बेलापुर (प्रतिनिधी )- ज्यांना लहानचे मोठे केले त्याच दिवट्यांनी वृध्द माता पित्यांना हाकलून द्यावे अन ज्याचा रक्ताचा जातीचा धर्माचा कुठलाही संबध नसताना त्याने त्यांचे संगोपन करावे हे दुर्दैवी असुन आपल्या संस्कृतीचा ऱ्हास होत चालला की काय? अशी शंका पंत्रकार देविदास देसाई यांनी व्यक्त केली श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांचा वाढदिवस श्रीरामपुर येथील वृध्दाश्रमात साजरा करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसील कार्यालयातील श्रीमती चारुशिला मगरे या होत्या या वेळी बोलताना पत्रकार देविदास देसाई म्हणाले की माऊली वृध्दाश्रमाचे सुभाष वाघुंडे हे वृध्दांचा आधारवड बनले आहे या वृध्दाश्रमात आज १५ वयोवृध्द आहेत अनेक जण आपला वाढदिवस जोरदार साजरा करतात परंतु सुभाष वाघुंडे यांना दररोजचा खर्च कसा भागवावा या चिंतेने काढ दिवस साजरा करावा लागतो आहे
आपणही समाजाचे काही देणे लागतो या भूमिकेतून दानशूरांनी पुढे येवुन या वृध्दाश्रमास मदत करावी असे अवाहनही देसाई यांनी केले या वेळी पत्रकार चंद्रकांत झुरंगे भाऊसाहेब वाघमारे श्रीमती चारुशिला मगरे माऊली वृध्दाश्रमाचे सुभाष वाघुंडे आदि मनोगत व्यक्त केले श्रीरामपुर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने वाघुंडे यांचा सत्कार करण्यात आला या वेळी माऊली वृध्दाश्रमास अकरा हजार रुपयांची देणगी देण्यात आली कार्यक्रमास नरेंद्र खरात योगेश गंगवाल अजिज शेख सुभाष सांळूंके सुभाष चोरडीया नाना मोरे संतोष पारखे राहुल पगारे पत्रकार सुहास शेलार किशोर कदम विकी काळे मुरलीधर वधवाणी अरुण खंडागळे आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक रज्जाक पठाण यांनी केले तर चंद्रकांत झुरंगे यांनी आभार मानले.

Post a Comment