श्रीरामपूर तालुका फोटोग्राफर असोसिएशन च्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या फेरणीवडीच्या बैठकीत साबळे बोलत होते.यावेळी झालेल्या बैठकीत अध्यक्ष पदी चितळी येथील चंद्रकांत वाघ यांची तर उपाध्यक्ष अमितराज आहेर सोबतच चार नवीन संचालकांची निवड करण्यात आली यात सुशील रांका,सचिन पतंगे,गौरव शेटे आणि संघटनेच्या प्रसिद्धी प्रमुख पदी ऍड. प्रविण जमधडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या प्रसंगी अतिष देसरडा,तिलक डुंगरवाल, विशाल अंभोरे,अजय अहिरे,संतोष देसाई,राजू शेवंते,संजू पगारे,सुशील रांका,भानुदास बेरड,सचिन पतंगे, गौरव शेटे,अमितराज आहेर,संदीप गोडसे,अक्षय कुमावत, प्रविण जमधडे, उपस्थित होते.
मावळते अध्यक्ष रोहित साबळे यांनी सांगितले की 2015 संघटना स्थापन झाली आणि 2018 साली संघटनेची नोंदणी झाली तेव्हा पासून संघटना फोटोग्राफर च्या हिताचा विचार करून कार्य करत आहे.नोंदणी करते वेळी एक वर्ष अध्यक्षपद हे शहराकडे असेल तर एक ग्रामीण भागाकडे असेल याच पार्श्वभूमीवर यंदाचे अध्यक्षपद हे ग्रामीण भागात देत असल्याचे साबळे यांनी सांगितले.तर पुढे तिलक डुंगरवाल यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांना निवडी बाबत शुभेच्छा दिल्या.
तर आज पर्यंत संघटनेने विविध सामाजिक उपक्रम घेतले त्याबद्दल माहिती विशद केली यामध्ये शालेय व महाविद्यालयीन स्तरावर यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस प्रेरणा मिळावी याकरता त्यांच्या सह पालकांचा संघटनेने गुणगौरव सोहळा आयोजित केला. सोबतच फोटोग्राफर बंधूंच्या हिताची अनेक उपक्रम यात विविध यशस्वी राज्यस्तरीय फोटोग्राफर यांचे मार्गदर्शनपर शिबीर आयोजित केले. फोटोग्राफर बंधूंसाठी एक लाख रुपयाचा अपघाती विमा देखील संघटनेच्या माध्यमातून काढण्यात आला. पर्यावरणाचा समतोल राहावा यादृष्टीने संघटनेने आज पर्यंत विविध सामाजिक कार्यक्रम घेतले त्यामध्ये वृक्षरोपण वृक्ष संगोपन असे कार्यक्रम होते तर येत्या काळात संघटना ही फोटोग्राफरच्या प्रत्येक सुख दुःखात सहभागी असेल कोणत्याही अडचणीला सामोरे जाण्यासाठी संघटनेचा फोटोग्राफर हा एकटा नसून त्याच्या कुटुंबासोबत श्रीरामपूर तालुका फोटोग्राफर असोसिएशन ही संघटना उभी असेल असा विश्वास यावेळी तिलक डुंगरवाल व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल अंभोरे यांनी केले,तर आभार संतोष देसाई यांनी मानले..
Post a Comment