कै भागवतराव खंडागळे पाटील यांचे कार्य तरुण पिढीसाठी प्रेरणादायी
बेलापूरः(प्रतिनिधी )-बेलापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच स्व.भागवतराव खंडागळे यांनी पिण्याच्या पाण्याच्या योजनेसह हरिहरनगर व गावठाण येथे घरकुल वसाहत,खटकाळी बंधारा यासारखी विविध विकास कामे करुन गावाचे नाव उज्वल केले.त्यांचे कार्य तरुण पिढीला प्रेरणादायी असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली. बेलापूर गावला वीस वर्षे नेतृत्व देवून गावाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देणारे माजी सरपंच स्व.भागवतराव पा.खंडागळे यांची ग्रामपंचायतीच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यावेळी गावच्या दिवंगत सरपंच व उपसरपंच यांची पुण्यतिथी ग्रामपंचायतीच्या वतीने साजरी करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.यानिमित्त भागवत प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामपंचायतीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयास(रु.सात हजार),गावकरी आरोग्य निधीला(तिन हजार)तर माऊली वृध्दाश्रमास(दोन हजार)याप्रमाणे शरद नवले,प्रकाश नाईक,महेन्द्र साळवी,रवीन्द्र खटोड,भरत सोमाणी,शिवाजी वाबळे,पञकार देवीदास देसाई,दिलिप दायमा आदिंच्या हस्ते देणगी देण्यात आली.यानिमित्त जि.प.सदस्य शरद नवले,पं.समिती सदस्य अरुण पा.नाईक,भाजपाचे नेते सुनिल मुथा,सरपंच महेन्द्र साळवी,प्रवासी संघटनेचे रणजित श्रीगोड, 'अशोक 'चे माजी व्हा.चेअरमन जालिंदर कु-हे पत्रकार देविदास देसाई आदिंनी मनोगत व्यक्त करुन स्व.खंंडागळे यांच्या कार्याचा गौरव केला.उपसरपंच आभिषेक खंडागळे यांनी प्रास्ताविक तर सुधाकर खंडागळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी जि प सदस्य शरद नवले,पंस सदस्य अरुण पा नाईक,सरपंच महेंद्र साळवी,बेलापुर पत्रकार सांघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे सुनील मुथ्था,प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजित श्रीगोड,कै .मुरलीधर खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड,प्रकाश नाईक,जालिंदर कु-हे,देविदास देसाई,गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे,प्रकाश नवले,विष्णुपंत डावरे,भाऊसाहेब कुताळ,भरत सोमाणी,प्रफुल्ल डावरे,तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे,अजय डाकले,सुधाकर खंडागळे,शिवाजीराव वाबळे,पत्रकार सुहास शेलार, दिलीप दायमा,किशोर कदम रामेश्वर सोमाणी,विश्वास अमोलीक,चंद्रकांत नवले, मुस्ताक शेख, किरण गागरे, प्रकाश कुऱ्हे ,प्रसाद खरात,पोलीस पाटील अशोक प्रधान,यादव काळे,रफिक बागवान,गणेश बंगाळ,दादासाहेब आढाव,राजेंद्र अमोलिक, प्रभात कुऱ्हे ,शफीक बागवान,गोरख कुताळ, अन्वर बागवान, अमोल गाढे, महेश कु ऱ्हे,भाऊसाहेब वाबळे,रमेश लगे,प्रशांत लड्डा, जिना शेख, चंद्रकांत नवले, प्रशांत मुंडलिक, मास्टर हुडे,किशोर खरोटे,जाकीर हसन शेख,कुंदन कुताळ,बाबूलाल पठाण, शशिकांत तेलोरे,गफूर शेख,जावेद शेख, बाळू शेलार, सागर लाहोर,जय संचेती आदिंसह ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केले तर सुधाकर खंडागळे यांनी आभार मानले
Post a Comment