक शंकर संपतराव चौधरी ,पोलीस नाईक लक्ष्मण चिंधु खोकले, पोलीस कॉस्टेबल मयूर दीपक गायकवाड,पोलीस कॉन्स्टेबल कमलेश हरिदास पाथरूट यांचे पथक तयार करून एकाच दिवशी श्रीरामपूर तालुक्यामध्ये सात ठिकाणी अचानक धाडी टाकून दहा आरोपींना अटक करण्यात आली सविस्तर असे की अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पथकाने  श्रीरामपूर शहर पोस्टे हद्दीमध्ये वार्ड नंबर २ नवी दिल्ली श्रीरामपूर येथे एक इसम अवैध देशी व विदेशी दारुची विक्री करीत आहे आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशिर बातमी  मिळाली होती त्यानुसार ठिकाणी वार्ड नंबर २ नवी दिल्ली श्रीरामपूर येथे  एक इसम टपरीच्या आडोशाला देशी व विदेशी दारुची विक्री करताना दिसला  १८/४५ वा . छापा टाकला त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव व गाव शहर पो.स्टे.वचारले असता त्याने त्याचे नाव समिर लतीफ पिंजारी वय २४ वर्ष रा . वार्ड नं २ बजरंग चौक नवी दिल्ली श्रीरामपूर ता . श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर असे असलेचे सांगितले . मंकडॉल नंबर १ कंपनीच्या  दारुच्या सिलबंद  किंगफीशर स्ट्रांग कंपनीच्या दारुच्या सीलबंद बाटल्या,टुबर्ग स्ट्रांग कंपनीच्या दारुच्या सिलबंद बाटल्या ,देशी भिंगरी संत्रा कंपनीच्या दारुच्या सिलबंद बाटल्या , गुन्ह्याचा माल आरोपी समिर लतीफ पिंजारी वय २४ वर्ष रा . वार्ड नं २ बजरंग चौक नवी दिल्ली श्रीरामपूर ता .श्रीरामपूर   आरोपी समिर लतीफ पिंजारी वय २४ वर्ष रा . वार्ड नं २ बजरंग चौक नवी दिल्ली श्रीरामपूर ता . श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर विरुध्द मु.पो. अॅक्ट क . ६५ ( ई ) विरोधात होते अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल मयूर दीपक गायकवाड यांनी फिर्याद दिली. अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना बातमी मिळाली की मटका जुगार लोकांना चिठ्यांवर आकडे लिहून देवून त्यांच्याकडून पैसे घेवून खेळत व खेळवत आहे . आत्ता महाराष्ट्रगार समोर आझाद हिंद जवळ वार्ड 5 येथे एका टपरीच्या आडोशाला एक इसम कल्याण नावाचा हार जितीचा कायदा कलम गेल्यास तो मुद्देमालासह मिळून येईल अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने बातमीतील नमुद हकिगत  सदर ठिकाणी रेल्वे स्टेशन समोर , आझाद हिंद जवळ वार्ड 5 येथे एका टपरीच्या आडोशाला जावुन खात्री केली असता तेथे एक इसम लोकांना चिठ्यांवर आकडे लिहून देवुन त्यांचे कडून पैसे घेत असल्याचे दिसुन आल्याने तेथे ठिक 18 /05 वा.छापा टाकला असता सदर ठिकाणी बसलेले इसम पळून गेले व मटका घेणा - या एका इसमास जागीच पकडून सदर इसमास आहे त्या स्थितीत  त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव रविंद्र भिमा चव्हाण जय 49 रा.वार्ड क्रमांक 7 सरस्वती कॉलनी श्रीरामपूर ता श्रीरामपूर जि . अहमदनगर असे शहर पो.स्टे . असल्याचे सांगितले . सदर इसमाची पंचा समक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात खालील वर्णणाची कल्याण मटका जुगार खेळण्याचे साहीत्य मीळून आले. इसम आरोपी नामे नाव रविंद्र भिमा चव्हाण वय 49 रा . वार्ड क्रमांक 7 सरस्वती कॉलनी श्रीरामपुर ता श्रीरामपूर जि . अहमदनगर याचे विरुध्द महाराष्ट्र जुगारबंदी कायदा कलम 12 ( अ ) पोलीस कॉन्स्टेबल मयूर गायकवाड यांनी फिर्याद दिली डावकर रोड योगेश हॉटेल शेजारी वार्ड नंबर 5 येथे एका टपरीच्या आडोशाला एक इसम कल्याण नावाचा हार जितीचा मटका जुगार लोकांना : महाराष्ट्र सुगार कायदा चिठ्यांवर आकडे लिहून देवून त्यांच्याकडून पैसे घेवून खेळत व खेळवत आहे , आत्ता गेल्यास तो मुद्देमालासह मिळुन येईल अशी खात्रीशिर बातमी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. लगेच डावखर रोड योगेश हॉटेल शेजारी वार्ड नंबर 5 येथे एका टपरीच्या आडोशाला जावुन खात्री केली असता तेथे एक इसम लोकांना चिठ्यांवर आकडे लिहून देवून त्यांचे कडून पैसे घेत असल्याचे दिसुन आल्याने तेथे ठिक 17 /35 वा . छापा टाकला असता सदर ठिकाणी बसलेले इसम पळून गेले व मटका घेणा - या एका इसमास जागीच पकडून  पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव प्रमोद बबन त्रिभुवन वय 33 रा . रा . खंडाळा ता श्रीरामपूर जि . अहमदनगर असे असल्याचे सांगितले .अंगझडती घेतली कल्याण  मटका खेळण्याचे साहीत्य मीळुन आले. इसम नामे प्रमोद बबन त्रिभुवन याचे कब्जात मिळुन आले आरोपी नामे प्रमोद बबन त्रिभुवन वय 33 रा . रा . खंडाळा ता श्रीरामपूर जि . अहमदनगर याचे विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक लक्ष्मण खोकले यांनी महाराष्ट्र जुगारबंदी कायदा कलम 12 ( अ ) प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे  अशोक नगर फाटा निपाणी श्रीरामपूर जाणारे रोडवर एका पत्र्याच्या शेडमध्ये ३ ते ४ इसम तिरट नावाचा हारजितीचा जुगार पैसे लावुन खेळत आहेत. अशी खात्रीशीर माहिती पोलिस अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती त्यांनी लगेच पथकाला  अशोक नगर फाटा निपाणी ते श्रीरामपूर जाणारे रोडवर एका पत्र्याच्या शेडमध्ये जावून खात्री केली असता त्याठिकाणी ३ ते ४ इसम हातात पत्ते घेवून तिरट नावाचा जुगार खेळतांना दिसले  ठिक १८/३० वा.छापा टाकला  त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव १ ) माधव नानासाहेब इंगळे वय ३० रा . वडाळा महादेव ता . श्रीरामपूर जिल्हा अहदमनगर २ ) सर्जेराव तुकारम पगारे वय ५८ वर्ष रा . वडाळा महादेव ता . श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर ३ ) बहिरु रामकृष्ण गोरे वय ६ ९ वर्ष रा . कारेगाव ता . श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर ४ ) आण्णासाहेब रंगनाथ इंगळे वय ४६ रा . वडाळा महादेव ता . श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर त्याचे कब्जात खालील वर्णणाची तिरट जुगाराची साधणे व रोख रक्कम मिळुन आली ती १२६० / -रू रोख रक्कम त्यात विविध दराच्या नोटा व कागदी तिन पत्ते इसम नामे माधव नानासाहेब   इंगळे याचे अंगझडतीत मिळुन आली ती . २ ) ११२० / -रू रोख रक्कम त्यात विविध दराच्या नोटा व कागदी तिन पत्ते इसम नामे सर्जेराव तुकारम पगारे याचे अंगझडतीत मिळुन आली ती . ३ ) १०७० / रोख रक्कम त्यात विविध दराच्या नोटा , व कागदी तिन पत्ते , इसम नामे बहिरु रामकृष्ण मोरे याचे अंगझडतीत मिळुन आली ती . ४ ) १०५० / रोख रक्कम त्यात विविध दराच्या नोटा व कागदी तिन पत्ते , इसम नामे आण्णासाहेब रंगनाथ इंगळे याचे अंगझडतीत मिळुन आली ती . ५ ) ८४० / - रु रोख रक्कम त्यात विविध दराच्या नोटा व वेगवेगळे कागदी पत्ते गोलाकार डावात मिळून आले ते  ५३४० रु  आरोपी नामे १ ) माधव नानासाहेब इंगळे वय ३० रा . वडाळा महादेव ता . श्रीरामपूर जिल्हा अहदमनगर २ ) सर्जेराव तुकारम पगारे वय ५८ वर्षे रा . वडाळा महादेव ता . श्रीरामपूर जिल्हा ३ ) बहिरु रामकृष्ण गोरे वय ६ ९ वषे रा . कारेगाव ता . श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर ४ ) आण्णासाहेब रंगनाथ इंगळे वय ४६ रा . वडाळा महादेव ता . श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर यांचे विरुद्ध अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नाईक लक्ष्मण खोकले यांनी महाराष्ट्र जुगारबंदी कायदा कलम १२ अ प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे.  रेल्वे स्टेशन समोर , आझाद हिंद जवळ वार्ड 5 येथे एका टपरीच्या आडोशाला एक इसम कल्याण नावाचा हार जितीचा मटका जुगार लोकांना चिठ्यांवर आकडे  त्यांच्याकडून पैसे घेवून खेळत व खेळवत आहे , आत्ता गेल्यास तो मुद्देमालासह मिळुन येईल अशी बातमी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाल्याने त्यांनी खात्री करून लगेच पथकाला त्याठिकाणी पाठवले खात्रीशिर बातमी मिळाल्याने  श्रीरामपूर शहर पो.स्टेशन समोर , आझाद हिंद जवळ वार्ड 5 येथे एका टपरीच्या आडोशाला जावून खात्री केली असता तेथे एक इसम लोकांना चिठ्यांवर आकडे लिहुन देवुन त्यांचे कडून पैसे घेत असल्याचे दिसुन आल्याने तेथे ठिक 18/35 वा  नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव इम्रान अहमद पठाण वय 29 वर्षे रा . सुभेदार वस्ती वार्ड नंबर 2 मरकज मजिंद समोर जि . अहमदनगर असे त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्णात खालील वर्णणाची कल्याण मटका जुगाराची साधणे व रोखरक्कम मिळुन आली ती 1 ) 1820 / -रू रोख रक्कम त्यात विविध दराच्या नोटा व मटका खेळण्याचे साहीत्य मीळुन आले ते इसम नामे इम्रान अहमद पठाण याचे कब्जात मिळुन आले ते 1820  रू आरोपी नामे नाव इम्रान अहमद पठाण वय 29 वर्षे रा . सुभेदार वस्ती वार्ड नंबर 2 मरकज मजिद समोर जि . अहमदनगर याचे विरुध्द अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉस्टेबल कमलेश पाथरूट यांनी महाराष्ट्र जुगारबंदी कायदा कलम 12 ( अ ) प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे बस स्टॅण्ड समोर योगेश हॉटेलच्या बाजूला एका टपरीच्या  आडोशाला एक इसम कल्याण नावाचा हार जितीचा मटका जुगार लोकांना चिठ्यांवर आकडे लिहुन देवुन ' महाराज , जुगार कायदा त्याच्याकडून पैसे घेवून खेळत व खेळवत आहे . आत्ता गेल्यास तो मुद्देमालासह मिळुन येईल अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती त्यांनी लगेच बस स्टॅण्ड समोर योगेश हॉटेलच्या बाजूला येथे एका टपरीच्या आडोशाला जावुन खात्री केली असता तेथे एक इसम लोकांना चिठ्यांवर आकडे लिहुन देवून त्यांचे कडून पैसे घेत असल्याचे दिसुन आल्याने तेथे ठिक 17/05 वा . छापा टाकला असता सदर ठिकाणी बसलेले इसम पळुन गेले व मटका घेणा - या एका इसमास जागीच पकडून सदर इसमास  त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव शकील अहमद जमीलशहा वय 32 रा . वार्ड क्रमांक 02 सुभेदार वस्ती श्रीरामपूर ता श्रीरामपूर जि . अहमदनगर त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात खालील वर्णणाची कल्याण मटका जुगाराची  रक्कम त्यात विविध दराच्या नोटा व मटका खेळण्याचे साहीत्य मीळून आले ते इसम नामे शकील अहमद जमीलशहा याचे कब्जात मिळुन आले. 1650  रुपये आरोपी नामे शकील अहमद जमीलशहा वय 32 रा . वार्ड क्रमांक 02 सुभेदार वस्ती श्रीरामपूर ता श्रीरामपूर जि . अहमदनगर याचे विरुध्द अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल कमलेश पाथरूट यांनी महाराष्ट्र जुगारबंदी कायदा कलम 12 ( अ ) प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे .डावखर रोड योगेश हॉटेल शेजारी वार्ड क्रमांक 06 येथे एका टपरीच्या आडोशाला एक इसम कल्याण नावाचा हार जितीचा मटका जुगार लोकांना चिठ्यांवर आकडे लिहुन देवुन त्यांच्याकडून पैसे घेवून खेळत व खेळवत आहे , आत्ता गेल्यास तो मुद्देमालासह . मिळुन येईल अशी अशी बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाल्याने खात्रीशिर बातमी मिळाल्याने  पथक लगेच त्या ठिकाणी गेले त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव राहूल बबन पांडे वय 43 वर्षे रा . मोरगे वस्ती , वार्ड क्रमांक 7. गणपती मंदीर शेजारी श्रीरामपूर ता श्रीरामपूर जि . अहमदनगर असे असल्याचे सांगितले .  त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात खालील वर्णणाची कल्याण मटका जुगाराची साधणे व रोखरक्कम मिळुन आली  त्यात विविध दराच्या नोटा व मटका खेळण्याचे साहीत्य मीळुन आले ते इसम नामे राहूल बबन पांडे याचे कब्जात मिळून आले ते 2130 / -रू एकुण आरोपी नामे नाव राहूल बबन पांडे वय 43 वर्षे रा . मोरगे वस्ती , वार्ड क्रमांक 7 , गणपती मंदीर शेजारी श्रीरामपूर ता श्रीरामपूर जि . अहमदनगर याचे विरुध्द पोलीस कॉन्स्टेबल मयूर गायकवाड यांनी महाराष्ट्र जुगारबंदी कायदा कलम 12 ( अ ) प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे . सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप  मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके,पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे ,पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप कचरू पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोज सिताराम गोसावी ,पोलीस नाईक शंकर संपतराव चौधरी ,पोलीस नाईक लक्ष्मण चिंधु खोकले, पोलीस कॉस्टेबल मयूर दीपक गायकवाड,पोलीस कॉन्स्टेबल कमलेश हरिदास पाथरूट आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 

बेलापुर  (प्रतिनिधी  )-  पोलीस दादा विषयी असलेले कुतुहल, गैरसमज , कामाची पध्दत हे बालवयातच मुलांना सांगून त्यांच्या मनात असलेली भिती, शंका दुर करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सहलीमुळे  अनेकांच्या शंका तर दुर झाल्याच पण काही लहानग्यांच्या प्रश्नामुळे पोलीसदादाही अचंबित झाले.                   बेलापूरातील एस आर के ईंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने" चला पोलीस दादाशी करु या मैत्री ,गुन्हेगारी करु या हद्दपार "या उपक्रमांतर्गत बेलापुर पोलीस स्टेशन येथे विद्यार्थ्यांच्या सहलीचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी विद्यार्थ्यांनी  साहेब आम्हांला पण तुमच्यासारखे पोलीस अधिकारी व्हायचंय....असे सांगताच चांगला आभ्यास करा भरपुर व्यायाम करा ज्ञान व शरीरयष्ठी हे दोन्हीही कमवा पोलीस गुन्हेगारांचे शत्रू आणि चांगल्या नागरिकांचे मित्र असतात, पोलीसांकडे नागरिकांची पाहण्याची दृष्टी वेगळी असली तरीपण जनतेचे रक्षण व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे  पुण्याचे काम करण्याची संधी आम्हाला मिळाली असल्याचे पोलीस दादांनी सांगितले .बालपणापासून जर विद्यार्थ्यांना पोलिसांशी सुसंवाद साधून कायदे काय असतात,आपण जर चुकीचे वागलो तर शाळेत शिक्षक सुधारण्यासाठी शिक्षा देतात  तसेच मोठं झाल्यावर आपण काही गंभीर गुन्हा केला तर पोलीस शिक्षा करतात ही जनजागृती मोठ्या बरोबर बाल वयातही होणे अपेक्षित असल्याचे मत  श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट यांनी व्यक्त  केले 

   .यावेळी चेअरमन रवींद्र खटोड,पोलीस ठाण्याचे अतुल लोटके,रामेश्वर ढोकणे,नवनाथ कुताळ,प्राचार्या वैशाली कुलकर्णी,मेघा गोरे,सोनाली ठोंबरे,आशा जाधव,आश्विनी ठोंबरे,पूजा धात्रक आदींसह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी बेलापूर पोलीस ठाण्याचे अतुल लोटके, रामेश्वर ढोकणे,आदींनीही संवाद साधला.पोलिसांसोबत काही तास घालवायला मिळाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. शेवटी पोलीस दादांच्या हस्ते मुलांना खाऊ वाटप करण्यात आला .

बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथील बेलापुर ऐनतपुर शिवारातील अशोक बंधाऱ्यातील  तळ्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला असुन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खबरीवरुन पोलीसांनी अकस्मात गुन्हा दाखल केला आहे            बेलापुर येथील विशेष महेंद्र शिवदे हा १६ वर्षाचा मुलगा रंगपंचमी असल्यामुळे रंग खेळण्याकरीता अशोक बधांऱ्याच्या तळ्याजवळ गेला होता तोल जावुन तो तळ्यात पडला त्याच्या सोबत असणारांनी आरडाओरडा केल्यामुळे नागरीकांच्या मदतीने त्यास बाहेर काढण्यात आले ही माहीती जि प सदस्य शरद नवले यांना समजताच त्यांनी तातडीने त्या मुलास  साखर कामगार रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषीत केले  वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या माहीतीवरुन पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असुन पुढील तपास पोलीस नाईक अमोल जाधव करत आहे .

बेलापुर (प्रतिनिधी  )-ग्रामपंचायत , बेलापुर विविध कार्यकारी संस्था , देवा गृप ,नगर रोड मित्र मंडळ , शिवप्रतिष्ठाण तसेच विविध संघटनाच्या वतीने बेलापूरात शिवजयंती मोठ्या उत्सहात संपन्न झाली                                            बेलापूरातील मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ग्रामस्थांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आले बेलापुर ग्रामपंचायत विविध कार्यकारी सेवा संस्था बेलापुर  नगररोड मित्र मंडळ शिवप्रतिष्ठाण  व देवा गृपच्या वतीने वाबळे मैदानात महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले नगर रोड मित्र मंडळाच्या वतीने बेलापूर नगरीची शान आयपीएस झालेले अभिषेक दुधाळ यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते महाआरती नंतर खिचडी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला  या वेळी जि प सदस्य  शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे पंचायत समीती सदस्य अरुण पा नाईक  बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले माजी सरपंच भरत साळूंके कै.मुरलीधर खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड रणजित श्रीगोड सुवालाल लुक्कड प्रमोद कर्डीले सुनील मुथा  अनिल नाईक पुरुषोत्तम भराटे   कलेश सातभाई चंद्रकांत नाईक भगवान सोनवणे जालींदर कुऱ्हे  जेष्ठ पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा लहानु नागले सुशिल राका अभिजित राका चांगदेव मेहेत्रे  शिवाजी पा वाबळे महेश कुऱ्हे मुसा शेख विलास मेहेत्रे दत्ता कुऱ्हे प्रकाश कुऱ्हे विश्वनाथ गवते प्रशांत लड्डा अनिल पवार डाँक्टर शैलेश पवार गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे सचिन वाघ सागर ढवळे आमोल गाढे शफीक आतार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे रामेश्वर ढोकणे हरिष पानसंबळ निखील तमनर आदिसह ग्रामस्थ शिवप्रेमी उपस्थित होते

बेलापुर  (प्रतिनिधी  )-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीरामपूरच्या वतीने एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना किराणा वाटप करण्यात  आला असुन मनसेच्या या उपक्रमामुळे गेल्या चार महीन्यापासून अडचणीत असलेल्या कर्मचाऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे                                 मनसेच्या वतीने  याही वर्षी  मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे जिल्हा सचिव संजय नवथर विधानसभा अध्यक्ष संतोष डहाळे तालुकाध्यक्ष बाबा रोकडे शहराध्यक्ष निलेश नाम गणेश दिवशी यांच्या हस्ते नगरपालिका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे मनाले की आम्ही वीस ते पंचवीस वर्षापासून शिवजयंती निमित्त विविध प्रकारचे सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम व गोरगरीब लोकांना मदत करण्याचे उपक्रम राबवत असतो गेल्या काही महीन्यापासून एस टी महामंडळाचे कर्मचारी आपल्या उचित मागण्यासाठी संपावर गेलेले आहेत त्यांच्या मागणीची दखल शासन घेत नाही कर्मचारी तर आपल्या मागण्यावर ठाम आहेत त्यामुळे महामंडळाचे सर्व कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहे त्यांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न मनसेच्या वतीने करण्यात आला असुन गरजु कुटुंबांना किराणा मालाचे वाटप करण्यात आले आहे   शिवजयंतीच्या निमित्ताने श्रीरामपूरातील 100 गरजवंत कुटुंबांना किराणा वाटप करण्यात आला आसुन यापुढे नेवासा संगमनेर या तालुक्यातील एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना किराणा वाटपाचा कार्यक्रम करणार आहोत व त्यांना इतरी जी काही मदत लागेल ती मदत करण्याची प्रयत्न करणार आहोत जोपर्यंत एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना साथ देऊ  झोपी गेलेल्या शासनाला जागे करण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असे या प्रसंगी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले 

याप्रसंगी विद्यार्थी सेना जिल्हा सचिव विशाल शिरसाठ कामगार सेना तालुकाध्यक्ष किशोर वाडीले  बबन माघाडे भास्कर सरोदे संतोष भालेराव दीपक लांडे  निलेश सोनवणे दीपक सोनवणे  राजू शिंदे मनोज जाधव अरुण बोराडे राम थोरात अतुल खरात  महेश कोलते सुमित गोसावी मंगेश जाधव प्रसाद शिंदे ज्ञानेश्वर काळे संतोष आवटी मारुती शिंदे विजय शेळके महादेव होवळ  विकी शिंदे दादासाहेब बनकर ऋषिकेश खरात सोमनाथ कासार आकाश कापसे अनिल शिंदे गणेश रोकडे किशोर बनसोडे राहुल शिंदे बाबाजी शिंदे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

बेलापुर  (प्रतिनिधी  )-संक्रापूर तालुका राहुरी येथील संक्रापुर विविध कार्यकारी सोसायटीच्या नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत चेअरमन नबाजी जगताप महेबुब शेख संजय जगताप यांच्या संक्रेश्वर जनसेवा शेतकरी मंडळाने निर्विवाद बहुमत मिळविले असुन विरोधी सरपंच रामा पांढरे यांच्या संक्रेश्वर मंडळाला केवळ नशिबाने साथ दिल्यामुळे दोनच जागावर समाधान मानावे लागले            संक्रापुर सहकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच संपन्न झाली एकुण १३ जागेकरीता २६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते चेअरमन नबाजी जगताप यांचा संक्रेश्वर जनसेवा शेतकरी मंडळ तर सरपंच रामा पांढरे यांचा संक्रेश्वर जनसेवा मंडळ अशी दोन गटात ही निवडणूक होती एकुण २२९ मतदारापैकी २२०मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला माजी ग्रामविकास अधिकारी प्रभाकर होन यांनी वयाच्या ९० व्या वर्षी आपला मतदानाचा हक्क बजावला व सायंकाळी  त्यांचे निधन झाले दोन्ही मंडळाकडून विजयाचे दावे केले जात होते एका मतदाराला तेरा मते देण्याचा अधिकार असल्यामुळे मते विभागली जाण्याची दाट शक्यता होती परंतु मतदारांनी केवळ चिन्ह पाहुन मतदान केल्यामुळे संक्रेश्वर जनसेवा शेतकरी मंडळाला अकरा जागा मिळाल्या तर चार जणांना समसमान मते मिळाल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी नावाच्या अद्याक्षरानुसार दोन उमेदवारांना विजयी घोषीत केले संक्रेश्वर जनसेवा शेतकरी मंडळाचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे शेख महेबुब इमाम ,जगताप बाबासाहेब संपत , जगताप त्रिंबक भाऊसाहेब  ,सालबंदे भरतरीनाथ महीपती  ,होन ज्ञानदेव भाऊसाहेब  ,जगताप राजेंद्र किसन ,चोखर बाळासाहेब संतु  पत्रकार देविदास अगस्ती देसाई  ,खेमनर सिताबाई बबन ,चव्हाण योगीता यमासाहेब ,भोंगळे शशिकांत सोपान  तर चव्हाण जालींदर चव्हाण बापू पांढरे साहेबराव व शेख कादर या चौघांना समान १०४मते मिळाली होती  त्यामुळे बाराखडी नुसार प्रथम असणाऱ्या दोन उमेदवारांना विजयी घोषीत करण्यात आले त्यात  संक्रेश्वर जनसेवा मंडळाचे जगताप पंढरीनाथ किसन व चव्हाण जालींदर तुकाराम हे विजयी झाले असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले किरकोळ बाचाबाची वगळता निवडणूक शांततेत पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी डी आर कार्यालयातील कनिष्ठ लिपीक आर पी अगरकर यांनी काम पाहीले त्यांना एस पी भोसले गीताराम काळे प्रकाश नलगे यांनी सहकार्य केले पोलीस उपनिरीक्षक निरज बुकील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पी ऐ कटारे पोलीस नाईक पी जी आहेर जे एम धायगुडे पोलीस पाटील विजय गोसावी यांनी चोख बंदोबस्त ठेवला  या निवडणूकीत पंढरीनाथ जगताप व राजेंद्र जगताप हे  सख्खे भाऊ विजयी झाले  जनशक्ती विरुध्द धनशक्तीच्या लढाईत जनशक्ती विजयी झाल्याचा दावा संक्रेश्वर जनसेवा शेतकरी मंडळाचे नेते नबाजी जगताप यांनी केला असुन मागील कार्यकाळात केलेल्या कामामुळेच सभासदांनी पुन्हा एकदा आमच्या मंडळाच्या ताब्यात सत्ता दिली असल्याचा दावा माजी सरपंच संजय जगताप महेबुब शेख व नबाजी जगताप यांनी केला आहे  .

मुंबई प्रतिनिधी - काळबादेवी येथील एका व्यावसायिकाला आयकर विभागाची भीती दाखवून खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील तीन आरोपींना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणातील चौथे आरोपी डीसीपी सौरभ त्रिपाठी अद्याप फरार असून मुंबई पोलीस त्यांचा शोध घेत आहे. सौरभ त्रिपाठीच्या शोधाकरिता पाच पथके इतर राज्यात पाठवण्यात आली आहेत. मात्र, अद्याप तरी त्रिपाठी यांचा शोध लागलेला नाही. मात्र, त्रिपाठी यांना हवालाद्वारे पैसे पुरवणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशमध्ये शनिवारी अटक केली असून त्यास आज मुंबईला आणणार आहे.आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांच्याभोवतीचा फास मुंबई पोलिसांनी चांगलाच आवळला आहे. त्यांच्या शोधासाठी मुंबई गुन्हे शाखेची पाच पथके उत्तर प्रदेशात गेली आहे. पोलिसांनी उत्तर प्रदेशातील एकाला अटक केली असून त्रिपाठींच्या सूचनेनुसार त्याने पोलीस निरीक्षक ओम वांगटेकडून हवालाद्वारे पैसे स्विकारल्याचे प्राथमिक तपासात उघड झाल्याचे समजते. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीकडून पोलिसांनी दीड लाखांची रोकड जप्त केली आहे. अंगडियाकडून आरोपींनी 19 लाख रुपये उकळल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांच्या हाती धागेदोरे लागत असल्याने त्रिपाठींच्या अडचणी वाढल्या आहेत.त्रिपाठीच्या शोधासाठी इतर राज्यात 5 पथके रवाना\व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याच्या आरोपात गुन्हा दाखल झाल्यापासून डीसीपी सौरभ त्रिपाठी कुठे आहे, हे कुणालाही माहीत नाही. सौरभ त्रिपाठीच्या शोधासाठी 5 पथके तयार करण्यात आली आहेत. क्राईम ब्रांचचे पथक सौरभ त्रिपाठीचा उत्तर प्रदेश, राजस्थान आणि इतर राज्यांमध्ये शोध घेत आहे. परंतु, अद्याप डीसीपी सौरभ त्रिपाठीबद्दल काहीही माहिती पोलिसांना मिळाली नाही. मात्र डीसीपी सौरभ त्रिपाठीला हवालाद्वारे पैसे पाठवणाऱ्या व्यक्तीला उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. आज या व्यक्तीला मुंबईत आणण्यात येणार असून न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.सौरभ त्रिपाठी यांची अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव खंडणी प्रकरणात अटकेच्या भीतीने सौरभ त्रिपाठी यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. बुधवारी (23 मार्च) या अर्जावर सुनावणी होणार आहे. या शिवाय त्रिपाठी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठीचा अहवाल मुंबई पोलीस आयुक्तालयातून गृहविभागात पाठवण्यात आला आहे.त्रिपाठींवर गुन्हा दाखस\अंगडिया व्यावसायिकांकडून खंडणी वसूल प्रकरणात त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यातील ओम वांगटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाच्या कारवाईची भीती दाखवून अंगडिया व्यवसाय करणाऱ्यांकडून पोलिसांनी खंडणी वसुली केली हेाती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक पोलीस उपायुक्त डॉ. सौरभ त्रिपाठी यांची बदली करण्यात आली होती. या बदलीनंतर सौरभ त्रिपाठी हे सुटीवर गेले होते. आता पोलीस त्यांच्या शोधात आहेत. त्यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे.आरोप काय आहेत?सौरभ त्रिपाठींविरोधात मुंबई क्राईम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटने काही दिवसांपूर्वीच खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. सौरभ त्रिपाठींवर मुंबईतील अंगडियांकडून जबरदस्तीने पैसे उकळण्याचा आरोप आहे. अंगडियांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पोलीस उपायुक्त त्रिपाठी यांनी त्यांच्याकडून काम सुरू ठेवण्यासाठी 10 लाख रूपये मागितल्याचा आरोप आहे.

अहमदनगर -19 मार्च 2022 अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब काळे ,पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर , पोहेकॉ  बबन मखरे , पोहेकॉ  देवेंद्र शेलार , पोलीस नाईक शंकर चौधरी पोलीस नाईक सचिन  आडबल , पोलीस कॉन्स्टेबल आकाश काळे , पोलीस कॉन्स्टेबल मयुर गायकवाड व चोपोहेकॉ  संभाजी कोतकर यांचे स्वतंत्र पथक नेमण जिल्हयातील अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांनी नगर तालुक्यामध्ये गुरुवार दि . १७/०३/२०२२ रोजी कारवाईची विशेष मोहिम राबवून ०३ ठिकाणी छापे टाकून एकूण १,०४,५०० / रु . किं . चा मुद्देमाल त्यामध्ये गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन व गावठी हातभट्टीची दारु जप्त करुन खालील प्रमाणे ३ आरोपी विरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये खालील प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत . १ ) नगर तालुका पो.स्टे . गुरनं . १६०/२०२२ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ ( फ ) ( क ) ( ड ) ( ई ) प्रमाणे जप्त मुद्देमाल : - ३८,५०० / -रु . किं . ची त्यामध्ये ३५ लि .

तयार दारु व ७०० लि . गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे आरोपी : - कानिफनाथ भिमोजी कळमकर रा . कळमकरवस्ती , नेप्ती , ता . नगर ( फरार ) २ ) नगर तालुका पो.स्टे . गुरनं . १६ ९ / २०२२ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ ( फ ) ( क ) ( ड ) ( ई ) प्रमाणे जप्त मुद्देमाल : - ४३,००० / -रु . किं . ची त्यामध्ये ३० लि . तयार दारु व ८०० लि . गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे आरोपी : - राजू छबु पवार वय ३० , रा . नेप्ती , ता . नगर ३ ) नगर तालुका पो.स्टे . गुरनं . १६२ / २०२२ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ ( फ ) ( क ) ( ड ) ( ई ) प्रमाणे जप्त मुद्देमाल : - २३,००० / -रु . किं . ची त्यामध्ये ३० लि . तयार दारु व ४०० लि . गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे आरोपी : - राजेश बाजीराव पवार वय ४२ , रा . नेप्ती , ता . नगर सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील , अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार आग्रवाल, अहमदनगर ,उपविभागीय पोलीस अधीकारी ग्रामीण विभाग अजित पाटील यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी  अमंलदार यांनी केलेली आहे

सिन्नर  वार्ताहर-तालुक्यातील पाथरे परिसरातील मातोश्री हॉटेलवर अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे यांच्या पथकाने छापा टाकत हजारोंचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे.गेल्या काही दिवसांपासून केदार यांच्याकडून जिल्ह्यातील अवैध गुटखा, मद्य व अंमली  पदार्थांची अवैध वाहतूक व विक्री रोखण्यासाठी कारवाईचा धडाका सुरु आहे. त्याअंतर्गत सिन्नरमधील पाथरे शिवारातील हॉटेल मातोश्री येथे अवैध दारुसाठा करुन विक्री होत असल्याची गुप्त माहिती नुकतीच केदार यांना मिळाली होती. त्यांनी ग्रामीण पोलिस अधीक्षक सचीन पाटील यांच्या मागदर्शनाखाली आपल्या पथकाला सदर हॉटेलवर नजर ठेवण्यास सांगितले होते.त्यावरुन शुक्रवारी (दि. 18) सायंकाळी पथकाला खात्री पटल्यानंतर त्यांनी हॉटेलवर छापा मारत 12 हजार 554 रुपयांचा देशी व विदेशी मद्यसाठा जप्त केला. हॉटेल चालक रवींद्र देवमन मोकळ रा. पाथरे हा बेकायदेशीरपणे चोरट्या रीतीने देशी व विदेशी दारुची साठवणूक करून विक्री करतांना आढळल्याने त्याच्यावर वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून साडेबारा हजारांचा अवैद्य साठा जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी कांगणे यांच्या पथकातील पोलीस नाईक रावसाहेब कांबळे, भाऊसाहेब टिळे, वैष्णव यांनी केली.अवैद्य विक्री थाबवण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात छोट्या हातगाड्यांसह धाब्यांवर सर्रासपणे अवैध दारुसाठा करुन विक्री सुरु आहे. कुठल्याही प्रकारचा परवाना नसूनही बिंधांस्तपणे अशा ठिकाणी सर्रास मद्याची विक्री होत असल्याने अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

श्रीरामपूर (शहर प्रतिनिधी शेख फकीर महंमद) श्रीरामपूर येथील नगर परिषदेच्या वतीने होत असलेली घरपट्टी नळपट्टी व बाजारपेठेतील दुकानांची जोर जबरदस्तीने होत असलेलि पट्टी वसुली शीथील करणे बाबत आज दिनांक 17/ 3/ 2022 रोजी महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले सदरील निवेदन स्वीकारताना पालिकेतील अधिकारी श्री कविटकर यांनी यासंदर्भात वरिष्ठांना कळवितो असे सांगितले सदरील निवेदन देताना पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली महासचिव शेख फकीर महंमद उत्तर जिल्हाध्यक्ष राज मोहम्मद शेख इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद पत्रकार संघाचे पुणे शहराध्यक्ष मोहम्मद हनीफ तांबोळी पत्रकार संघाचे जिल्हा सचिव सलाउद्दीन शेख उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष एजाज सय्यद श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुभाषराव गायकवाड श्रीरामपूर शहराध्यक्ष रियाज खान पठाण श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष गुलाब भाई शेख बेलापुर शाखा प्रमुख मुसा भाई सय्यद बेलापूर शाखा उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद महिला जिल्हाध्यक्ष सौ समिना रफिक शेख पत्रकार संघ सदस्य सलीम जान मोहम्मद शेख अमीर बेग मिर्झा शेख नजीर गफूरभाई शकील इस्माईल कोथमिरे आदी पत्रकार या वेळी उपस्थित होते

पत्रकार संघाच्या वतीने दिलेल्या निवेदनात करण्यात आले की महाराष्ट्रातील नगरपालिका व महानगरपालिकेच्या निवडणूका ओबीसी चा मुद्दा सोडविण्याकरिता राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका लांबणीवर टाकल्या असून या सर्व नगरपालिकांवर  प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे सबब सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांकडून जनतेच्या अडीअडचणीं चा विचार न करता कठोरपणे शक्तीची घरपट्टी पाणीपट्टी व दुकानांची पट्टी वसुली करण्यात येत आहे यामुळे सर्व नागरिक हवालदिल झाले आहे विशेष म्हणजे श्रीरामपूर येथील नगर परिषदेच्या वतीने येथील उपविभागीय अधिकारी व नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार जोरदार पट्टी वसुली करण्यात येत आहे पट्टी वसुली करिता नगरपालिकेचे वसुली पथक प्रत्येक वॉर्डातील घरी घरी जाऊन थकलेल्या पट्टीची मागणी करून दमबाजी करीत आहेत पट्टी थकलेल्या लोकांन पट्टीच्या ऐवज मध्ये त्यांच्या घरातील सामान घरावरील पत्रे जप्त करून नळ  कनेक्शन तोडण्याची धमकी देत आहेत सबब नागरिकांनी नगरपालिकेत चौकशी केल्यास उलट कर्मचारी वर्गाचे गाऱ्हाणे ऐकावे लागतात वसुली विभागातील कर्मचाऱ्यांकडून सांगितले जाते की या पट्टी वसुली नंतरच या पैशावर आमचे पगार व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन होणार असल्याने तुम्हीच आमच्यावर उपकार करा व पट्टी भरा असे सांगितले जाते अर्थातच वसुली कर्मचाऱ्यांनी जनतेचे गाऱ्हाणे ऐकण्यास कानावर हात ठेवले आहे यामुळे शहरातील जनता त्रस्त झाली असून पालिका प्रशासनाच्या या जोर जबरदस्ती पणाच्या वागणुकीचा निषेध नोंदवित आहे वास्तविक पाहता सन 2019 -20- 21 व 22 मध्ये कोरोना च्या प्रादुर्भावामुळे लोकांना उद्योग धंद्या पासून मुकावे लागले सद्य स्थितीतही बाजारपेठेतील दुकानदार व सर्वसामान्य नागरिकांची अत्यंत दुरवस्था झाली असून अद्याप शहरातील जनता कोरोना च्या संकटातून सावरली नसताना त्यांच्यावर वसुली चा बडगा थोपणे योग्य नसून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चालविलेल्या या अत्याचाराचा आम्ही निषेध नोंदवित असून जनते कडून सूट देऊन टप्पे वारीने झेपेल अशा स्वरूपात व भरता येईल अशा स्वरूपात पट्टीची वसुली करावी पट्टी वसुली मध्ये शिथीलता वर्तवावी जेणेकरून नागरिकांना पट्टी भरण्यास सवलत मिळेल व ते आपल्या कुवतीप्रमाणे पट्टी भरण्यास समर्थ होतील सदरील या बाबींचा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून सक्तीची पट्टी वसुली शिथील करावी असे नमूद करण्यात आले असून त्वरित पट्टी वसुली शीथील न केल्यास पत्रकार संघ व नागरिकांच्या वतीने पालिकेसमोर तीव्र आंदोलनास सुरुवात करण्यात येईल असा इशाराही पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आला.

अहमदनगर प्रतिनिधी-विषारी पदार्थ घेऊन एका पोलीस अंमलदाराने जीवन संपविले. सोमनाथ बापू कांबळे (रा. विळद ता. नगर) असे मयत पोलीस अंमलदाराचे नाव आहे. ते पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षात नेमणुकीस होते. त्यांनी विषारी पदार्थ कोणत्या कारणातून घेतला, याची माहिती अद्याप समोर आली नसून या घटनेमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.नगर तालुक्यातील इमामपूर शिवारात कांबळे यांनी तीन दिवसांपूर्वी विषारी पदार्थ घेतला होता. त्यांना उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरूवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कांबळे हे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षात नेमणुकीस होते. त्यांनी अनेक हरवलेल्या मुले-मुली, महिला-पुरूष यांचा शोध घेण्याचे काम केले आहे. त्यांनी कोणत्या कारणातून विष घेतले याची माहिती मिळू शकली नाही. पोलीस अंमलदाराने विष घेतल्याची माहिती जिल्हा पोलीस दलात पसरल्याने खळबळ उडाली आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी): आज दि. 17/03/2022 रोजी Dysp संदिप मिटके   श्रीरामपूर विभाग,अहमदनगर यांना श्रीरामपूर शहरातील वैभव लॉज मध्ये भगवान विश्वासराव क्षत्रीय वय 68 रा वैभव लॉज वॉर्ड न 5 श्रीरामपूर ( लॉजमालक) हा हायप्रोफाइल  महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत आहे असे खात्रीशिर बातमी मिळाली.  त्याप्रमाणे Dysp संदिप मिटके  यांनी PI सानप श्रीरामपूर शहर , व अंमलदार यांचे पथक तयार करुन श्रीरामपूर शहरातील वैभव लॉज येथे बनावट ग्राहक पाठवुन शासकीय पंचासमक्ष छापा टाकुन दोन पिडीत महिलांची सुटका केली असून आरोपी भगवान विश्वासराव क्षत्रीय वय 68 रा वैभव लॉज वॉर्ड न 5 श्रीरामपूर ( लॉजमालक)व विश्वास रामप्रसाद खाडे वय 26 रा कांदा मार्केट,शेळके हॉस्पिटल शेजारी श्रीरामपूर्  यांस ताब्यात घेण्यात आलेले आहे. आरोपी विरुध्द श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे प्रचिलीत कायदयान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम चालु आहे.सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा.  स्वाती भोर,  यांचे मार्गदर्शनाखाली  Dysp संदीप मिटके ,PI सानप, Api  विठ्ठल पाटील,PN करमल पो कॉ नितीन शिरसाठ,  पो कॉ गौतम लगड, राहुल नरोडे, रमिझ् आत्तार  म पो कॉ सरग, गलांडे आदींनी केली.

बेलापुर (प्रतिनिधी  )- प्रदेश तेली महासंघाच्या अध्यक्षपदी बेलापुर येथील सामाजिक कार्यकर्ते एकनाथ उर्फ लहानुभाऊ नागले यांची बिनविरोध निवड करण्यात आली  आहे तेली महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष           भागवतराव लुटे यांच्या अध्यक्षतेखाली   जिल्हाध्यक्ष निवडीबाबत बैठक बोलविण्यात आली होती या वेळी महासंघाचे मार्गदर्शक. विठ्ठलदास लुटे उपस्थित होते बैठकीत  जिल्ह्यातील सामाजिक विषय व संघटनेच्या पुढिल वाटचाली विषयी सकारात्मक चर्चा झाली,तसेच जुनी जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करुन नुतन  कार्यकारिणी बनविण्यासाठी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि जेष्ठ मार्गदर्शक  जयदत्तजी क्षिरसागर व प्रदेशाध्यक्ष श्री. विजयभाऊ चौधरी यांच्या संमतीने सर्वाधिकार नागले यांना देण्यात आले.

      या वेळी नुतन जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले यांना निवडीचे नियुक्ती पत्र श्री. भागवतराव लुटे यांच्या हस्ते देवुन त्यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी संघटनेचे प्रदेश सेक्रेटरी मा. श्री. विजयजी काळे,विभागिय अध्यक्ष मा. श्री. अरविंद शेठ {कारभारी}दारुणकर, युवा जिल्हाध्यक्ष सोमनाथशेठ देवकर,  प्रभाकरराव लुटे. राजेंद्रभाऊ म्हस्के,. कैलासजी बनसोडे,. अनिलशेठ जाधव, देविदास कहाणे  दिपक नागले संतोष मेहेत्रे बाळकृष्ण दारुणकर नितीन फल्ले अँड विजय साळूंके रामेश्वर नागले संदीप सोनवणे योगेश शिंदे सागर ढवळे प्रविण नागले शुभम नागले आदि मान्यवर उपस्थित होते शेवटी प्रभाकर लुटे यांनी आभार मानले

श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर शहरात काल पोलीस उमहानिरीक्षक पथकाने जुगार खेळणार्‍या क्लबवर छापा टाकून पोलिसांनी 2 लाख 43 हजार 780 रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. यात 20 जणांना ताब्यात घेण्यात आले होते तर एक जण पसार आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.श्रीरामपूर शहरात जुगार, मटका, तसेच अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. शहरात अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय आहे तसेच पोलीस उपविभागाीय कार्यालय असतानाही शहर पोलीस ठाण्याचे दुर्लक्ष असल्याचे यावरून स्पष्ट होते. पोलीस उमहानिरीक्षक पथकाने दोन तीन ठिकाणी छापे टाकले. यात तिरट नावाचा पत्याचा जुगार पैसे लावून खेळत असताना पकडले. यात दिनेश मोहनदास माखिजा, चंद्रकांत गोपीनाथ गुडधे, नसीम मुख्तार शेख, अमरजितसिंग, जावेद खलिद मलिक, रोहिदास अडागळे, सुखदेव गांगुडेर्र्, जाफर करीम शेख, जुनेद असलम मेमन, सलमान हसन कुरेशी, समीर शेळके,जैनुद्दीन याकूब शेख, तुषार नाणेकर, राजेश गोसावी,अजमल नासिर शेख, सर्फराज बाबा शेख, अकील शेख, अमजद पठाण यासह अन्य 21 जण तिरट नावाचा जुगार खेळत असताना पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून 45780 रुपये रोख रक्कम, 63 हजारांचे 15 मोबाईल, 1 लाख 55 हजारांच्या पाच मोटारसायकल असा एकूण 2 लाख 43 हजार 780 रुपयांचा ऐवज हस्तगत केला.याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक सुरेश मराठे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. 160/2022 प्रमाणे मुंबई जुगार अ‍ॅक्ट 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी )- एकीकडे दिवाळीपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी स्टँड ओस पडलेले असताना दुसरीकडे या एसटी स्टँडवर खाजगी वाहतूक करणाऱ्या काळ्या पिवळ्या गाड्या बिनदिक्कतपणे आत मध्ये उभ्या राहत असून तेथेच प्रवासी सुद्धा भरले जात आहेत. विशेष म्हणजे एस टी डेपो सध्या सुरू आहे . सर्व अधिकारी कामावर हजर आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्यासमोर या काळया पिवळ्या गाड्यांचे अतिक्रमण बसस्थानकामध्ये झालेले आहे. त्यामुळे एस टी महामंडळाच्या अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने काळया पिवळ्या गाड्यांनी श्रीरामपूरच्या बसस्थानकावर ताबा मिळविल्याचे चित्र सध्या रोज पाहायला मिळत आहे.

गेले अनेक महिने एस टी कर्मचाऱ्यांचा संपूर्ण राज्यात सुरू आहे.श्रीरामपूर डेपो मध्ये काही कर्मचारी हजर झालेले असल्याने नगर,पुणे, औरंगाबाद, नाशिक इत्यादी ठिकाणच्या बसगाड्या सुरू आहेत. मात्र बहुतांश वेळ बसस्थानकामध्ये शुकशुकाट असतो. याचाच फायदा घेत काळ्या पिवळ्या गाड्या चालवणाऱ्या चालकांनी बसस्थानकाचा ताबा घेतला आहे. नगर, संगमनेर,नेवासा या मार्गावर श्रीरामपूरातून काळया पिवळ्या गाड्या चालू असल्याने जनतेची बऱ्यापैकी प्रवासाची सोय झालेली आहे हे निर्विवाद. पूर्वी या गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या करून भरल्या जात होत्या. मात्र त्या बंद असल्यामुळे रिकाम्या बसस्थानकाचा सदुपयोग म्हणून कि काय या सर्व काळात या खाजगी गाड्या बसस्थानकामध्ये एका रांगेत उभ्या केल्या जातात आणि तेथूनच भरल्या देखील जातात. त्यामुळे श्रीरामपूरचे बसस्थानक एस टी महामंडळाने काळ्या पिवळ्या गाड्याची वाहतूक करणाऱ्या लोकांना कराराने दिले आहे कि काय ? असा प्रश्न सध्या श्रीरामपूरकरांना पडला आहे.

नजिकच्या काळामध्ये एस टी बसेस सुरू होण्याची शक्यता नाही . त्यामुळे जनतेची गैरसोय दूर होण्यासाठी या काळया पिवळ्या गाड्यांचा निश्चितपणे मोठा हातभार लागला आहे . प्रवासी वाहतुकीचे सर्व नियम मोडून या गाड्यांमधून प्रवासी भरले जातात . त्याबद्दल ही नागरिकांची तक्रार नाही . कारण गरजू लोकांना प्रवास करणे क्रमप्राप्त असल्याने ते या गाड्यांमधील सर्व प्रकारच्या गैरसोयी सहन करत आपला प्रवास करीत असतात . नगर लाईनवर चालणारे गाड्यांचे चालक हे किमान सौजन्याने तरी वागतात . मात्र संगमनेर लाईन वर चालणाऱ्या गाड्यांच्या बाबतीत नागरिकांच्या मोठ्या तक्रारी आहेत . त्यात ही आता या गाड्यांनी राजरोसपणे श्रीरामपूरच्या बसस्थानकावर ताबा मिळविल्याने व तेथूनच या गाड्यांची वाहतूक होत असल्याने भविष्यामध्ये काळा पिवळ्या गाड्यांसाठी श्रीरामपूरचे बसस्थानक हे माहेर घर बनण्याची शक्यता आहे . एस टी च्या स्थानिक अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने या गाड्या एसटी स्टँड मध्ये लावल्या जातात .ज्या अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने या गाड्या बस स्थानकात लावण्यात येत आहेत त्या अधिकाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात यावा अशी मागणी शहरवासीयांनी एस टी महामंडळाच्या जिल्हा नियंत्रक यांच्याकडे केली आहे.


श्रीरामपूर प्रतिनिधी-शासनाने पंधरा वर्षानंतर सर्व प्रकारची वाहने  बंद करण्याचा निर्णय घेतला आहे .मात्र त्यामुळे अनेक वाहने बिनधास्तपणे व परिवहन अधिकाऱ्यांची परवानगी नसतानाही स्क्रॅप केली जात आहेत. त्यामध्ये कागदपत्रे असणारी व कागदपत्रे नसणारी अशी अनेक वाहने स्क्रॅप केली जात असून त्यामध्ये चोरी केलेल्या वाहनांचा समावेश असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या स्क्रप होणाऱ्या वाहनांवर नियंत्रण यावे व त्यासाठी शासनाने स्वतंत्र पथक किंवा पोलीस नियंत्रणासाठी नियुक्त करावेत. व विनापरवाना स्क्राप करणाऱ्या स्क्रॅप धारकांवर कडक कारवाई करावी. अशी मागणी आता होत आहे.केंद्र शासनाने 15 वर्षा

नंतर सर्व प्रकारची वाहने स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंधरा वर्षे झाल्यानंतर अनेक वाहने स्क्रप करण्यात येत आहेत. मात्र या स्क्रॅप होणाऱ्या वाहनांवर कोणाचेही नियंत्रण नाही. यासंदर्भात उपविभागीय परिवहन अधिकारी श्रीरामपूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्क्रॅप होणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना परिवहन विभागातून परवानगी घ्यावी लागते .तरच अशी वाहने स्क्रॅप करता येतात. मात्र श्रीरामपूर शहराप्रमाणेच इतर ठिकाणीही दररोज अनेक वाहने स्क्रॅप केली जात आहेत. मग ती वाहने खरंच पंधरा वर्षे झालेली आहेत की चोरीचे आहेत. याचाही तपास लागत नाही .श्रीरामपूर शहरात तर अनेक तरुणांनी असे व्यवसाय टाकले आहेत व ते गब्बर होत चालले आहेत. मात्र यातून खरंच कायदेशीर हा व्यवसाय होत आहेत का? हा खरा प्रश्न आहे. जर विभागीय परिवहन अधिकाऱ्याची परवानगी नसतानाही वाहने स्क्रॅप केली. तर अशा वाहनधारकांवर, गॅरेज मालकांवर , व स्क्रॅप करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी. जेणेकरून बेकायदेशीरपणे वाहने स्क्रॅप करणाऱ्या टोळीवर नियंत्रण येईल .अनेक तरुण त्यामुळे विविध ठिकाणाहून वाहनांच्या चोरी करतात व ही वाहने स्क्रॅप केली जातात . श्रीरामपूर शहरांमध्ये दोन रुपये किलोने  वाहने स्क्रॅप करून दिली जातात. त्यामुळे वाहने चोरीला ही आणखी पाठबळ मिळत आहेत. शिवाय अशी वाहने विविध ठिकाणी स्क्रप केली जात असल्यामुळे या स्क्रॅप वाहनांच्या रस्त्यावरच अस्ताव्यस्त पडलेल्या सुट्ट्या भागामुळे इतर नागरिकांना येण्या-जाण्यास अडथळा होतो. अनेक जण त्यामुळे जखमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोणतेही वाहन स्क्रप होताना विभागीय परिवहन कार्यालयाची किंवा अधिकाऱ्याची त्यास परवानगी हवी .जर‌ ती नसल्यास किंवा कोणतीही वाहन स्क्रॅप विनापरवाना होत असेल तर अशा वाहन स्क्रॅप करणाऱ्यांवर  त्वरित कारवाई व्हावी. अशी मागणी आता जोर धरू लागली असून यासाठी परिवहन विभाग, पोलीस यंत्रणा व शासनाने याकडे अधिकाधिक लक्ष देऊन या विनापरवाना स्क्रॅप होणार्‍या वाहनांवर नियंत्रण यावे म्हणून स्वतंत्र पथक निर्माण करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे नागरिकांडुन बोलले जात आहे.



MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget