बेलापुर (प्रतिनिधी )- अशोक सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी कारखान्याचे सूञधार माजी आ.भानुदास मुरकुटे यांची तर श्री.भाऊसाहेब उंडे यांची व्हा.चेअरमन पदावर एकमताने निवड झाली. अशोक कारखान्याचे चेअरमन व व्हा.चेअरमन पदाच्या निवडीसाठी निवडणूक अधिकारी श्री.गणेश पुरी यांचे अध्यक्षतेखाली व सहाय्यक निवडणुक अधिकारी श्री.एस.पी.कांदळकर यांचे उपस्थितीत नव निर्वाचित संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात कारखान्याचे सूञधार माजी आ.भानुदास मुरकुटे यांची पाच वर्षासाठी चेअरमन पदावर तर श्री.भाऊसाहेब उंडे
यांची एक वर्षासाठी व्हा.चेअरमन पदासाठी एकमताने निवड झाली. श्री.मुरकुटे यांनी यापूर्वी दोन वेळा दहा वर्षे चेअरमनपदाची धुरा सांभाळलेली आहे. आता त्यांची तिस-यांदा चेअरमन पदासाठी निवड झाली आहे. बैठकीस संचालक मंडळाचे सदस्य रावसाहेब थोरात, कोंडीराम उंडे, सोपानराव राऊत, हिम्मतराव धुमाळ, बाबासाहेब आदिक, आदिनाथ झुराळे, पुंजाहरी शिंदे, ज्ञानदेव पटारे, विरेश गलांडे, शितल गवारे, हिराबाई साळुंके, ज्ञानेश्वर काळे, प्रफुल्ल दांगट, यशवंत बनकर, रामभाऊ कसार, यशवंत रणनवरे, अमोल कोकणे, योगेश विटनोर, ज्ञानेश्वर शिंदे उपस्थित होते. सदर प्रसंगी माजी आ.भाऊसाहेब कांबळे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, साई संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, दिलिप नागरे, बाबासाहेब दिघे, सुरेश गलांडे, संजय छल्लारे, सुभाष पटारे, शिवसेनेचे सचिन बडधे, लाल पटेल, मुजफ्फर शेख, मुन्नाभाई पठाण, ज्ञानदेव साळुके, अच्युतराव बनकर, बाबासाहेब ढोकचौळे, एकनाथ लेलकर, अंबादास आदिक, भाऊसाहेब कहांडळ, दिगंबर शिंदे, दिगंबर तुवर, दत्ताञय नाईक, अॅड्.डी.आर.पटारे, माजी नगरसेविका सौ.मंजुश्री मुरकुटे, प्रा.सौ.सुनिताताई गायकवाड, सौ.शालिनी कोलते, शिवाजी पवार, गोकुळ औताडे, दिगंबर नांदे, दशरथ पिसे, रणजीत बनकर, भागवतराव पटारे, हनुमंतराव वाकचौरे, भागवतराव पवार, भास्करराव मुरकुटे, कचरु औताडे, सखाराम कांगुणे, दिगंबर बारस्कर, अण्णासाहेब चौधरी, कचरु वाकचौरे, मच्छिंद्र भवार, रामदास पटारे, रामदास विधाटे, आबासाहेब गवारे, सुमन नाईक, चंदा जाधव, स्वाती गवारे, संगीता गवारे, संगीता खंडीझोड, अर्चना रणनवरे, सुनंदा जाधव, अर्चना पवार, अश्विनी यादव, प्रियंका गवारे, नीरज मुरकुटे, चंद्रभान पवार आदींसह कार्यकारी संचालक संतोष देवकर, कार्यालयीन अधिक्षक आप्पासाहेब दुशिंग उपस्थित होते. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष केला.
Post a Comment