उर्दू शाळा मध्ये इ.१ ली ते ७ वी पर्यंतच्या सर्व मुली व दारिद्रय रेषखालील मुलांना सर्व शिक्षा अभियान योजने अंतर्गत गणवेश वाटप.
बेलापुर--(वार्ताहर) येथील जि.प. प्राथ. उर्दू शाळा मध्ये इ.१ ली ते ७ वी पर्यंतच्या सर्व मुली व दारिद्रय रेषखालील मुलांना सर्व शिक्षा अभियान योजने अंतर्गत गणवेश वाटप कार्यक्रम श्री. शरद नवले सदस्य जि. प. अहमदनगर यांचे अध्यक्षते खाली व महेंद्रजी साळवी सरपंच तसेच अभिषेक खंडागळे उपसरपंच यांचे उपस्थितीत पार पडले.या वेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात शरद नवले यांनी उर्दू शाळेला चार वर्ग खोल्या मंजूर झाल्याचे सांगीतले व भविष्यात शाळेची एक आदर्श इमारत करण्याचे आश्वासन दिले, तसेच ग्रामपंचायत तर्फे शाळेला सर्व काही मदत करण्याचे आश्वासन सरपंच व उपसरपंच यांनी दिले. तसेच आसिफभाई बागवान सदस्य शाव्य स यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी साठी शाळेला वाटर फिल्टर देण्याचे वचन दिले. तसेच अकबरभाई सय्यद अध्यक्ष शा.व्य.स. यांनी शाळेच्या अडी अडचणी मांडल्या , त्या वेळी शेख अकील, समीरशेख, आसिफ बागवान, शौकतकुरेशी, मुश्ताक अत्तार फिराज सय्यद, निसार शाह, अस्लम शेख, अस्लम अत्तार, मुनाफ पिंजारी आयशा बागवान, रूबीना बागवान सर्व सदस्य शा. व्य. स. उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेतील शिक्षक अनिस शेख यांनी केले तर प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापक जलील शेख यांनी केले तर अध्यक्ष निवड श्रीम जबीन बागवान यांनी केले तर उपस्थितांचे श्रीम. तरन्नुम खान यांनी आभार मानले कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी श्रीम. यास्मिन शेख, श्रीम. नसिबा बागवान, श्रीम महेरून्निसा खान, व अजरा शेख यांनी प्रयत्न केले.
Post a Comment