श्रीरामपूर प्रतिनिधी - भीम आर्मी भारत एकता मिशन चे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे साहेब, महाराष्ट्र प्रभारी दत्तू मेढे साहेब, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सीताराम गंगावणे साहेब, महाराष्ट्र राज्य प्रमुख संघटक दिपकजी भालेराव साहेब यांच्या आदेशानुसार भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन, महाराष्ट्र प्रदेश समन्वयक मा. पँथर ऋषी पोळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत.भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष साजिद भाई शेख यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन करण्यात आले.आंदोलनाचा विषय असा होता कि, _रोहन माळवदकर_ या मनुवादी लेखकाने "वास्तव" या पुस्तकात _भिमाकोरेगाव चा खोटा इतिहास लिहिला आहे. तसेच ब्राम्हण महासंघाने हि पुस्तके फुकट वाटू अशी बुरसटलेल्या विचारसरणीची मानसिकता दाखवली._ त्यांचे हे वक्तव्य महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाचे असल्यामुळे सदरच्या घटनेचा निषेध म्हणून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून काळी फीत लावून दिनांक 30/01/2022 रोजी सकाळी 11 वाजता निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आले. कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार तसेच श्रीरामपूर पोलीस प्रशासनाच्या अटीनुसार मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदरचे आंदोलन करण्यात आले.यावेळी भीम आर्मी महाराष्ट्र राज्य प्रमुख संघटक दीपकजी भालेराव साहेब, स्टुडंट्स फेडरेशन महाराष्ट्र प्रदेश समन्वयक पँथर ऋषी पोळ साहेब, महाराष्ट्र सदस्य गौरव भालेराव, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष साजिद भाई शेख, राहाता तालुकाध्यक्ष सुनील भाऊ मोकळ, राहाता तालुका संघटक शब्बीर भाई कुरेशी, स्टुडंट्स फेडरेशन राहाता तालुका संघटक साहिल गायकवाड,विश्वदीप सोनवणे आदी. पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment