वसुली बाबत व्हायरल झालेल्या क्लिपची पोलीस अधिक्षकाकडून गंभीर दखल पोलीस निरीक्षकाची बदली तर दोघे निलंबीत.
श्रीरामपुर /( खास प्रतिनिधी )-अवैध धंदेवाल्याकडून हप्तेवसुली संदर्भात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना तातडीने पोलीस नियंत्रण कक्षअहमदनगर येथे नेमणूक करण्यात आली असुन दोघा पोलिसांना निलांबीत करण्यात आले आहे. अवैध धंद्यावाल्याकडून वसुली बाबत पोलीस निरीक्षक मधुकर साळवे व पोलीस वैरागर तसेच राऊत यांच्या संभाषणाची आँडीओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती त्याची दखल घेवुन जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी हे आदेश काढले आहेत.त्या संभाषणात पोलीस निरीक्षक मधुकर साळवे हे राऊत यास वसुलीचे काम वैरागर याच्याकडे देण्यात आले असुन तु वसुली करु नको कुणाकडे जावु नको असे सांगत आहेत या सर्व गंभीर प्रकरणाची पोलीसा अधिक्षक मनोज पाटील यांनी गंभीर दखल घेत ताताडीने पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची नगर मुख्यालयात नियत्रंण कक्षात बदली केली आहे तर पोलीस शिपाई लक्ष्मण दशरथ वैरागर, कॉन्स्टेबल योगेश शिवाजी राऊत यांना निलंबीत केले आहे हे दोघेही श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत होते.
व्हायरल झालेल्या क्लिप मध्ये अधिकारी वसुली संदर्भात सल्ला देत असल्याचे ऐकु येते. वसुलीचे काम दुसऱ्याचे असल्याचे या अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याला म्हटल्याचे क्लिप मध्ये स्पष्ट होते. यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याची धमकी कर्मचाऱ्यांनी दिली आहे. या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत एस पी मनोज पाटील यांनी पोलीस निरीक्षक साळवे यांची बदली तर दोघांच्या निलंबनाचे आदेश काढत चौकशी सुरू केली आहे.तर श्रीरामपूर पोलिसांतून आणखी दोन संशयाच्या भवर्यात.