सिन्नर वार्ताहर-तालुक्यातील पाथरे परिसरातील मातोश्री हॉटेलवर अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे यांच्या पथकाने छापा टाकत हजारोंचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे.गेल्या काही दिवसांपासून केदार यांच्याकडून जिल्ह्यातील अवैध गुटखा, मद्य व अंमली पदार्थांची अवैध वाहतूक व विक्री रोखण्यासाठी कारवाईचा धडाका सुरु आहे. त्याअंतर्गत सिन्नरमधील पाथरे शिवारातील हॉटेल मातोश्री येथे अवैध दारुसाठा करुन विक्री होत असल्याची गुप्त माहिती नुकतीच केदार यांना मिळाली होती. त्यांनी ग्रामीण पोलिस अधीक्षक सचीन पाटील यांच्या मागदर्शनाखाली आपल्या पथकाला सदर हॉटेलवर नजर ठेवण्यास सांगितले होते.त्यावरुन शुक्रवारी (दि. 18) सायंकाळी पथकाला खात्री पटल्यानंतर त्यांनी हॉटेलवर छापा मारत 12 हजार 554 रुपयांचा देशी व विदेशी मद्यसाठा जप्त केला. हॉटेल चालक रवींद्र देवमन मोकळ रा. पाथरे हा बेकायदेशीरपणे चोरट्या रीतीने देशी व विदेशी दारुची साठवणूक करून विक्री करतांना आढळल्याने त्याच्यावर वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून साडेबारा हजारांचा अवैद्य साठा जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी कांगणे यांच्या पथकातील पोलीस नाईक रावसाहेब कांबळे, भाऊसाहेब टिळे, वैष्णव यांनी केली.अवैद्य विक्री थाबवण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात छोट्या हातगाड्यांसह धाब्यांवर सर्रासपणे अवैध दारुसाठा करुन विक्री सुरु आहे. कुठल्याही प्रकारचा परवाना नसूनही बिंधांस्तपणे अशा ठिकाणी सर्रास मद्याची विक्री होत असल्याने अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
Post a Comment