श्रीरामपूर (प्रतिनिधी) - येथील सामाजिक कार्यकर्त्या सुल्तानाबानो शाह यांची समाजवादी पार्टीच्या श्रीरामपुर शहर महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली,त्यांची सामाजिक कार्याच्याप्रती असलेली आवड तथा विविध सामाजातील उपेक्षित घटकांसाठी असलेली तळमळ पाहता समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार,श्रीरामपुर तालुकाध्यक्ष आसिफ तांबोळी, शहराध्यक्ष अय्यूब पठाण यांनी सुल्तानाबानो शाह यांच्यावर समाजवादी पार्टीच्या श्रीरामपूर महिला शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवत त्यांना नियुक्तीपत्र बहाल केले,यामुळे त्यांच्या कार्याना अधिक गती प्राप्त होऊन उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अधिक बळ प्राप्त झाले आहे . समाजवादी पार्टी हा राजकिय पक्ष आपल्या भारत देशात मोठे योगदान देणारा पक्ष असुन या पक्षाची महाराष्ट्र राज्याची धुरा प्रदेशाध्यक्ष माननिय आमदार आबु असिम आझमी संभाळत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर समाजवादी पार्टीची मोठी पक्षबांधणी सध्या सुरु आहे, तमाम बहुजन तथा वंचीत सामाज घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पक्षातर्फे कसोसीचे प्रयत्न केले जात आहे. शाह यांच्या निवडीबद्दल फातेमा शाह,हाजरा शाह,शाहीन पठाण,सईदा शेख,सोफिया शेख, इकरा पठाण,इमरान शेख, कलीम वेल्डर, अल्तमश शेख, अनवर तांबोळी, गुड्डू जमादार, समीउल्लाह शेख,आरिफ शाह, अज्जु शेख,सलीम शेख, अली पठाण,आदींनी त्यांच्या भावी उज्वल कारकिर्द आणि बाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Post a Comment