बेलापूर (प्रतिनिधी) येथील पोलीस चौकीच्या हद्दीतील लोकसंख्या विचारात घेता पोलीसबळ कमी असल्याने वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसुरक्षा दल कार्यान्वित होणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामस्थ व संघटनांनी पोलीस मित्र म्हणुन सहकार्य करण्याचे आवाहन श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी केले आहे.बेलापूर येथे गुरुवारी रात्री गोशाळेजवळ उदय खंडागळे तसेच भागवतनगर येथे भगीरथ चिंतामणी यांच्या घरी दरोडा पडल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस अधिक्षक डॉ. दीपाली काळे यांच्या सूचनेनुसार स्थानिक ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यासाठी बेलापूर पोलीस चौकीत आयोजित ग्रामस्थांच्या बैठकीत मिटके बोलत होते.ते पुढे म्हणाले की, नागरिकांनी अशा घटनांनी भयभीत न होता योग्य उपाययोजना करुन आपली काळजी घ्या, त्यासाठी सीसीटीव्ही, लोखंडी सुरक्षा दरवाजे बसवा, तसेच घरात गरजेपुरते पैसे ठेवा आणि किमती ऐवज बँकेच्या लॉकर्समध्ये ठेवा. तसेच ठिकठिकाणी ग्रामसुरक्षा दलात सहभागी होऊन कायम पोलीस मित्र म्हणुन पोलिसांच्या मदतीला पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी केले.बेलापूर दरोड्याच्या घटनेटनंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत. त्यात आशादायक प्रगती असल्याने आरोपी लवकरच निष्पन्न होतील असा विश्वास श. पो. नि. संजय सानप यांनी व्यक्त केला.यावेळी शहर पोलीस निरीक्षक संजय सानप, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा धायवट यांनीही मौलिक मार्गदर्शन केले. सर्वश्री जि.प. सदस्य शरद नवले, पं. स. सदस्य अरूण पा. नाईक, बाजार समिती संचालक सुधीर नवले, सरपंच महेंद्र साळवी, उक्कलगावचे पोलीस पाटील थोरात, तंटा मुक्तीचे अध्यक्ष पुरूषोत्तम भराटे, विजय शेलार, हाजी इस्माईल शेख, पत्रकार विष्णुपंत डावरे, प्रकाश कुऱ्हे, ओहोळ सर आदींनी मनोगत व्यक्त केले. बेलापूरला तुलनेने खुपच कमी मनुष्यबळ असतानाही पोलिसांनी हिरण प्रकरण तसेच अपहृत मुलीच्या घटनेत केलेल्या कार्याचे कौतूक करुन पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची एकमुखी ग्वाही या बैठकीत ग्रामस्थांनी दिली.या बैठकीला सर्वश्री उपसरपंच अभिषेक खंडागळे, ऐनतपुरचे पोलीस पाटील अशोक प्रधान, शिवाजी पा. वाबळे, अशोक गवते, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लड्डा, भाजपचे शहराध्यक्ष प्रफुल्ल डावरे, ग्रा.पं. सदस्य रमेश अमोलिक, मुश्ताक शेख, केशव अंबिलवादे, दादा कुताळ, अकबर सय्यद, मदन सोमाणी, ,सतीश व्यास, नरेंद्र संचेती, प्रसाद खरात, शफिक आतार, सुजित साहनी, प्रा. विठ्ठल सदाफुले, पत्रकार प्रा. ज्ञानेश गवले, देविदास देसाई, सुहास शेलार, किशोर कदम आदी उपस्थित होते.या बैठकीच्या यशस्वीतेसाठी पो. हे. कॉ. अतुल लोटके, पो. ना. गणेश भिंगारदे, रामेश्वर ढोकणे, निखिल तमनर, हरीश पानसंबळ, पोपट भोईटे यांनी विशेष परिश्रम घेतले.बेलापूर दरोड्याच्या घटनेटनंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत. त्यात आशादायक प्रगती असल्याने आरोपी लवकरच निष्पन्न होतील असा विश्वास पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी व्यक्त केला.

Post a Comment