बेलापुरात विविध संस्था शिवप्रेमी संघटनाच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्सहात साजरी
बेलापुर (प्रतिनिधी )-ग्रामपंचायत , बेलापुर विविध कार्यकारी संस्था , देवा गृप ,नगर रोड मित्र मंडळ , शिवप्रतिष्ठाण तसेच विविध संघटनाच्या वतीने बेलापूरात शिवजयंती मोठ्या उत्सहात संपन्न झाली बेलापूरातील मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ग्रामस्थांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आले बेलापुर ग्रामपंचायत विविध कार्यकारी सेवा संस्था बेलापुर नगररोड मित्र मंडळ शिवप्रतिष्ठाण व देवा गृपच्या वतीने वाबळे मैदानात महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले नगर रोड मित्र मंडळाच्या वतीने बेलापूर नगरीची शान आयपीएस झालेले अभिषेक दुधाळ यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते महाआरती नंतर खिचडी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला या वेळी जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे पंचायत समीती सदस्य अरुण पा नाईक बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले माजी सरपंच भरत साळूंके कै.मुरलीधर खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड रणजित श्रीगोड सुवालाल लुक्कड प्रमोद कर्डीले सुनील मुथा अनिल नाईक पुरुषोत्तम भराटे कलेश सातभाई चंद्रकांत नाईक भगवान सोनवणे जालींदर कुऱ्हे जेष्ठ पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा लहानु नागले सुशिल राका अभिजित राका चांगदेव मेहेत्रे शिवाजी पा वाबळे महेश कुऱ्हे मुसा शेख विलास मेहेत्रे दत्ता कुऱ्हे प्रकाश कुऱ्हे विश्वनाथ गवते प्रशांत लड्डा अनिल पवार डाँक्टर शैलेश पवार गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे सचिन वाघ सागर ढवळे आमोल गाढे शफीक आतार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे रामेश्वर ढोकणे हरिष पानसंबळ निखील तमनर आदिसह ग्रामस्थ शिवप्रेमी उपस्थित होते
Post a Comment