बेलापुर (प्रतिनिधी )- प्रदेश तेली महासंघाच्या अध्यक्षपदी बेलापुर येथील सामाजिक कार्यकर्ते एकनाथ उर्फ लहानुभाऊ नागले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तेली महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष भागवतराव लुटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्ष निवडीबाबत बैठक बोलविण्यात आली होती या वेळी महासंघाचे मार्गदर्शक. विठ्ठलदास लुटे उपस्थित होते बैठकीत जिल्ह्यातील सामाजिक विषय व संघटनेच्या पुढिल वाटचाली विषयी सकारात्मक चर्चा झाली,तसेच जुनी जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करुन नुतन कार्यकारिणी बनविण्यासाठी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि जेष्ठ मार्गदर्शक जयदत्तजी क्षिरसागर व प्रदेशाध्यक्ष श्री. विजयभाऊ चौधरी यांच्या संमतीने सर्वाधिकार नागले यांना देण्यात आले.
या वेळी नुतन जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले यांना निवडीचे नियुक्ती पत्र श्री. भागवतराव लुटे यांच्या हस्ते देवुन त्यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी संघटनेचे प्रदेश सेक्रेटरी मा. श्री. विजयजी काळे,विभागिय अध्यक्ष मा. श्री. अरविंद शेठ {कारभारी}दारुणकर, युवा जिल्हाध्यक्ष सोमनाथशेठ देवकर, प्रभाकरराव लुटे. राजेंद्रभाऊ म्हस्के,. कैलासजी बनसोडे,. अनिलशेठ जाधव, देविदास कहाणे दिपक नागले संतोष मेहेत्रे बाळकृष्ण दारुणकर नितीन फल्ले अँड विजय साळूंके रामेश्वर नागले संदीप सोनवणे योगेश शिंदे सागर ढवळे प्रविण नागले शुभम नागले आदि मान्यवर उपस्थित होते शेवटी प्रभाकर लुटे यांनी आभार मानले
Post a Comment