भगव्याच्या रक्षणासाठी हिंदूंनी एकत्र यावे धर्मांतर, लव जिहाद विरोधात ‘शिवप्रहार प्रतिष्ठान’ लढणारःसूरज आगे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- काही विशिष्ट समाजातील लोकांनी समाजात उच्छाद मांडला असून हिंदू धर्माच्या आया-बहिणींच्या अब्रुशी खेळणे, विशिष्ट धर्मात हिंदूंचे धर्मांतर करणे तसेच लव जिहाद सारख्या घटना घडत आहेत. हे सर्व हिंदू धर्माच्या विरोधात षडयंत्र आहे. या षडयंत्राविरोधात शिवप्रहार प्रतिष्ठान लढा उभारणार आहे. त्यासाठी अठरा पगड जातीच्या हिंदूंनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे, असे आवाहन मा. पोलीस अधिकारी सूरज आगे यांनी केले.  श्रीरामपूर येथील उत्सव मंगल कार्यालयात अभूतपूर्व झालेल्या भगव्या मेळाव्यात ते बोलत होते.

पुढे बोलताना सूरज आगे म्हणाले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ज्यांच्यामुळे मंदिरे व हिंदु संस्कृती, धर्म सुरक्षित राहिला अशा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्रात तिथीला व तारखेला जयंती साजरी होते हे हिंदू संघटनासाठी खेदजनक असून छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती एकाच दिवशी साजरी होण्यासाठी सर्व हिंदू बांधवांना शिवप्रहार प्रतिष्ठानच्या माध्यमातून एकत्र करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात अनेक राजकीय पक्षांची सत्ता आली. अनेक मुख्यमंत्री झाले मात्र तिथीला जयंती साजरी करा म्हणणारे तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी शिवनेरीला डोकं टेकवतात. मात्र शिवजयंती एकाच दिवशी करण्याची भूमिका घेत नाही हे चुकीचे आहे.

सर्व हिंदू समाजाने एकत्रित येवून परिसरात चाललेल्या हिंदूविरोधी षडयंत्रापासून, हिंदू समाजाचे रक्षण व सर्व समाजाला एकत्रित करण्यासाठी भव्य भगवा मेळावा घेण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले. अनेक वर्षापासून संपूर्ण राज्यात हिंदू समाजाचे केवळ राजकारणासाठी, विभाजन करुन त्यांच्यावर अन्याय, अत्याचार केले. सर्वांच्या डोळ्यासमोर लव जिहाद, धर्मांतराचे षडयंत्र मोठ्या प्रमाणात सुरू असून देखील या संदर्भात कोणीही  बोलण्यास पुढे येत नाही. एवढेच नाही तर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. त्यांचा इतिहास शाळेच्या अभ्यासक्रमातून वगळून पुढच्या पिढीला हिंदू संस्कृतीपासून दूर केले जात आहे. ज्याप्रमाणे संपूर्ण राज्यभरात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. नगर जिल्ह्यात देखील काही विशिष्ट समाजातील लोकांनी उच्छाद मांडला आहे. हिंदू समाजातील आई-बहिणींच्या अब्रुशी खेळणे, विशिष्ट धर्मात हिंदूंचे धर्मांतर करणे, ठराविक परिसरात लोकवस्ती करुन, हिंदू धर्मातील संस्कृतीचा र्‍हास करणे, एवढेच नाही तर हातात नंग्या तलवारी घेवून हिंदू समाजावर दहशत निर्माण करण्याचे प्रकार घडत आहेत. हे सर्व काही घडत आहे. त्यामागे, काही विशिष्ट लोकांसह, राजकारणी व समतेची भाषा करणार्‍या सेक्युलरवादी लोकांचा हात असल्याने हिंदू समाजावर अनेक  पिढ्यांपासून अन्याय, अत्याचार होत आहेत. ही सर्व परिस्थिती बदलण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श आणि शिकवणी प्रमाणे, तसेच १८ पगड जातींना सोबत घेऊन काम करण्याची गरज निर्माण झाल्याने शिवप्रहार प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे, असे यावेळी मा. पोलीस अधिकारी सूरज आगे यांनी सांगितले.

शिवप्रहार प्रतिष्ठान हा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधीत नसून  कोणतेही राजकारण करणार नसून फक्त हिंदू धर्म, हिंदू संस्कृती व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर काम करणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी सूरज आगे यांच्या मनोगताला उपस्थित जनसमुदायाने प्रचंड दाद देवून आम्ही तुमच्या बरोबर असल्याचे दोन्ही हात वर करुन सांगितले. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची बातमी, पत्रक, अथवा आवाहन करण्यात आले नव्हते तरीही भगव्या मेळाव्याला हिंदू बांधवांनी स्वयंस्फुर्तीने मोठी गर्दी करण्याचा श्रीरामपूरच्या इतिहासात हा पहिला प्रसंग असल्याची बोलकी प्रतिक्रिया मेळाव्यानंतर शहरभर व्यक्त करण्यात येत होती. कार्यक्रमस्थळी सॅनिटायझर व मास्कची व्यवस्था करण्यात आली होती.  अठरा पगड जातींचा हिंदू धर्मअठरा पगड जातींना बरोबर घेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. अठरा पगड जातीतील लोकांनी स्वराज्यासाठी रक्त सांडले, शिवाजी महाराजांच्या काळात कोणीही उच्च किंवा कोणीही खालच्या जातीचा असा भेदभाव नव्हता. सर्व अठरा पगड जातीतील लोकांना महाराज एकसमान मानायचे याची अनेक इतिहासातील उदाहरणे देत सूरज आगे म्हणाले की, नंतरच्या काळातील स्वार्थी राजकारण्यांनी जाती-जातीत तेढ निर्माण केला. अठरा पगड जातींना बरोबर घेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माचे कार्य केले आणि तोच खरा शिवधर्म आहे.  त्यामुळे आगामी काळात अठरा पगड जातीनी भगव्या ध्वजाखाली एकत्र येवून जेथे जेथे भगवा झुकतोय असे वाटले तर त्या ठिकाणी एकत्रितपणे उभे राहण्याचे आवाहन केले.नेत्यांच्या पत्नींना ट्रॅक्टरमध्ये बसवा...भ्रष्टाचाराने सर्वसामान्यांना प्रचंड त्रास होतो. सध्या रस्त्याची गंभीर परिस्थिती आहे. नेवासा फाटा ते बाभळेश्‍वर फाटा या रस्त्यावर प्रचंड खड्डे झाले. सर्वसामान्य नागरिकांचे अपघात होवून त्यांना जीव गमवावा लागत आहे तरी खड्डे बुजत नाही. सर्व पक्षाच्या नेते मंडळींच्या पत्नींंना एका ट्रॅक्टरमध्ये बसवून नेवासा फाटा ते बाभळेश्‍वर जोराची चक्कर मारावी म्हणजे कळेल रस्त्यावर खड्डे किती? व जनतेला त्रास किती? असे सांगून मा. पोलीस अधिकारी सूरज आगे म्हणाले की, भ्रष्टाचारी वृत्तीमुळे असे प्रकार होतात. भ्रष्टाचार करणार्‍यांविरुद्धही शिवप्रहार प्रतिष्ठान लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. या त्यांच्या  वक्तव्यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.



Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget