बेलापुर (प्रतिनिधी )-मासीक बैठक नियमानुसार न घेता आगोदरच सत्ताधारी गटाच्या सह्या ईतिवृत्तावर घेवुन विरोधकांना गैरहजर दाखविण्याचा चुकीचा प्रकार बेलापुर ग्रामपंचायतीत सुरु असुन तो थांबविण्यात यावा अशी मागणी विरोधी सदस्य रविंद्र खटोड यांनी केली आहे.ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे यांना दिलेल्या निवेदनात माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य रविंद्र खटोड यांनी पुढे म्हटले आहे की बेलापुर ग्रामपंचायतीत सत्ताधारी मन मानेल तसा कारभार करत असुन विरोधकांना विश्वासात न घेता चुकीच्या पध्दतीने कामकाज करत आहेत अशा प्रकारे चुकीचे होणारे कामकाज थांबविण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. बेलापुर ग्रामपंचायतीच्या मासीक बैठकीचे आज दिनांक ३०मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजता आयोजन करण्यात आले होते .मासीक बैठकीसाठी रविंद्र खटोड व भरत साळूंके सह विरोधी सदस्य ग्रामपंचायत कार्यालयात आले असता बैठकीची वेळ झालेली असतानाही सत्ताधारी सदस्य हजर नसल्याचे लक्षात येताच खटोड व साळूंके यांनी ईतिवृत्ताची मागणी केली व मासीक बैठकीच्या ईतिवृत्तावर सह्या करण्यासाठी पाहीले असता त्या ईतिवृत्तावर विरोधी सदस्य वगळता सर्वांच्या सह्या असल्याचे लक्षात आहे सदस्य बैठकीला नसतानाही सह्या कशा झाल्या याचे कोडे विरोधकांना उलगडले नाही त्यांनी पत्रकार व इतर कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात बोलविले व सह्या झालेले ईतिवृत्त दाखविले त्या नंतर बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले रविंद्र खटोड भरत साळूंके यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दुरध्वनी केला त्या नंतर सर्व जण तक्रार करण्यासाठी पंचायत समीतीत गेले तेथे त्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना लेखी दिले तसेच सदर बाब ही अतिशय गंभीर असुन त्या बाबत आपण योग्य ती कारवाई न केल्यास गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा ईशाराही खटोड व साळूंके यांनी दिला आहे या बाबत सरपंच महेंद्र साळवी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की बैठकीचे कामकाज नियमानुसारच झालेले आहे मार्च अखेर असल्यामुळे वसुली व इतर कामकाजामुळे बैठक लवकर आटोपती घ्यावी लागली त्या वेळेपर्यत विरोधक आलेले नव्हते परंतु बैठकीचा कोरम पुर्ण झाल्यामुळे बैठक सुरु करुन आटोपती घेण्यात आली असुन विरोधकांचे कामच आहे आरोप करणे परंतु आमचा कारभार स्वच्छ व पारदर्शी असल्यामुळे विरोधकांना तक्रारीस वावच नसल्यामुळे हा खोटा उपद्व्याप केला जात असल्याचे साळवी यांनी म्हटले आहे .

Post a Comment