बेलापूरात दोन ठिकाणी धाडसी दरोडा रोख रकमेसह पंधरा ते वीस तोळे सोने चांदी लंपास.

बेलापुर  (देविदास  देसाई )-गावातील गो शाळेजवळ असणाऱ्या दोन ठिकाणी चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकला असुन या दरोड्यात रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागीने घेवुन चोरटे पसार झाले आहे ही घटना समजताच तातडीने श्वान पथकही  बोलविण्यात आले होते. बेलापुर श्रीरामपुर रोडवर असणाऱ्या गो शाळेलगत उदय खंडागळे यांचा बंगला आहे रात्री दिड वाजे दरम्यान चोरट्यांनी खंडागळे यांच्या बंगल्याचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला चोरट्यांनी खंडागळे यांच्या घरात असलेल्या लहान

मुलीच्या गळ्याला चाकु लावला त्यामुळे घरातील सर्व जण घाबरले त्यांनी शांत बसणे पसंत केले जवळपास दिड तास चोरट्यांनी घरात निवांतपणे उचका पाचक केली त्यांच्या घरातील लग्नाचा अलबमही चोरट्यांनी निवांतपणे पाहीला त्यातील घरातील महीलांचे फोटो शोधुन फोटोत अंगावर घातलेले दागीने लवकर काढुन द्या असेही चोरट्यांनी दरडावले एक फोटो पाहुन या महीलेच्या गळ्यातील हे दागीने लवकर द्या अशीही मागणी चोरट्यांनी केली त्यावर हा फोटो आमच्या मावशीचा आहे असे सांगताच या फोटोतील महीला व ही महीला एकच वाटते असेही चोरटे म्हणाले खंडागळे यांच्या घरातुन जवळपास पंधरा ते वीस तोळे सोने व रोख रक्कमही चोरट्यांनी लांबविली त्यांनंतर भगीरथ चिंतामणी यांच्या लोखंडी दरवाजाचे कुलुप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला त्यांच्या घरातुन ३५ हजार रुपये रोख चोरट्यांनी लांबविले भगीरथ चिंतामणी यांचा मुलगा सोमनाथ याने एका चोरट्याशी झटापट केली त्यात चोरट्याने त्यांच्या पायावर लोखंडी राँडने मारहाण केली सोमनाथनेही त्या चोरट्याला चांगलाच चोप दिला त्याने चोरट्याला पकडले असता त्याच्या वडीलांना काय चालले हेच समजेना त्यांनी सोमनाथलाच मिठी मारली त्यामुळे तो  चोरटा सोमनाथच्या तावडीतुन निसटला त्यामुळे चोराट्यांनी तेथुन पळ काढला त्या नंतर सोमनाथ याने बेलापुर पोलीसांना फोन करताच काही मिनीटातच बेलापुर पोलीस घटनास्थळी पोहोचले तो पर्यंत चोरटे पसार झाले होते सकाळी श्वान पथक बोलविण्यात आले होते श्वानाने कुऱ्हे वस्ती रोडलगत माग दाखवीला त्या पुढे चोरटे वहानाने फरार झाले असावेत त्यानंतर सकाळी अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे यांनी घटनास्थळी भेट देवुन खंडागळे व चिंतामणी परिवारा कडून घटना कशी घडली या बाबत माहीती घेतली व अधिकाऱ्यांना तपासा बाबत योग्य त्या  सुचना दिल्या त्यांच्या समवेत उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके पोलीस निरीक्षक संजय सानप पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट हवालदार अतुल लोटके व त्यांचा स्टाफ होता घटनेची माहीती मिळताच जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी भेट देवुन खंडागळे व चिंतामणी परीवाराला धीर दिला या वेळी अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे यांनी ग्राम रक्षक दल स्थापन करण्याच्या सूचना जि प सदस्य शरद नवले यांना दिल्या असुन आज सायंकाळी बेलापुर पोलीस स्टेशन येथे बैठक बोलविण्यात आली आहे



Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget