बेलापुर (प्रतिनिधी )-आपल्या पुढील पिढीच्या भवितव्यासाठी गावात जे चुकीचे चालले आहे ते बंद पाडा संस्कृतीक परंपरा लाभलेल्या गावात आपल्या आया- बहीणींची इज्जत सुरक्षित ठेवायची असेल तर गावकरी मंडळाला विजयी करा चुकीच्या कामाबाबत आवाज उठवा नाहीतर भावी पिढी माफ करणार नाही असा खणखणीत इशारा गावकरी मंडळाचे नेते सुनिल मुथा यांनी दिला आहे ग्रामपंचायत निवडणूकीच्या प्रचारार्थ गावकरी मंडळाच्या गणपती गल्ली केशव गोविंद मंदिर चौक शिवनेरी गल्ली आयोध्या काँलनी रामगड गायकवाड वस्ती येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.आपल्या भाषणात गावकरी मंडळाचे नेते सुनिल मुथा पुढे म्हणाले की जि प शरद नवले यांनी सत्ताधार्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा बुरखा फाडलाच आहे पंरतु आणखी बरेच काही कारनामे पुराव्यासह माझ्या हाती आले आहे त्यांनी तोंड उघडण्याची भाषा केली मग मी पण आता तोंड उघडाच मग माझ्याकडे असलेली जादुई पोटलीच उघडतो मग त्यातुन कुणाचे काय बाहेर येईल हे सांगता येत नाही ते जर जनते समोर आणले तर जनता तुमचे कपडे.काढल्याशिवाय राहणार नाही आपल्या इज्जतीच पंचनामा होईल म्हणून माझ्याकडे मध्यस्थ पाठविले त्यामुळे मी पण ते टाळले नाही तर ... गावातील चुकीच्या कामावर बोट ठेवण्याची जबाबदारी आपली आहे ग्रामपंचायत कारभारावर नियंत्रण ठेवले नाही तर हे पुढारी गावही विकतील तेव्हा मतदारांनो जागृक व्हा प्रत्येक कामाची माहीती विचारा सत्ताधार्यावर अंकुश ठेवा हे काम माझ्या एकट्याचे नाही कारभारावर अंकुश नसेल तर सत्ताधारी मन मानेल तसे वागतात पण ते होवु देणार नाही गावकरी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जरी चुका केल्या तरी त्यांना देखील जाब विचारण्याची दाणत आपल्यात आहे अनेक ठिकाणी गटारी झाल्या पण केवळ बिले काढुन मोकळे झाले गटारीला ढाळच नसल्यामुळे सांडपाणी जागेवरच तुंबले आहे हे लोक मला सांगतात परंतु ते काम होतानाच आपण संबधीतंना जाब विचारला पाहीजे होता सगळे ठेकेदार एकत्र होवुन सत्ता मिळविण्यासाठी धडपड करत आहे पण या वेळेस जनता मतदार हुशार झालेला आहे तुमच्या काळ्या पिशव्या व आणखी काही घेवूनही मतदार गावकरी मंडळालाच विजयी करतील यात शंकाच नाही ज्यांनी गावची मुख्य बाजारपेठ भकास करण्याचे महापाप केले त्यांना पेठेत फिरकु देवु नका ग्रामपंचायतीचे भंगार विकणारे कोण अन बोंब झाल्यावर परत आणणारे कोण हे आता जनतेला समजले आहे गावात वाढत चाललेले आतिक्रमण हा फार गंभीर प्रश्न आहे पंरतु कार्यकर्ते दुखवायचे नाही म्हणून हे गप्प आहे पेठेतुन पायी चालणेही अवघड झाले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर भिंत बांधली अन एकानेही आवाज उठविला नाही गावकरी मंडळाच्या ताब्यात सत्ता द्या मी स्वतः जावुन ती भिंत तोडेल माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल पण गावाच्या हितासाठी मी ते करेल असेही मुथा म्हणाले
Post a Comment