श्रीरामपूर प्रतिनिधी - श्रीरामपूर नगरपालिकेत वारसा हक्काने माझ्या मुलास नोकरी मिळावी, या मागणीसाठी तारा रमेश बागडे या महिलेने नगरपालिका कार्यालयासमोर सोमवार दि. 24 जानेवारी 2022 पासून अमरण उपोषण सुरु केले असून काल दुसर्या दिवशीही कडाक्याच्या थंडीत महिलेचे उपोषण सुरुच होते.नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना बागडे यांनी यापुर्वीच निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, वारसा हक्काने माझ्या मुलास सेवेत रुजू करुन घेणेकामी आपण नगरपालिका प्रशासनाला वेळोवेळी अर्ज सादर केलेले आहेत. सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून तुमचा विचार करता येत नाही, असे नगरपालिका प्रशासन नेहमी व वारंवार एकच उत्तर देत आहे. सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आपण या अगोदर नगरपालिकेमध्ये अनेक लोक अवॉर्डमधील वारसाहक्काने घेतलेले आहेत. त्यांच्यासाठी वेगळा कायदा आहे का? त्यांच्यासाठी सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ट नाही का? याचा खुलासा करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.उपोषणाचा कालचा दुसरा दिवस होता. काल सायंकाळपर्यंत प्रशासनातील कोणीच उपोषणस्थळी भेट न दिल्याने आपल्या न्याय्य हक्कासाठी सुरु केलेले उपोषण यापुढेही सुरुच ठेवणार असल्याचे तारा बागडे यांनी म्हटले आहे.
Post a Comment