मनातील न्यूनगंड काढुन टाका यश तुमचेच आहे - यूपीएससीत दुसऱ्यांदा यश मिळविणाऱ्या अभिषेकचा सल्ला.
बेलापुर (प्रतिनिधी )-केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देताना मुंबई पुणे दिल्ली या ठिकाणी क्लासेस लावलेच पाहीजे हा समज चुकीच असुन आपल्या मनातील न्यूनगंड काढुन टाका यश तुमच्या मागे धावेल असा सल्ला यूपीएससी परीक्षेत ४६९वा रँक मिळवीणारे अभिषेक दुधाळ यांनी दिला आहे. यूपीएससी परीक्षेत दुसऱ्यांदा चांगली रँक घेवुन उत्तीर्ण झाल्याबद्दल बेलापुर ग्रामपंचायत बेलापुर सेवा संस्था उपबाजार समिती बेलापुर कै मुरलीधर खटोड पतसंस्था गांवकरी पतसंस्था भाऊसाहेब वाबळे मित्र मंडळ बेलापुर पत्रकारांच्या व ग्रामस्थांच्या वतीने अभिषेक दुधाळ यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता त्या वेळी सत्काराला उत्तर देताना अभिषेक दुधाळ म्हणाले की माझ्या यशामध्ये माझे मार्गदर्शक आई वडील गुरुजन वर्ग मित्र परिवार त्याच बरोबर बेलापुर ग्रामस्थांचाही मोलाचा वाटा आहे .जिद्द चिकाटी व कठोर परिश्रम घेण्याची मनापासून तयारी ठेवली तर निश्चितच यश मिळेल परंतु परीक्षा फार अवघड आहे मला जमेल का मोठ मोठे क्लासेस लावावे लागतील मी ग्रामीण भागातील आहे हे सर्व न्यूनगंड आगोदर दुर करा परीक्षेची तयारी करताना आगोदर परीक्षेचे स्वरुप समजुन घ्या मगच अभ्यास सुरु करा घरी बसुन अभ्यास करु नका असेही दुधाळ म्हणाला या वेळी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे पंचायत समीती सदस्य अरुण पा नाईक बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले कै खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड पत्रकार देविदास देसाई भरत साळूंके आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी संस्थेचे चेअरमन अनिल नाईक व्हा चेअरमन कलेश सातभाई गोरक्षनाथ कुऱ्हे गोरख गवते शेषराव पवार हर्षद दुधाळ मिलींद दुधाळ खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड भरत साळूंके अभिजीत राका गणेश लढ्ढा शितल गंगवाल अशोक पवार भाऊसाहेब वाबळे भास्कर बंगाळ प्रकाश कुऱ्हे रावसाहेब गाडे प्रकाश नाईक चंदु पा नाईक विजय कुऱ्हे अक्षय नाईक विक्रम नाईक सुधाकर खंडागळे सचिन वाबळे निलेश सोनवणे द्वाराकनाथ नवले शिवाजी वाबळे ज्ञानदेव वाबळे संजय नागले दिवाकर कोळसे किशोर राऊत अन्सार पटेल रमेश अमोलीक अशोक गवते मुस्ताक शेख अल्ताफ शेख पत्रकार देविदास देसाई सुहास शेलार दिलीप दायमा किशोर कदम आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment