बेलापुर (प्रतिनिधी )-येथे खंडागळे व चिंतामणी याच्या घरावर दरोडा पडल्यानंतर उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी तातडीने बेलापुर ग्रामस्थांची बैठक बोलविली व ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या त्यानुसार ग्रामस्थांनी गस्त सुरु केली आहे.बेलापुर येथे दरोडा पडल्यानंतर पोलीस संख्या पहाता ग्रामस्थांचा रात्रीची गस्त घालताना विशेष करुन तरुणांचा सहभाग असावा या करीता बैठक बोलविण्यात आली होती त्या बैठकीत सर्वानुमते पोलीसांना सहकार्य करण्याचे अश्वासन ग्रामस्थांनी दिले.पहिल्याच दिवशी पोलीस कर्मचारी निखिल तमनर व हरिष पानसंबळ यांच्या समवेत बेलापुरचे उपसरपंच अभिषेक खंडागळे,तंटामूक्तीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे,भाजपाचे प्रफुल्ल डावरे,ग्रामपंचायत सदस्य व आर.पी.आय युवक जिल्हाध्यक्ष रमेश अमोलिक,प्रभात कु-हे यांनी रात्री बेलापुर व परिसरात गस्त घातली. बेलापुरला मोठा परिसर असुन वाड्या वस्त्यावर व उक्कलगाव येथेही या पोलीस मित्रांनी पोलीसा समवेत गस्त घातली.
Post a Comment