September 2021

बेलापुर  (प्रतिनिधी  )--कोरोना पेशंटची संख्या वाढल्याने बेलापूर खुर्द गाव सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय कोरोना समीतीने घेतला असुन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी बेलापुर खूर्द रेड झोनमध्ये येत असल्या कारणाने गाव बंद ठेवण्याच्या सुचना दिलेल्या आहेत तसेच व्यवसायीकांनी दुकाने सुरु ठेवण्याची केलेली मागणी अमान्य करण्यात आली 

बेलापुर खुर्द या गावात जवळपास दहा कोरोना रुग्ण असुन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये त्या करीता गाव सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असुन गावात प्रवेश करणारे सर्व रस्ते बँरेकेट्स लावून बंद करण्यात आले आहे गावातील सर्व दुकाने अत्यावश्यक सेवाही पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे गावातील व्यवसायीकांनी दुकाने सुरु ठेवण्याची मागणी केली होती देवाण घेवाण वाढल्याने कोरोनाचा प्रसार होवू शकतो त्यामुळे सर्व व्यवसायीकांनी आपापले व्यवहार बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत


तहसीलदार प्रशांत पाटील यांनीही बेलापुर खूर्द या गावात रुग्ण वाढत असल्यामुळे नागरीकांनी आपली काळजी आपणच घ्यावी मास्क वापरा हात साबणाने स्वच्छ धुवा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा बाधीत व्यक्तींनी घरी न थांबता दवाखान्यात दाखल व्हावे असे अवाहनही तहसीलदार पाटील यांनी केले आहे 

बेलापूर खुर्द गावामध्ये कोरोना चे पेशंट वाढले असल्याने प्रशासनाने गाव सात तारखेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले असून बेलापूर खुर्द गावातील सर्व व्यापारी व दुकानदारांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांना व्यवसाय सुरू ठेवण्यात यावे अशी विनंती केली तसे निवेदनही देण्यात आले होते . 

याप्रसंगी उपसरपंच ॲड. दीपक बारहाते, हरिहर केशव गोविंद संस्थांचे अध्यक्ष बाळासाहेब हरदास, दुकानदार सुधाकर बारहाते, श्याम बडदे, जगन्‍नाथ भगत आदी उपस्थित होते.

 बेलापुर खूर्द गावात आत्तापर्यत १५ रुग्ण आढळून आले असुन काही रुग्ण बरे झालेले आहेत बरेच रुग्ण घरीच उपचार घेत आहेत हे चुकीचे असले तरी काही रुग्ण ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत .गावात रँपीड टेस्ट करण्यात आल्या असुन रुग्ण असणाऱ्या परिसरात विशेष खबरदारी  घेत आहे अशी माहीती   डाँक्टर देविदास चोखर आरोग्याधिकारी बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी दिली आहे

बेलापुर खूर्दला आज रोजी जास्त रुग्ण संख्या दिसत असली तरी यातील बरेचसे रुग्ण बरे झाले असुन केवळ दोन तीन जणच पाँजिटीव्ह आहेत शासनाकडे अहवाल उशीरा आलेला आहे तो पर्यत ते रुग्ण बरे झालेले होते रुग्ण आढळलेल्या परिसरातील सर्व नागरीकांच्या आरटीफीसीएल व रँपीड टेस्ट करुन घेतलेल्या आहेत गावात सर्वांना योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत अशी माही.ती उपसरपंच अँड दिपक बारहाते यांनी दिली.






बेलापूरः(प्रतिनिधी )-बेलापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच स्व.भागवतराव खंडागळे यांनी पिण्याच्या पाण्याच्या योजनेसह हरिहरनगर व  गावठाण येथे घरकुल वसाहत,खटकाळी बंधारा यासारखी विविध विकास कामे करुन गावाचे नाव उज्वल केले.त्यांचे कार्य तरुण पिढीला प्रेरणादायी असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली. बेलापूर गावला वीस वर्षे नेतृत्व देवून गावाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देणारे माजी सरपंच स्व.भागवतराव पा.खंडागळे यांची ग्रामपंचायतीच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यावेळी गावच्या दिवंगत सरपंच व उपसरपंच यांची पुण्यतिथी ग्रामपंचायतीच्या वतीने साजरी करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.यानिमित्त भागवत प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामपंचायतीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयास(रु.सात हजार),गावकरी आरोग्य निधीला(तिन हजार)तर माऊली वृध्दाश्रमास(दोन हजार)याप्रमाणे शरद नवले,प्रकाश नाईक,महेन्द्र साळवी,रवीन्द्र खटोड,भरत सोमाणी,शिवाजी वाबळे,पञकार देवीदास देसाई,दिलिप दायमा आदिंच्या हस्ते देणगी देण्यात आली.यानिमित्त जि.प.सदस्य शरद नवले,पं.समिती सदस्य अरुण पा.नाईक,भाजपाचे नेते सुनिल मुथा,सरपंच महेन्द्र साळवी,प्रवासी संघटनेचे  रणजित श्रीगोड, 'अशोक 'चे माजी व्हा.चेअरमन जालिंदर कु-हे पत्रकार देविदास देसाई  आदिंनी मनोगत व्यक्त करुन स्व.खंंडागळे यांच्या कार्याचा गौरव केला.उपसरपंच आभिषेक खंडागळे यांनी प्रास्ताविक  तर सुधाकर खंडागळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.                              याप्रसंगी जि प सदस्य शरद नवले,पंस सदस्य अरुण पा  नाईक,सरपंच महेंद्र साळवी,बेलापुर पत्रकार सांघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे सुनील मुथ्था,प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजित श्रीगोड,कै .मुरलीधर खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड,प्रकाश नाईक,जालिंदर कु-हे,देविदास देसाई,गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे,प्रकाश नवले,विष्णुपंत डावरे,भाऊसाहेब कुताळ,भरत सोमाणी,प्रफुल्ल डावरे,तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे,अजय डाकले,सुधाकर खंडागळे,शिवाजीराव वाबळे,पत्रकार सुहास शेलार, दिलीप दायमा,किशोर कदम रामेश्वर सोमाणी,विश्वास अमोलीक,चंद्रकांत नवले, मुस्ताक शेख, किरण गागरे, प्रकाश  कुऱ्हे ,प्रसाद खरात,पोलीस पाटील अशोक प्रधान,यादव काळे,रफिक बागवान,गणेश बंगाळ,दादासाहेब आढाव,राजेंद्र अमोलिक, प्रभात कुऱ्हे  ,शफीक बागवान,गोरख कुताळ, अन्वर बागवान, अमोल गाढे, महेश कु ऱ्हे,भाऊसाहेब वाबळे,रमेश लगे,प्रशांत लड्डा, जिना शेख, चंद्रकांत नवले, प्रशांत मुंडलिक, मास्टर हुडे,किशोर खरोटे,जाकीर हसन शेख,कुंदन कुताळ,बाबूलाल पठाण, शशिकांत तेलोरे,गफूर शेख,जावेद शेख, बाळू शेलार, सागर लाहोर,जय संचेती आदिंसह ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केले तर सुधाकर खंडागळे यांनी आभार मानले


श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )- शहरातील दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत असुन तक्रार करुनही कुणीच दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ साई मित्र मंडळाचे अध्यक्ष सागर तलवार यांनी भर रस्त्यावरच मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पक्के बांधकाम करण्याचा ईशारा दिला आहे                                  या बाबत पत्रकारांशी बोलताना सागर तलवार म्हणाले की शहरात ठिकठिकाणी अतिक्रमण वाढत आहे कुणाचाच त्यावर अंकुश राहीलेला नाही सत्ताधारी कुणाला दुःखावून आपले मत कमी करण्याच्या विचारात नाही तर विरोधकही अतिक्रमणाबाबत गप्प आहेत आता तर अनेक ठिकाणी रस्त्यावरच अतिक्रमण होत आहे सर्वसामान्यांनी आता दाद कुणाकडे मागायची सत्ताधारी व विरोधक हे कुणालाही दुखवायच्या मनःस्थितीत नाही त्यामुळे जो तो आपल्या पुढाऱ्यांच्या आड दडून अतिक्रमण करत आहे या बाबत तक्रार करुनही काहीच उपयोग होत नाही त्यामुळे आता साई मित्र मंडळाच्या वातीने रस्त्यावरच पक्के बांधकाम करुन गाळा बांधण्याचा निर्णय आमच्या मंडळाने घेतला असुन नगरपालीकेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता करण्याचा निर्णय घेण्यात आला असुन या कार्यक्रमामुळे विरोध सत्ताधाऱ्यांना काही वाटले नाही तरी निदान अतिक्रमण करणारांना जनाची नाही तर मनाची थोडीफार वाटेल असेही तलवार यांनी म्हाटले आहे.


बेलापुर  (देविदास देसाई  )- संक्रापुर तालुका राहुरी येथील तंटामुक्ती समीतीच्या अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणूकीत सत्ताधारी गटाचे शनैश्वर जगताप हे २५७ मते मिळून विजयी झाले असुन त्यांच्या विजयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले  उपाध्यक्ष पदी ईब्राहीम ईमाम शेख यांची बिनविरोध निवड झाली    तंटामूक्ती अध्यक्षाची निवड ही ग्रामसभेतुन सर्वानुमते घेण्याचा अधिकार हा सर्व ग्रामसभेला दिला असला तरी एकमत न झाल्यास काय करावयाचे? हे मात्र सांगितले गेले नाही त्यामुळे राहुरी तालुक्यात  तंटामूक्तीचा अध्यक्ष निवडण्यासाठी चक्क गुप्त मतदानाची पध्दत अवलंबविण्यात आली.राहुरी तालुक्यातील संक्रापुर या गावाच्या तंटामूक्त अध्यक्षाची निवड होण्याकरीता ग्रामसभा बोलविण्यात आली होती .मा. रामदास पांढरे यांच्या अध्क्षतेखाली ग्रामसभेत कामकाज झाले. तंटामुक्ती अध्यक्ष  निवडीबाबत एकमत न झाल्यानेगुप्त मतदानाने निवड करण्याचे ठरले  निवडणूकी प्रमाणेच सर्व प्रक्रिया पार पडली राहुरी तालुक्यातील संक्रापुर या गावच्या तटामूक्ती अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम ठरला होता परंतु गावात दोन्ही गट प्रबळ असल्यामुळे अध्यक्ष पदाबाबत एकमत होत नव्हते हात वर करुन अध्यक्ष निवडण्याचे ठरले परंतु त्यास अनेकांनी विरोध दर्शविला निवड ही गुप्त मतदान पध्दतीने घ्यावी असा सर्वानुमते निर्णय झाला अन सुरु झाली

गुप्त मतदानाची प्रक्रीया.  जगताप गटाच्या वतीने संक्रेश्वर महाविकास आघाडी  रोहीदास खपके यांनी अर्ज दाखल केला तर संक्रेश्वर जनसेवा मंडळाचे पांढरे गटाच्या वतीने शनैश्वर जगताप यांनी अर्ज दाखल केला खपके यांना कपबशी तर जगताप यांंना छत्री हे चिन्ह देण्यत आले  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक गायकवाड यांनी काम पाहीले मग काय तंटामूक्ती अध्यक्षाची निवडच तंट्यातून सुरु होवुन गुप्त मतदानावर संपली दोन्ही गटाच्या उमेद्वारांनी आपापली ताकद पणाला लावुन मतदार आणण्यासाठी चारचाकी दुचाकी वाहनाचा वापर सुरु केला   घरोघर जावुन मतदाराला गाडीत घालून मतदान  करवुन घेण्यासाठी दोन्ही गटाची चढाओढ सुरु झाली  एकुण ५०० मतदान झाले होते सायंकाळी चार  वाजता लगेच मतमोजणी करण्यात आली त्यात सरपंच रामा पांढरे यांच्या संक्लेश्वर   जनसेवा मंडळाचे शनैश्वर जगताप यांना २५७ मते मिळाली तर संजय जगताप यांच्या संक्लेश्वर महविकास आघाडीचे  उमेदवार रोहीदास खपके यांना २१० मते मिळाली १५ मते बाद झाली निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक काजल गायकवाड यांनी शनैश्वर जागताप यांना जास्त मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषीत केले   त्या करीता गावात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे तंटामुक्ती समीतीच्या अध्यक्ष पदासाठी गुप्त पध्दतीने मतदान घेवुन मतदान प्रक्रीयेद्वारे तंटामूक्ती अध्यक्ष निवडणारे राहुरी तालुक्यातील संक्रापुर हे पहीले गाव ठरले आहे. ग्रामसभेत खालील ग्रामस्थ उपस्थित होते.या वेळी जाफर शेख सरपंच रामा पांढरे उपसरपंच विठ्ठल पांढरे सुदर्शन बोरावके महेश बोरावके दावल शेख आप्पासाहेब जगताप दिलावर शेख विजय गोसावी रमेश सालबंदे गोकुळ सालबंदे गेनु चव्हाण बापुसाहेब चव्हाण संभाजी जाधव रामदास जाधव विजय जाधव सोपान जगताप लक्ष्मण चव्हाण राधाजी चव्हाण धर्मा चव्हाण शशिकांत भोंगळे कांतीलाल जगताप संपत जगताप साहेबराव जगताप उदयपाल जाधव बाळासाहेब जाधव सांजय किसन जगताप राजेंद्र जगताप पंढरीनाथ जगताप काशिनाथ जगताप अनिल जगताप चांगदेव पांढरे साहेबराव पांढरे अंकुश गरगडे सुभाष गाडेकर काशिनाथ पांढरे आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते


बेलापुर  (देविदास देसाई  )- तंटामूक्ती अध्यक्षाची निवड ही ग्रामसभेतुन सर्वानुमते घेण्याचा अधिकार हा सर्व ग्रामसभेला दिला असला तरी एकमत न झाल्यास काय करावयाचे? हे मात्र सांगितले गेले नाही त्यामुळे राहुरी तालुक्यात  तंटामूक्तीचा अध्यक्ष निवडण्यासाठी चक्क गुप्त मतदानाची पध्दत अवलंबविण्यात आली असुन मतदान सुरु झाले आहे.राहुरी तालुक्यातील संक्रापुर या गावाच्या तंटामूक्त अध्यक्षाची निवड होण्याकरीता बैठक बोलविण्यात आली होती परंतु निवडीबाबत एकमत न झाल्यानेगुप्त मतदानाने निवड करण्याचे ठरले  निवडणूकी प्रमाणेच सर्व प्रक्रिया पार पडणार असुन पाच वाजता मतमोजणी होणार आहे .राहुरी तालुक्यातील संक्रापुर या गावच्या तटामूक्ती अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम ठरला होता परंतु गावात दोन्ही गट प्रबळ असल्यामुळे अध्यक्ष पदाबाबत एकमत होत नव्हते हात वर करुन अध्यक्ष निवडण्याचे ठरले परंतु त्यास अनेकांनी विरोध दर्शविला निवड ही गुप्त मतदान पध्दतीने घ्यावी असा सर्वानुमते निर्णय झाला अन सुरु झाली गुप्त मतदानाची प्रक्रीया.  जगताप गटाच्या वतीने संक्रेश्वर जनसेवा मंडळाचे रोहीदास खपके यांनी अर्ज दाखल केला तर संक्रेश्वर विकास मंडळाचे पांढरे गटाच्या वतीने शनैश्वर जगताप यांनी अर्ज दाखल केला खपके यांना कपबशी तरा जगताप यांंना छत्री हे चिन्ह देण्यत आले  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक गायकवाड यांनी काम पाहीले मग काय तंटामूक्ती अध्यक्षाची निवडच तंट्यातून सुरु होवुन गुप्त मतदानावर संपली दोन्ही गटाच्या उमेद्वारांनी आपापली ताकद पणाला लावुन मतदार आणण्यासाठी चारचाकी दुचाकी वाहनाचा वापर सुरु केला मतदारांना अमिषही दाखविण्यात आले  घरोघर जावुन मतदाराला गाडीत घालून मतदान  करवुन घेण्यासाठी दोन्ही गटाची चढाओढ सुरु झाली शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा ७१९ मतदान झाले होते सायंकाळी पाच वाजता लगेच मतमोजणी होणार आहे त्या करीता गावात पोलीस बंदोबस्तही तैनातकरण्यात आला आहे.


श्रीरामपूर तालुका फोटोग्राफर असोसिएशन च्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या फेर निवडी झाल्या एक वर्ष अध्यक्ष पद ग्रामीण भागाकडे असेल तर  एक वर्ष हे शहर भागाकडे असेल या नियमाप्रमाणे यंदाचे अध्यक्षपद हे श्रीरामपूर ग्रामीण भागाकडे दिले असल्याचे मावळते अध्यक्ष रोहित साबळे यांनी बोलताना सांगितले.

श्रीरामपूर तालुका फोटोग्राफर असोसिएशन च्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या फेरणीवडीच्या बैठकीत साबळे बोलत होते.यावेळी झालेल्या बैठकीत अध्यक्ष पदी चितळी येथील चंद्रकांत वाघ यांची तर उपाध्यक्ष अमितराज आहेर  सोबतच चार नवीन संचालकांची निवड करण्यात आली यात सुशील रांका,सचिन पतंगे,गौरव शेटे आणि संघटनेच्या प्रसिद्धी प्रमुख पदी ऍड. प्रविण जमधडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या प्रसंगी अतिष देसरडा,तिलक डुंगरवाल, विशाल अंभोरे,अजय अहिरे,संतोष देसाई,राजू शेवंते,संजू पगारे,सुशील रांका,भानुदास बेरड,सचिन पतंगे, गौरव शेटे,अमितराज आहेर,संदीप गोडसे,अक्षय कुमावत, प्रविण जमधडे, उपस्थित होते.

मावळते अध्यक्ष रोहित साबळे यांनी सांगितले की 2015 संघटना स्थापन झाली आणि  2018 साली संघटनेची नोंदणी झाली तेव्हा पासून संघटना फोटोग्राफर च्या हिताचा विचार करून कार्य करत आहे.नोंदणी करते वेळी एक वर्ष अध्यक्षपद हे शहराकडे असेल तर एक ग्रामीण भागाकडे असेल  याच पार्श्वभूमीवर यंदाचे अध्यक्षपद हे ग्रामीण भागात देत असल्याचे साबळे यांनी सांगितले.तर पुढे तिलक डुंगरवाल यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांना निवडी बाबत शुभेच्छा दिल्या.

तर आज पर्यंत संघटनेने विविध सामाजिक उपक्रम घेतले त्याबद्दल माहिती विशद केली यामध्ये शालेय व महाविद्यालयीन स्तरावर यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस प्रेरणा मिळावी याकरता  त्यांच्या सह पालकांचा संघटनेने  गुणगौरव सोहळा आयोजित केला.  सोबतच फोटोग्राफर बंधूंच्या हिताची अनेक उपक्रम यात  विविध यशस्वी राज्यस्तरीय फोटोग्राफर यांचे  मार्गदर्शनपर शिबीर आयोजित केले. फोटोग्राफर बंधूंसाठी एक लाख रुपयाचा अपघाती विमा देखील संघटनेच्या माध्यमातून काढण्यात आला. पर्यावरणाचा समतोल राहावा यादृष्टीने संघटनेने आज पर्यंत विविध सामाजिक कार्यक्रम घेतले त्यामध्ये वृक्षरोपण वृक्ष संगोपन असे कार्यक्रम होते तर येत्या काळात संघटना ही फोटोग्राफरच्या प्रत्येक सुख दुःखात सहभागी असेल कोणत्याही अडचणीला सामोरे जाण्यासाठी संघटनेचा फोटोग्राफर हा एकटा नसून त्याच्या  कुटुंबासोबत श्रीरामपूर तालुका फोटोग्राफर असोसिएशन ही संघटना उभी असेल असा विश्वास यावेळी तिलक डुंगरवाल व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल अंभोरे यांनी केले,तर आभार संतोष देसाई यांनी मानले..



श्रीरामपूर (प्रतिनिधी)- काही विशिष्ट समाजातील लोकांनी समाजात उच्छाद मांडला असून हिंदू धर्माच्या आया-बहिणींच्या अब्रुशी खेळणे, विशिष्ट धर्मात हिंदूंचे धर्मांतर करणे तसेच लव जिहाद सारख्या घटना घडत आहेत. हे सर्व हिंदू धर्माच्या विरोधात षडयंत्र आहे. या षडयंत्राविरोधात शिवप्रहार प्रतिष्ठान लढा उभारणार आहे. त्यासाठी अठरा पगड जातीच्या हिंदूंनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे, असे आवाहन मा. पोलीस अधिकारी सूरज आगे यांनी केले.  श्रीरामपूर येथील उत्सव मंगल कार्यालयात अभूतपूर्व झालेल्या भगव्या मेळाव्यात ते बोलत होते.

पुढे बोलताना सूरज आगे म्हणाले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ज्यांच्यामुळे मंदिरे व हिंदु संस्कृती, धर्म सुरक्षित राहिला अशा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्रात तिथीला व तारखेला जयंती साजरी होते हे हिंदू संघटनासाठी खेदजनक असून छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती एकाच दिवशी साजरी होण्यासाठी सर्व हिंदू बांधवांना शिवप्रहार प्रतिष्ठानच्या माध्यमातून एकत्र करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात अनेक राजकीय पक्षांची सत्ता आली. अनेक मुख्यमंत्री झाले मात्र तिथीला जयंती साजरी करा म्हणणारे तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी शिवनेरीला डोकं टेकवतात. मात्र शिवजयंती एकाच दिवशी करण्याची भूमिका घेत नाही हे चुकीचे आहे.

सर्व हिंदू समाजाने एकत्रित येवून परिसरात चाललेल्या हिंदूविरोधी षडयंत्रापासून, हिंदू समाजाचे रक्षण व सर्व समाजाला एकत्रित करण्यासाठी भव्य भगवा मेळावा घेण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले. अनेक वर्षापासून संपूर्ण राज्यात हिंदू समाजाचे केवळ राजकारणासाठी, विभाजन करुन त्यांच्यावर अन्याय, अत्याचार केले. सर्वांच्या डोळ्यासमोर लव जिहाद, धर्मांतराचे षडयंत्र मोठ्या प्रमाणात सुरू असून देखील या संदर्भात कोणीही  बोलण्यास पुढे येत नाही. एवढेच नाही तर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. त्यांचा इतिहास शाळेच्या अभ्यासक्रमातून वगळून पुढच्या पिढीला हिंदू संस्कृतीपासून दूर केले जात आहे. ज्याप्रमाणे संपूर्ण राज्यभरात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. नगर जिल्ह्यात देखील काही विशिष्ट समाजातील लोकांनी उच्छाद मांडला आहे. हिंदू समाजातील आई-बहिणींच्या अब्रुशी खेळणे, विशिष्ट धर्मात हिंदूंचे धर्मांतर करणे, ठराविक परिसरात लोकवस्ती करुन, हिंदू धर्मातील संस्कृतीचा र्‍हास करणे, एवढेच नाही तर हातात नंग्या तलवारी घेवून हिंदू समाजावर दहशत निर्माण करण्याचे प्रकार घडत आहेत. हे सर्व काही घडत आहे. त्यामागे, काही विशिष्ट लोकांसह, राजकारणी व समतेची भाषा करणार्‍या सेक्युलरवादी लोकांचा हात असल्याने हिंदू समाजावर अनेक  पिढ्यांपासून अन्याय, अत्याचार होत आहेत. ही सर्व परिस्थिती बदलण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श आणि शिकवणी प्रमाणे, तसेच १८ पगड जातींना सोबत घेऊन काम करण्याची गरज निर्माण झाल्याने शिवप्रहार प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे, असे यावेळी मा. पोलीस अधिकारी सूरज आगे यांनी सांगितले.

शिवप्रहार प्रतिष्ठान हा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधीत नसून  कोणतेही राजकारण करणार नसून फक्त हिंदू धर्म, हिंदू संस्कृती व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर काम करणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी सूरज आगे यांच्या मनोगताला उपस्थित जनसमुदायाने प्रचंड दाद देवून आम्ही तुमच्या बरोबर असल्याचे दोन्ही हात वर करुन सांगितले. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची बातमी, पत्रक, अथवा आवाहन करण्यात आले नव्हते तरीही भगव्या मेळाव्याला हिंदू बांधवांनी स्वयंस्फुर्तीने मोठी गर्दी करण्याचा श्रीरामपूरच्या इतिहासात हा पहिला प्रसंग असल्याची बोलकी प्रतिक्रिया मेळाव्यानंतर शहरभर व्यक्त करण्यात येत होती. कार्यक्रमस्थळी सॅनिटायझर व मास्कची व्यवस्था करण्यात आली होती.  अठरा पगड जातींचा हिंदू धर्मअठरा पगड जातींना बरोबर घेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. अठरा पगड जातीतील लोकांनी स्वराज्यासाठी रक्त सांडले, शिवाजी महाराजांच्या काळात कोणीही उच्च किंवा कोणीही खालच्या जातीचा असा भेदभाव नव्हता. सर्व अठरा पगड जातीतील लोकांना महाराज एकसमान मानायचे याची अनेक इतिहासातील उदाहरणे देत सूरज आगे म्हणाले की, नंतरच्या काळातील स्वार्थी राजकारण्यांनी जाती-जातीत तेढ निर्माण केला. अठरा पगड जातींना बरोबर घेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माचे कार्य केले आणि तोच खरा शिवधर्म आहे.  त्यामुळे आगामी काळात अठरा पगड जातीनी भगव्या ध्वजाखाली एकत्र येवून जेथे जेथे भगवा झुकतोय असे वाटले तर त्या ठिकाणी एकत्रितपणे उभे राहण्याचे आवाहन केले.नेत्यांच्या पत्नींना ट्रॅक्टरमध्ये बसवा...भ्रष्टाचाराने सर्वसामान्यांना प्रचंड त्रास होतो. सध्या रस्त्याची गंभीर परिस्थिती आहे. नेवासा फाटा ते बाभळेश्‍वर फाटा या रस्त्यावर प्रचंड खड्डे झाले. सर्वसामान्य नागरिकांचे अपघात होवून त्यांना जीव गमवावा लागत आहे तरी खड्डे बुजत नाही. सर्व पक्षाच्या नेते मंडळींच्या पत्नींंना एका ट्रॅक्टरमध्ये बसवून नेवासा फाटा ते बाभळेश्‍वर जोराची चक्कर मारावी म्हणजे कळेल रस्त्यावर खड्डे किती? व जनतेला त्रास किती? असे सांगून मा. पोलीस अधिकारी सूरज आगे म्हणाले की, भ्रष्टाचारी वृत्तीमुळे असे प्रकार होतात. भ्रष्टाचार करणार्‍यांविरुद्धही शिवप्रहार प्रतिष्ठान लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. या त्यांच्या  वक्तव्यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.



बेलापुर (प्रतिनिधी  )-केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देताना मुंबई पुणे दिल्ली या ठिकाणी क्लासेस लावलेच पाहीजे हा समज चुकीच असुन आपल्या मनातील न्यूनगंड काढुन टाका यश तुमच्या मागे धावेल असा सल्ला यूपीएससी परीक्षेत ४६९वा रँक मिळवीणारे अभिषेक दुधाळ यांनी दिला आहे.   यूपीएससी परीक्षेत दुसऱ्यांदा चांगली रँक घेवुन उत्तीर्ण झाल्याबद्दल बेलापुर ग्रामपंचायत बेलापुर सेवा संस्था उपबाजार समिती बेलापुर कै मुरलीधर खटोड पतसंस्था गांवकरी पतसंस्था भाऊसाहेब वाबळे मित्र मंडळ बेलापुर पत्रकारांच्या व ग्रामस्थांच्या वतीने अभिषेक दुधाळ यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता त्या वेळी सत्काराला उत्तर देताना अभिषेक दुधाळ म्हणाले की माझ्या यशामध्ये माझे मार्गदर्शक आई वडील गुरुजन वर्ग मित्र परिवार त्याच बरोबर बेलापुर ग्रामस्थांचाही मोलाचा वाटा आहे .जिद्द चिकाटी व कठोर परिश्रम घेण्याची मनापासून तयारी ठेवली तर निश्चितच  यश मिळेल परंतु परीक्षा फार अवघड आहे मला जमेल का मोठ मोठे क्लासेस लावावे लागतील मी ग्रामीण भागातील आहे हे सर्व न्यूनगंड आगोदर दुर करा परीक्षेची तयारी करताना आगोदर परीक्षेचे स्वरुप समजुन घ्या मगच अभ्यास सुरु करा घरी बसुन अभ्यास करु नका असेही दुधाळ म्हणाला या वेळी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे पंचायत समीती सदस्य अरुण पा नाईक बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले कै खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड पत्रकार देविदास देसाई भरत साळूंके आदिंनी मनोगत व्यक्त केले  या वेळी संस्थेचे चेअरमन अनिल नाईक व्हा चेअरमन कलेश सातभाई गोरक्षनाथ कुऱ्हे गोरख गवते शेषराव पवार हर्षद दुधाळ मिलींद दुधाळ खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड भरत साळूंके अभिजीत राका गणेश लढ्ढा शितल गंगवाल अशोक पवार भाऊसाहेब वाबळे भास्कर बंगाळ प्रकाश कुऱ्हे रावसाहेब गाडे प्रकाश नाईक चंदु पा नाईक विजय कुऱ्हे अक्षय नाईक विक्रम नाईक सुधाकर खंडागळे सचिन वाबळे निलेश सोनवणे द्वाराकनाथ नवले शिवाजी वाबळे ज्ञानदेव वाबळे संजय नागले दिवाकर कोळसे किशोर राऊत अन्सार पटेल रमेश अमोलीक अशोक गवते मुस्ताक शेख अल्ताफ शेख पत्रकार देविदास देसाई सुहास शेलार दिलीप दायमा किशोर कदम आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-प्रवरा नदीवरील वळदगाव बंधाऱ्याचे कठडे लवकरात लवकर बसविले जातील असे अश्वासन आमदार लहु कानडे यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.प्रवरा नदीवरील वळदगाव बंधाऱ्यावरुन पडून चांदेगाव येथील रंगनाथ गोविंद वायदंडे या इसमाचा मृत्यू झाला होता त्या नंतर चांदेगाव वळदगाव ब्राम्हणगाव मळहद बेलापुर येथील नागरीकांनी वळदगाव बंधाऱ्यावर कठडे न बसविल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता याची दखल घेवुन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांनी या परीसरातील नागरीकांना सोबत घेवुन आमदार लहु कानडे यांची भेट घेतली या पूर्वीही या बंधाऱ्यावरुन पडून अनेक शेतकरी जखमी झालेले आहेत या बंधाऱ्याचे कठडे अज्ञात इसमांनी चोरुन नेले होते तेव्हापासुन या बंधाऱ्यावरुन  शेतकऱ्यांना, नागरीकांना जिवघेणा प्रवास करावा लागत आहे त्यातच परवा सायकल वरुन बंधारा ओलांडत असताना रंगनाथ वायदंडे यांचा तोल गेला व त्यातच त्यांना  आपले प्राण गमवावे लागले होते त्यामुळे आणखी काही दुर्घटना घडण्याच्या आत या बंधाऱ्यावर कठडे बसविण्यात यावे अशी मागणी विक्रम नाईक यांच्यासह परिसरातील नागरीकांनी केली होती बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले यांनी सरपंच दत्तात्रय खर्डे विक्रम नाईक संतोष खर्डे साहेबराव सिनारे सुभाष सिनारे राजेंद्र भोसले यांच्यासह आमदार लहु कानडे यांची भेट घेतली व बंधाऱ्यावर तातडीने कठडे बसवावे अशी मागणी केली आपली मागणी रास्त असुन लवकरात लवकर वळदगाव बंधाऱ्याचे  कठडे दुरुस्त केले जातील असे अश्वासन आमदार कानडे यांनी दिले चांदेगाव ब्राम्हणगाव भांड करजगावमळहद बेलापुर बु !! ग्रामस्थांच्या वतीने आमदार कानडे यांना निवेदन देण्यात आले.






श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-कोरोनाचा धाक दाखवुन अघाडी सरकारने हिंदुच्या देव- देवता बरोबरच सण उत्सवावर निर्बंध आणून लोकांच्या भावनेशी खेळण्याचे महापाप केले असल्याचे मत मनसेचे जिल्हाध्यक्ष  बाबा शिंदे यांनी व्यक्त  केले  

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने  घरगुती श्री गणेश उत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते   या स्पर्धेला श्रीरामपूरातील नागरिकांनी उस्फूर्तपणे  प्रतिसाद दिला, या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण सोहळा बाबासाहेब शिंदे मनसे जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामगृह श्रीरामपुर येथे संपन्न झाला  या स्पर्धेत घरगुती गणपती बाप्पाची उत्कृष्ट सजावट मध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षिस   प्रज्ञा तुंगर हीने मिळविले पल्लवी शेडगे हीने  दुसरा क्रमांक मिळविला तर शीतल पाटील हीस तिसरा क्रमांक मिळाला

 या वेळी बोलताना मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की आपले सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करुन आपली एकजुट दाखविणे गरजेचे आहे महीलांना कुणी त्रास देत असल्यास मनसे पदाधिकाऱ्याशी संपर्क साधावि त्यास मनसे स्टाईलने उत्तर देण्यात येईल या पुढेही असेच विविध धार्मीक उपक्रम राबविण्याचा मनोदय शिंदे यांनी व्यक्त केला मनसेचे जिल्हा सचिव डाँक्टर संजय नवथर तुषर बोबडे यांनीही मनोगत व्यक्त केले 

मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे तुषार बोबडे जिल्हा सचिव सुरेश जगताप जिल्हा उपाध्यक्ष डॉ, संजय नवथर विधानसभा अध्यक्ष या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले 

. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर संघटक निलेश सोनवणे, शहर सचिव ईश्वर जगताप, शहर सरचिटणीस रोहित जौंजाळ, शहर चिटणीस अमोल साबणे,शहर उपाध्यक्ष मनोज जाधव, राजू शिंदे,बाबासाहेब भालेराव, संदीप विशंभर,तालुका संघटक मनविसे अतुल तारडे , कामगार सेना उप चिटणीस नंदू गंगावणे,विभाग अध्यक्ष,मारुती शिंदे, सागर त्रिभुवन, सचिन धोत्रे, राहुल शिंदे, ज्ञानेश्वर काळे, सुरेश शिंदे, सद्दाम शेख, नितीन खरे, बाप्पू लबडे,आदिंनी विशेष परिश्रम घेतले

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल शिरसाट यांनी केले व   निलेश सोनवणे यांनी आभार मानले.


श्रीरामपूर - शहरात चोरट्या मार्गाने, अवैध व्यवसाय सुरू असल्या संदर्भात,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व आमलदारांनी, शहरातील बस स्थानक,रेल्वे मालधक्का तसेच विविध ठिकाणी छापा टाकून, मन्ना पत्ता,सोरट नावाचा जुगार खेळविल्या जाणाऱ्या अड्डयांवर छापे टाकून, आरोपी यांना विविध ठिकाणांहून जुगाराच्या साहित्य,व रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले असून, वरील आरोपी विरुद्ध, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात जुगार प्रतीबंध कायदा कलाम १२ अ प्रमाणे, आरोपी संदीप पवार, शरद आडांगळे, नितीन त्रिभुवन यांना ताब्यात घेतले असून.आरोपी संदीप पवार, शरद आडांगळे, यांच्या कडून १ हजार ६०  रुपयांचा मुद्देमाल, तर आरोपी नितीन त्रिभुवन यांच्या कडून १ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन, आरोपी विरुद्ध श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली असून. या गुन्ह्याचा पुढील तपास, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोज गोसावी, हिंगडे, विठेकर,चव्हाण, पोलीस नाईक विशाल दळवी, लोढे, माने, यमूल, जाधव, सोळंकी, कुसळकर, गावढे आदींच्या पथकाने केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे, शहरातील अवैध धंदे करणा-यांचेधाबे दणाणले आहेत.  

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) नगर शहरामध्ये कोतवाली पोलिस स्टेशन नगर जिल्ह्यामध्ये महत्वाचे पोलीस स्टेशन म्हणून ओळखले जाते येथे ते चार वर्षात सात पोलीस निरीक्षक बदलून गेले आहे.  बेलवंडी येथून नवीन बदलुन आलेले कोतवाली पोलिस स्टेशन सपंत शिंदे यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांनी . असे महत्वाचे महत्वाची शहरात पोलीस स्टेशन केले आहे नगर जिल्ह्यात काही वर्षां पुर्वी पी एस आय म्हणून कोतवाली होते. नंतर पी आय तोफखाना नेवासा. क्षीरामपुर. बेलवंडी   येथुन कोतवाली पोलीस स्टेशन बदली झाली आहे चार वर्षात सोमनाथ मालकर. अभय परमार. रमेश रत्नपारखी. नितीन कुमार गोकावे. विकास वाघ. प्रवीण लोखंडे. राकेश मानगांवकर. असे चार वर्षात पोलीस निरीक्षक होऊन गेले आता नवीन बदलून आलेले पी आय सपंत शिंदे हे नगर शहरात त्यांच्या कारभाराकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. शहरांमध्ये अवैद्य धंदे वाहतूक याबाबत काय निर्णय घेतात याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक सपंत शिदे यांचा सत्कार करण्यात आला कोतवाली पोलीस ठाण्याचे सपोनि रणदिवे व कचरे. महाजन . यावेळी हजर होते.

बेलापूर (प्रतिनिधी) येथील पोलीस चौकीच्या हद्दीतील लोकसंख्या विचारात घेता पोलीसबळ कमी असल्याने वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसुरक्षा दल कार्यान्वित होणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामस्थ व संघटनांनी पोलीस मित्र म्हणुन सहकार्य करण्याचे आवाहन श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी केले आहे.बेलापूर येथे गुरुवारी रात्री गोशाळेजवळ उदय खंडागळे तसेच भागवतनगर येथे भगीरथ चिंतामणी यांच्या घरी दरोडा पडल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस अधिक्षक डॉ. दीपाली काळे यांच्या सूचनेनुसार स्थानिक ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यासाठी बेलापूर पोलीस चौकीत आयोजित ग्रामस्थांच्या बैठकीत मिटके बोलत होते.ते पुढे म्हणाले की, नागरिकांनी अशा घटनांनी भयभीत न होता योग्य उपाययोजना करुन आपली काळजी घ्या, त्यासाठी सीसीटीव्ही, लोखंडी सुरक्षा दरवाजे बसवा, तसेच घरात गरजेपुरते पैसे ठेवा आणि किमती ऐवज बँकेच्या लॉकर्समध्ये ठेवा. तसेच ठिकठिकाणी ग्रामसुरक्षा दलात सहभागी होऊन कायम पोलीस मित्र म्हणुन पोलिसांच्या मदतीला पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी केले.बेलापूर दरोड्याच्या घटनेटनंतर  वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत. त्यात आशादायक प्रगती असल्याने आरोपी लवकरच निष्पन्न होतील असा विश्वास श. पो. नि. संजय सानप यांनी व्यक्त केला.यावेळी शहर पोलीस निरीक्षक संजय सानप, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा धायवट यांनीही मौलिक मार्गदर्शन केले. सर्वश्री जि.प. सदस्य शरद नवले, पं. स. सदस्य अरूण पा. नाईक, बाजार समिती संचालक सुधीर नवले, सरपंच महेंद्र साळवी, उक्कलगावचे पोलीस पाटील थोरात, तंटा मुक्तीचे अध्यक्ष पुरूषोत्तम भराटे, विजय शेलार, हाजी इस्माईल शेख, पत्रकार विष्णुपंत डावरे, प्रकाश कुऱ्हे, ओहोळ सर आदींनी मनोगत व्यक्त केले. बेलापूरला तुलनेने खुपच कमी मनुष्यबळ असतानाही पोलिसांनी हिरण प्रकरण तसेच अपहृत मुलीच्या घटनेत केलेल्या कार्याचे कौतूक करुन पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची एकमुखी ग्वाही या बैठकीत ग्रामस्थांनी दिली.या बैठकीला सर्वश्री उपसरपंच अभिषेक खंडागळे, ऐनतपुरचे पोलीस पाटील अशोक प्रधान, शिवाजी पा. वाबळे, अशोक गवते, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लड्डा,  भाजपचे शहराध्यक्ष प्रफुल्ल डावरे, ग्रा.पं. सदस्य रमेश अमोलिक, मुश्ताक शेख, केशव अंबिलवादे, दादा कुताळ, अकबर सय्यद, मदन सोमाणी, ,सतीश व्यास, नरेंद्र संचेती, प्रसाद खरात, शफिक आतार, सुजित साहनी, प्रा. विठ्ठल सदाफुले, पत्रकार प्रा. ज्ञानेश गवले, देविदास देसाई, सुहास शेलार, किशोर कदम आदी उपस्थित होते.या बैठकीच्या यशस्वीतेसाठी पो. हे. कॉ. अतुल लोटके, पो. ना. गणेश भिंगारदे, रामेश्वर ढोकणे, निखिल तमनर, हरीश पानसंबळ, पोपट भोईटे यांनी विशेष परिश्रम घेतले.बेलापूर दरोड्याच्या घटनेटनंतर  वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत. त्यात आशादायक प्रगती असल्याने आरोपी लवकरच निष्पन्न होतील असा विश्वास  पोलीस निरीक्षक   संजय सानप यांनी व्यक्त केला.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- ज्यांना लहानचे मोठे केले त्याच दिवट्यांनी वृध्द माता पित्यांना हाकलून द्यावे अन ज्याचा  रक्ताचा जातीचा धर्माचा कुठलाही  संबध नसताना त्याने त्यांचे संगोपन करावे हे दुर्दैवी असुन आपल्या संस्कृतीचा ऱ्हास होत चालला की काय? अशी शंका पंत्रकार देविदास देसाई यांनी व्यक्त केली       श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांचा वाढदिवस श्रीरामपुर येथील वृध्दाश्रमात साजरा करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसील कार्यालयातील श्रीमती चारुशिला मगरे या होत्या    या वेळी बोलताना पत्रकार देविदास देसाई म्हणाले की माऊली वृध्दाश्रमाचे सुभाष वाघुंडे हे वृध्दांचा आधारवड बनले आहे या वृध्दाश्रमात आज १५ वयोवृध्द आहेत अनेक जण आपला वाढदिवस जोरदार साजरा करतात परंतु सुभाष वाघुंडे यांना दररोजचा खर्च कसा भागवावा या चिंतेने काढ दिवस साजरा करावा लागतो आहे

आपणही समाजाचे काही देणे लागतो या भूमिकेतून दानशूरांनी पुढे येवुन या वृध्दाश्रमास मदत करावी असे अवाहनही देसाई यांनी केले या वेळी पत्रकार चंद्रकांत झुरंगे  भाऊसाहेब वाघमारे श्रीमती चारुशिला मगरे माऊली वृध्दाश्रमाचे सुभाष वाघुंडे आदि मनोगत व्यक्त केले श्रीरामपुर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने वाघुंडे यांचा सत्कार करण्यात आला या वेळी माऊली वृध्दाश्रमास अकरा हजार रुपयांची देणगी देण्यात आली  कार्यक्रमास नरेंद्र खरात योगेश गंगवाल अजिज शेख सुभाष सांळूंके सुभाष चोरडीया नाना मोरे संतोष पारखे राहुल पगारे पत्रकार सुहास शेलार किशोर कदम विकी काळे मुरलीधर वधवाणी अरुण खंडागळे आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक रज्जाक पठाण यांनी केले तर चंद्रकांत झुरंगे यांनी आभार मानले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथे खंडागळे व चिंतामणी याच्या घरावर दरोडा पडल्यानंतर उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी तातडीने बेलापुर ग्रामस्थांची बैठक बोलविली व ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या त्यानुसार ग्रामस्थांनी गस्त सुरु केली आहे.बेलापुर येथे दरोडा पडल्यानंतर पोलीस संख्या पहाता ग्रामस्थांचा रात्रीची गस्त घालताना विशेष करुन तरुणांचा सहभाग असावा या करीता बैठक बोलविण्यात आली होती त्या बैठकीत सर्वानुमते पोलीसांना सहकार्य करण्याचे अश्वासन ग्रामस्थांनी दिले.पहिल्याच दिवशी पोलीस कर्मचारी निखिल तमनर व हरिष पानसंबळ यांच्या समवेत बेलापुरचे उपसरपंच अभिषेक खंडागळे,तंटामूक्तीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे,भाजपाचे प्रफुल्ल डावरे,ग्रामपंचायत सदस्य व आर.पी.आय युवक जिल्हाध्यक्ष रमेश अमोलिक,प्रभात कु-हे यांनी रात्री बेलापुर  व परिसरात गस्त घातली. बेलापुरला मोठा परिसर असुन वाड्या वस्त्यावर व उक्कलगाव येथेही या पोलीस मित्रांनी पोलीसा समवेत गस्त घातली.

बेलापुर  (देविदास  देसाई )-गावातील गो शाळेजवळ असणाऱ्या दोन ठिकाणी चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकला असुन या दरोड्यात रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागीने घेवुन चोरटे पसार झाले आहे ही घटना समजताच तातडीने श्वान पथकही  बोलविण्यात आले होते. बेलापुर श्रीरामपुर रोडवर असणाऱ्या गो शाळेलगत उदय खंडागळे यांचा बंगला आहे रात्री दिड वाजे दरम्यान चोरट्यांनी खंडागळे यांच्या बंगल्याचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला चोरट्यांनी खंडागळे यांच्या घरात असलेल्या लहान

मुलीच्या गळ्याला चाकु लावला त्यामुळे घरातील सर्व जण घाबरले त्यांनी शांत बसणे पसंत केले जवळपास दिड तास चोरट्यांनी घरात निवांतपणे उचका पाचक केली त्यांच्या घरातील लग्नाचा अलबमही चोरट्यांनी निवांतपणे पाहीला त्यातील घरातील महीलांचे फोटो शोधुन फोटोत अंगावर घातलेले दागीने लवकर काढुन द्या असेही चोरट्यांनी दरडावले एक फोटो पाहुन या महीलेच्या गळ्यातील हे दागीने लवकर द्या अशीही मागणी चोरट्यांनी केली त्यावर हा फोटो आमच्या मावशीचा आहे असे सांगताच या फोटोतील महीला व ही महीला एकच वाटते असेही चोरटे म्हणाले खंडागळे यांच्या घरातुन जवळपास पंधरा ते वीस तोळे सोने व रोख रक्कमही चोरट्यांनी लांबविली त्यांनंतर भगीरथ चिंतामणी यांच्या लोखंडी दरवाजाचे कुलुप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला त्यांच्या घरातुन ३५ हजार रुपये रोख चोरट्यांनी लांबविले भगीरथ चिंतामणी यांचा मुलगा सोमनाथ याने एका चोरट्याशी झटापट केली त्यात चोरट्याने त्यांच्या पायावर लोखंडी राँडने मारहाण केली सोमनाथनेही त्या चोरट्याला चांगलाच चोप दिला त्याने चोरट्याला पकडले असता त्याच्या वडीलांना काय चालले हेच समजेना त्यांनी सोमनाथलाच मिठी मारली त्यामुळे तो  चोरटा सोमनाथच्या तावडीतुन निसटला त्यामुळे चोराट्यांनी तेथुन पळ काढला त्या नंतर सोमनाथ याने बेलापुर पोलीसांना फोन करताच काही मिनीटातच बेलापुर पोलीस घटनास्थळी पोहोचले तो पर्यंत चोरटे पसार झाले होते सकाळी श्वान पथक बोलविण्यात आले होते श्वानाने कुऱ्हे वस्ती रोडलगत माग दाखवीला त्या पुढे चोरटे वहानाने फरार झाले असावेत त्यानंतर सकाळी अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे यांनी घटनास्थळी भेट देवुन खंडागळे व चिंतामणी परिवारा कडून घटना कशी घडली या बाबत माहीती घेतली व अधिकाऱ्यांना तपासा बाबत योग्य त्या  सुचना दिल्या त्यांच्या समवेत उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके पोलीस निरीक्षक संजय सानप पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट हवालदार अतुल लोटके व त्यांचा स्टाफ होता घटनेची माहीती मिळताच जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी भेट देवुन खंडागळे व चिंतामणी परीवाराला धीर दिला या वेळी अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे यांनी ग्राम रक्षक दल स्थापन करण्याच्या सूचना जि प सदस्य शरद नवले यांना दिल्या असुन आज सायंकाळी बेलापुर पोलीस स्टेशन येथे बैठक बोलविण्यात आली आहे



राहुरी (प्रतिनिधी) Dy.s.p. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत सोनगाव सात्रळ येथे गावठी हातभट्टी दारू  अड्डे व  हातभट्टी दारू तयार करत आहेत  अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सोनगाव सात्रळ येथे परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू  अड्ड्यावर छापा टाकून  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू  यांचा नाश करण्यात आला 

आरोपी. क्र.)1) दिलीप वामन पवार वय 45  रा. सोनगाव सात्रळ

42,000/-  रु. कि.चे 600 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

2,000/- रू किमतीची 20 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)

आरोपी. क्र.) 2. सुभाष वामन पवार

49,000/-  रु. कि.चे 700 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

3500/- रू  किमतीची 35  लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं.  अं.)

आरोपी. क्र.) 3. मुन्ना लक्ष्मण पवार

52,500/-  रु. कि.चे 750 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं. अं.)

3000/- रू  किमतीची 30  लिटर तयार गावठी हातभट्टी दारू ( आंबट उग्र वासाची किं. अं.)

आरोपी. क्र.) 4.  वसंत भिवसेन पवार

42,000/-  रु. कि.चे 700 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

2500/- रू  किमतीची 25  लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं.  अं.)

आरोपी. क्र.) 5. सविता एकनाथ बर्डे

14,000/-  रु. कि.चे 200 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

1000/- रू  किमतीची 10  लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं.  अं.)

---------------------------------------------

 एकूण 2,11,500/-/-  रुपये

 वरील वर्णनाचा व किमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा  माल आरोपींचे ताब्यातून जप्त केला असून सर्व आरोपींविरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे, मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड )  (ई)  प्रमाणे  गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

अचानक झालेल्या या कारवाईमुळे सोनगाव सात्रळ परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाई चे सोनगाव सात्रळ येथील महिलांनी  Dy.s.p. संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक  करून आभार व्यक्त केले.

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे,  यांचे मार्गदर्शनाखाली  Dy.s.p  संदीप मिटके, ASI.राजेंद्र आरोळे,H.c. सुरेश  औटी, संजय राठोड, P.N  देविदास कोकाटे, व आरसीपी पथक आदींनी केली.



MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget