अहमदनगर प्रतिनिधी-विषारी पदार्थ घेऊन एका पोलीस अंमलदाराने जीवन संपविले. सोमनाथ बापू कांबळे (रा. विळद ता. नगर) असे मयत पोलीस अंमलदाराचे नाव आहे. ते पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षात नेमणुकीस होते. त्यांनी विषारी पदार्थ कोणत्या कारणातून घेतला, याची माहिती अद्याप समोर आली नसून या घटनेमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.नगर तालुक्यातील इमामपूर शिवारात कांबळे यांनी तीन दिवसांपूर्वी विषारी पदार्थ घेतला होता. त्यांना उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरूवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कांबळे हे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षात नेमणुकीस होते. त्यांनी अनेक हरवलेल्या मुले-मुली, महिला-पुरूष यांचा शोध घेण्याचे काम केले आहे. त्यांनी कोणत्या कारणातून विष घेतले याची माहिती मिळू शकली नाही. पोलीस अंमलदाराने विष घेतल्याची माहिती जिल्हा पोलीस दलात पसरल्याने खळबळ उडाली आहे.
Post a Comment