शिर्डी ( प्रतिनिधी)शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानने लाडू प्रसादासाठी हरिद्वार येथील मे.हर्ष फ्रेश डेअरी कडून शुद्ध गाईचे तूप घेतले होते. त्यापैकी 214 क्विंटल शुद्ध गाईचे तूप एक्सपायर झाल्यानंतरही त्याचा ईलिलाव काढून साई संस्थानने ते विक्री केले. मात्र अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 27 (तीन) अंतर्गत हा गुन्हा ठरतो. त्यामुळे साई संस्थांनच्या एक्सपायर तूप विक्री करणाऱ्या जबाबदार मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधितांवर गुन्हा दाखल व्हावा या संदर्भात आदेश द्यावेत .अशी मागणी एका पत्राद्वारे दैनिक साईदर्शनचे संपादक जितेश लोकचंदाणी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व संबंधित सर्व मंत्री व विभागाकडे केले आहे.या पत्रकात पुढे म्हटले आहे की,शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या साई प्रसादालयात लाडू प्रसाद बनविण्यासाठी खरेदी करण्यात आलेले 214 क्विंटल गाईचे शुद्ध तूप एक्सपायर झालेले असताना साईबाबा संस्थान ने इ लिलाव काढून ते विक्री करण्यात आले व यासंदर्भात साईसंस्थांनवर आरोप झाल्यानंतर अखाद्य म्हणून साई संस्थानने हे एक्सपायर तुप विक्री केल्याचे नंतर
जाहीर केले. मात्र माहिती अधिकारात अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागाकडून या संदर्भात माहिती मागितली असता त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये असे एक्सपायर झालेले अन्न हे अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 27 (3) अंतर्गत विक्री केल्यास गुन्हा ठरतो .असे असताना साई संस्थांनने हे एक्सपायर तुप इ लिलावाद्वारे विक्री कसे केले? असे एक्सपायर तूप विक्री केल्यामुळे साई संस्थांनच्या संबंधित अधिकाऱ्यांनी एक प्रकारे हा गुन्हाच केला आहे. त्यामुळे साई संस्थानच्या जबाबदार असणाऱ्या या एक्सपायर तुप विक्रीप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर संबंधितांवर अन्नसुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 27 (3)अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा. व त्यासाठी आपण या प्रकरणी विशेष लक्ष घालून संबंधित खात्याला तसे आदेश द्यावेत.अशी मागणी या पत्राद्वारे जितेश लोकचंदानी यांनी केली आहे.

Post a Comment