बेलापूर(देविदास देसाई )बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी जनता विकास आघाडीला सत्तेतून पायउतार करीत गावकरी मंडळाने ११ जागा जिंकुन सत्ता मिळविली. तर प्रदिर्घ काळ सत्तेत असलेल्या जनता विकास आघाडीला ६ जागांवर समाधान मानावे लागले.
जि. प. अध्यक्ष शरद नवले,अशोक कारखाना संचालक अभिषेक खंडागळे,भाजपचे शहराध्यक्ष प्रफुल्ल डावरे, व सुनील मुथा यांच्या नेतृत्वाखाली गावकरी मंडळाचे सौ. तबसुम आसिफ बागवान,सविता उत्तमराव अमोलिक, अभिषेक भास्करराव खंडागळे, सौ.प्रियंका प्रभात कु-हे,मुस्ताक उमर शेख,महेंद्र जगन्नाथ साळवी,सौ. मिना अरविंद साळवी, वैभव विलास कु-हे,चंद्रकांत मोहनराव नवले,सौ. उज्वला रविंद्र कुताळ,व रमेश कमलाकर अमोलिक हे विजयी झाले. प्रभाग पाच मधून गावकरी मंडळाचे महेंद्र साळवी व .सौ. मिना साळवी हे दिर भावजयी गावकरी मंडळाकडून विजयी झाले.
तर पं. स. सदस्य अरूण पा. नाईक, बाजार समिती संचालक सुधीर नवले, जनता आघाडी प्रमुख रविंद्र खटोड,माजी सरपंच भरत साळुंके यांच्या नैतृत्वाखालील जनता विकास आघाडीचे रविंद्र मुरलीधर खटोड,भरत अशोकराव साळुंके, सौ. रंजना किशोर बोरुडे, सौ. शिला राम पोळ,सौ. सुनीता राजेंद्र बर्डे व सौ.छाया बाळासाहेब निंबाळकर हे सहा उमेदवार विजयी झाले.
प्रभाग निहाय उमेदवार व त्यांना मिळालेली मते याप्रमाणे-
*प्रभाग-१* रविंद्र मुरलीधर खटोड *विजयी* ज वि आ (७४१),संजय बापूराव गोरे-पराभूत गा मं (५६१)राजेंद्र राशीनकर-पराभूत-स्वतंत्र(३३),
सौ. रंजना किशोर बोरुडे-* *विजयी* ज वि आ (६७१),सौ. माधुरी प्रशांत ढवळे पराभूत- गा मं (६५०),सौ. तबसुम असिफ बागवान *विजयी* गा मं (६३०),सौ. शिरीन जावेद शेख-पराभुत ज वि आ (५८५),सौ.सय्यद बेगम आबुताहेर-पराभूत-स्वतंत्र(९०)
*प्रभाग-२* भरत अशोकराव साळुंके *विजयी* ज वि आ (५८६),प्रफुल्ल हरिहर डावरे-पराभुत गा मं (५५४),कैलास मदनलाल चायल -पराभूत स्वतंत्र(५४१)
कु. सविता उत्तमराव अमोलिक *विजयी* गा मं (८१८),सौ. छाया विलास सोनवणे-पराभुत ज वि आ (७५७),सौ. नंदा अनिल पवार -पराभूत स्वतंत्र(८६)
सौ. शिला राम पोळ *विजयी* ज वि आ (९३६),सौ. सोनाली हेमंत बनभेरू पराभुत-गामं(७२८)
*प्रभाग-३* अभिषेक भास्करराव खंडागळे *विजयी* गा मं ( १०१८ ),चंद्रकांत गुलाबराव नाईक-पराभुत ज वि आ ( ५७८ ),नवाज इलियास शेख-पराभूत स्वतंत्र( ४५६ ),
सौ. प्रियंका प्रभात कु-हे- *विजयी* गा मं ( ११४५),सौ.गौरी चेतन कु-हे पराभूत ज वि आ (८७० )
*प्रभाग-४* मुश्ताक उमर शेख- *विजयी* गा मं ( ९१०), हरुन महेमुद सय्यद पराभुत -ज वि आ (६९६),सौ. छाया बाळासाहेब निंबाळकर *विजयी* ज वि आ ( ८१६),सौ. कल्याणी रमेश लगे पराभूत गा मं (७९४ ),सौ. सुनीता राजेंद्र बर्डे *विजयी* ज वि आ ( ८५२),सौ. कमल भगवान मोरे पराभुत गा मं( ७४८)
*प्रभाग-५* महेंद्र जगन्नाथ साळवी *विजयी* गा मं ( ७२२ ),विशाल डॅनियल साळवे पराभुत ज वि आ ( ५०६ ), अच्छेलाल यादव पराभुत -स्वतंत्र (१०७),सुविध भोसले पराभुत स्वतंत्र(१७),वैभव विलास कु-हे *विजयी* गा मं ( ७०८),विजय लहू कु-हे पराभूत ज वि आ (६७३) , ,सौ.मिना अरविंद साळवी *विजयी* गा मं ( ६५९ ),सौ.राणी मिलिंद एडके -पराभुत ज वि आ ( ६०७),कविता झिने पराभुत स्वतंत्र (९३ )
*प्रभाग-६* चंद्रकांत मोहनराव नवले *विजयी* *गा मं (९९७),सुधीर वेणूनाथ नवले पराभूत ज वि आ (८५०),राजेंद्र मोहन राशीनकर पराभुत स्वतंत्र(५४),अच्छेलाल यादव पराभुत स्वतंत्र(६३),निलेश प्रकाश पाटणी पराभुत स्वतंत्र(६३),रमेश कमलाकर अमोलिक* *विजयी* *गा मं (१०५०),भाऊसाहेब वसंत तेलोरे पराभुत ज वि आ (९३२),सौ. उज्वला रविंद्र कुताळ *विजयी* गामं(१०९६),सौ.सिमा विवेक वाबळे पराभुत ज वि आ (८७७)याप्रमाणे मते मिळाली आहेत*.
*या निवडणुकीत अरुण पा. नाईक यांचे बंधु चंद्रकांत नाईक यांचा अभिषेक खंडागळे यांनी मोठया मताधिकक्याने तर सुधीर नवले यांचा शरद नवले यांचे बंधु चंद्रकांत नवले यांनीही मोठया फरकाने धक्कादायक पराभव केला*.
*तर प्रभाग दोन मध्ये माजी सरपंच भरत साळुंके यांनी लक्षवेधी तिरंगी लढतीत तिसऱ्यांदा बाजी मारली.त्यांनी भाजपचे शहराध्यक्ष* *प्रफुल्ल डावरे व स्वतंत्र उमेदवार कैलास चायल यांचा पराभव केला .येथे मोठी मत विभागनी झाली.तसेच रविंद्र खटोड यांनी नवखे उमेदवार संजय बापूराव गोरे यांचा मोठया फरकाने पराभव करून तिसऱ्यांदा बाजी मारली .जनता आघाडीच्या सौ. छाया विलास सोनवणे या सविता अमोलिक यांच्याकडून पराभूत झाल्या आहेत. येथे जनता आघाडीच्या वेळेत अर्ज माघारी घेऊ न शकलेल्या व नंतर जनता आघाडीला पाठिंबा दिलेल्या सौ. नंदा अनिल पवार यांना ८६ मते मिळाली. त्यांची तांत्रिक उमेदवारी राहिल्याचा फटका आघाडीच्या सौ. सोनवणे यांना बसला*.
*मात्र एवढ्या अटीतटीच्या निवडणुकीतही प्रभाग १ आणि २ मध्ये खटोड-साळुंके यांच्या नैतृत्वाखालील जनता आघाडीचे आजही वर्चस्व कायम असल्याचे दाखवुन दिले आहे*.
*माजी उपसरपंच रविंद्र खटोड व भरत साळुंके प्रतिक्रिया देताना म्हणाले की, कर्मयोगी मुरलीधर खटोड यांचा समर्थ वारसा पुढे चालविताना गावाच्या विकासाला बांधील राहुन काम करु.सक्षम सकारात्मक विरोधकांची भूमिका बजावताना सत्ताधाऱ्यांना चांगल्या कामात साथ देऊ.तर सुधीर नवले म्हणाले की, जनतेने दिलेला कौल मान्य आहे.हा जनतेची दिशाभूल, दहशत, दादागिरी व धनशक्तीचा विजय आहे.*
*जि. सदस्य शरद नवले यावेळी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, निवडणूक संपली मतभेद संपले. आता गावाच्या विकास कामांना प्राधान्य देणार आहोत. पिण्याच्या पाण्याची योजना,घनकचरा आदीकामे प्राधान्याने करणार आहोत. विजय सुज्ञ मतदारांना समर्पित करीत आहोत.*विजया नतंर बोलताना अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे म्हणाले की आमचा कारभार पारदर्शी अन सर्वांना विश्वासात घेवुन होणार आहे ३६५ दिवसात आमच्याकडून योग्य कारभार झाला नाही तर आमचा राजीनामा श्रेष्ठींनी घ्यावा तो देण्यास आम्ही बांधील आहोत.