बेलापुर (प्रतिनिधी )-मतदानाच्या रुपाने अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी लोकसेवा विकास अघाडीच्या सर्वच्या सर्व संचालकांना निवडून दिले व आमच्यावर विश्वास दाखविला त्या विश्वासाला कधीच तडा जावू दिला जाणार नाही असा विश्वास माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी बेलापुर येथील आभार सभेत व्यक्त केला . लोकसेवा विकास अघाडीच्या आभार दौऱ्यानिमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश पा. नाईक हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे सुभाष पटारे जि प सदस्य शरद नवले बाजार समितीचे संचालक सुधीर नवले द्वारकनाथ बडधे सुवालाल लुक्कड ,रविंद्र खटोड सेवा संस्थेचे चेअरमन अनिल पा .नाईक,जालींदर कुऱ्हे,भास्करराव खंडागळे,विलास मेहेत्रे,उपसरपंच अभिषेक खंडागळे,दत्ता कु-हे,भास्कर बंगाळ, भाऊसाहेब कुताळ,शेषराव पवार,प्रकाश नवले,प्रभाकर कु-हे,सुरेश कु-हे,गावकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे उपस्थित होते .या वेळी बोलताना माजी आमदार भानुदास मुरकुटे म्हणाले की आसपासच्या तालुक्यातील कारखान्याची काय अवस्था आहे हे सुज्ञ मतदारांना ज्ञात असल्यामुळे त्यांनी लोकसेवा मंडळाच्या पुर्ण २१संचालकांना भरघोस मतांनी निवडून दिले .अशोक कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेर मोठ्या प्रमाणावर ऊस असुन आपण आजपर्यंत सभासदाप्रमाणेच त्यांच्याही ऊसाला भाव दिलेला आहे .केंद्र शासनाचे इथेनाँल निर्मितीला प्रोत्साहन असल्यामुळेअशोकच्या इथेनाँल प्रकल्पाची क्षमता वाढविण्याचा विचार असुन अधुनिक तंत्रज्ञानासह पाच हजार टन क्षमतेचा नविन प्रकल्प उभारण्याचा मानस आहे .तसेच विजनिर्मितीतही वाढ करण्याचे नियोजन आहे कारखाना प्रदुषणमूक्त करण्याचा आपला मानस आहे बेलापूरच्या जनतेने मला भरभरुन प्रेम दिले आहे त्यामुळे या परिसरात अशोक बंधाऱ्याची मालीका उभारली .भविष्यात आपल्या परिसराचा पाणी प्रश्न जटील होणार आहै त्या करीता कारखान्याच्या माध्यमातून उपाय योजना कराव्या लागतील .असेही ते म्हणाले. यावेळी जालिंदर कु-हे,बाळासाहेब वाबळे आदींनी मनोगत व्यक्त केले. या वेळी कलेश सातभाई, वसंतराव कुताळ,सुधाकर खंडागळे,विश्वनाथ गवते,शिवाजी वाबळे,आण्णा गारडे ,प्रकाश कुऱ्हे ,भरत सोमाणी,शरद देशपांडे ,प्रभाकर कुऱ्हे सुरेश कुऱ्हे,ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले,मुश्ताक शेख,राजेंद्र सातभाई,वृद्धेश्वर कु-हे,प्रभात कु-हे, सुभाष अमोलीक,शफीक बागवान,मोहसीन सय्यद,प्रसाद कु-हे,वैभव कु-हे,गोरक्षनाथ कु-हे, पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा,जिना शेख,रावसाहेब गाढे,सुरेश केशव कु-हे,राजेंद्र ओहोळ ,राजेंद्र कुताळ, गणेशबंगाळ,दादासाहेब कुताळ,सुधीर कोळसे,सुभाष खंडागळे, हेमंत कोळसे मोहसीन सय्यद,शफीक बागवान, विश्वनाथ गवते बाळकृष्ण खोसे,महेश कुऱ्हे,अजिज शेख जाकीर शेख,गोरख कुताळ, रावसाहेब अमोलिक, प्रभाकर ताके,उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केले. सूत्रसंचलन महेश कु-हे यांनी केले तर अनिल नाईक यांनी आभार मानले.
Post a Comment