तीन गावठी कट्टे व जिवंत काडतूस सह तिघे गजाआड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांची मोठी कारवाई.
नाशिक प्रतिनिधी - नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आज (दि २६) सुरगाणा तालुक्यातील बोरगाव ते सुरगाणा रस्त्यावर चीराई स्टॉप त्रिफुलीजवळच्या नागशिवडी शिवारात छापा टाकला. यादरम्यान, अवैधरित्या घातक अग्निशस्त्र बाळगणाऱ्या संशयितांना ताब्यात घेतले.या कारवाईत अंकेश सुरेश एखंडे, वय-२९ वर्षे, रा-गोडंब, सुरगाणा, श्यामराव नामदेव पवार, वय-२४ वर्षे, रा-वांजुरपाडा, सुरगाणा, आकाश सुनिल भगरे, वय २२ वर्षे, रा. सुरगाणा यांच्या ताब्यातून ०३ देशी बनावटीचे पिस्टल (गावठी कट्टे) व ०३ जिवंत काडतुसे तसेच ०१ एअर गण, ०१ चॉपर, ०१ कोयता, ०६ मोबाईल व ०१ टोयाटो कोरोला वाहन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सपोनि रामेश्वर मोताळे, सहापोउपनि नाना शिरोळे, पोहवा गोरक्षनाथ सवंत्सकर, पोहवा किशोर खराटे, पोहवा प्रविण सानप, पोना विश्वनाथ काकड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
Post a Comment