श्रीरामपुर (प्रतिनिधी )- शहरातील दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत असुन तक्रार करुनही कुणीच दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ साई मित्र मंडळाचे अध्यक्ष सागर तलवार यांनी भर रस्त्यावरच मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पक्के बांधकाम करण्याचा ईशारा दिला आहे या बाबत पत्रकारांशी बोलताना सागर तलवार म्हणाले की शहरात ठिकठिकाणी अतिक्रमण वाढत आहे कुणाचाच त्यावर अंकुश राहीलेला नाही सत्ताधारी कुणाला दुःखावून आपले मत कमी करण्याच्या विचारात नाही तर विरोधकही अतिक्रमणाबाबत गप्प आहेत आता तर अनेक ठिकाणी रस्त्यावरच अतिक्रमण होत आहे सर्वसामान्यांनी आता दाद कुणाकडे मागायची सत्ताधारी व विरोधक हे कुणालाही दुखवायच्या मनःस्थितीत नाही त्यामुळे जो तो आपल्या पुढाऱ्यांच्या आड दडून अतिक्रमण करत आहे या बाबत तक्रार करुनही काहीच उपयोग होत नाही त्यामुळे आता साई मित्र मंडळाच्या वातीने रस्त्यावरच पक्के बांधकाम करुन गाळा बांधण्याचा निर्णय आमच्या मंडळाने घेतला असुन नगरपालीकेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता करण्याचा निर्णय घेण्यात आला असुन या कार्यक्रमामुळे विरोध सत्ताधाऱ्यांना काही वाटले नाही तरी निदान अतिक्रमण करणारांना जनाची नाही तर मनाची थोडीफार वाटेल असेही तलवार यांनी म्हाटले आहे.


Post a Comment