मळहद परिसरातुन गावकरी मंडळास वाढता पाठींबा या वेळेस ईतिहास बदलणार.
बेलापुर (प्रतिनिधी )- प्रभाग क्रमांक १ मधील नदीच्या पलीकडे असणारा भाग मळहद परिसरातुन गावकरी मंडळास वाढता पाठींबा मिळत असुन या वेळेस प्रभाग क्रमांक १ मधुन ईतिहास घडण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक १ मधे एकुण मतदार १८५५ असुन त्यातील दोनशेच्या पुढे मतदार मयत आहेत म्हणजे एकुण मतदान १६५० च्या आसपास आहे जवळपास १३५० ते १४०० मतदान होण्याची शक्यता गृहीत धरली तर निवडून येण्याकरीता ७००च्या पुढेच मते मिळवावी लागतील या प्रभागात असणार्या मळहद भागात मतदारांची संख्या ३३७ असुन या वेळेस हेच मतदार विजयी उमेदवार ठरवु शकतील या भागातुन आजपर्यंत एकाही व्यक्तीला जनता अघाडीच्या वतीने उमेदवारी दिली गेलेली नाही त्यामुळे या परिसरातुन नाराजीचा सुर आहे या भागातील नागरीकांच्या अनैक समस्या आहेत परंतु त्याकडे फारसे कुणीही लक्ष दिले नाही त्या भागात स्मशानभूमीचा प्रश्न होता तो मोठ्या मुश्कीलीने सोडविला गेला अनेक ठिकाणी पावसाळ्यात वस्तीवर जाता येत नाही पण उमेदवार केवळ पाच वर्षतुन येतात त्यामुळे त्यांना येथील परीस्थीतीची जाणीव नाही त्यामुळेच तर एका निवडणूकीवर बहीष्कार टाकण्याची घोषणा या भागातील नागरीकांनी केली होती त्यांनंतर काही सुधारणा होवुन या भागातील प्रश्न मार्गी लागतील असे वाटले होते परंतु तसे काही झालेच नाही त्यामुळे हा परिसर बेलापुर खूर्द ग्रामपंचायतीला जोडण्याचीही मागणी करण्यात आली होती या सर्व बाबीचा विचार करुन गावाकरी मंडळाचे नेते शरद नवले यांनी प्रभाग १ मधुन बागवान तबसुम शफीक या मळहद येथील महीलेस उमेदवारी दिल्यामुळे या भागातील मतदारांचा उत्साह वाढला आहे तसेच गोरे सांजया बापुराव व सौ माधुरी प्रशांत ढवळे यांना उमेदवारी दिली असुन त्यांचे चिन्ह रोलर ट्रँक्टर व अँटोरिक्षा आहे गावकरी मंडळाच्या प्रचारात आता मळहद परिसरातील कार्येकर्ते उत्साहात काम करताना दिसत आहे त्यामुळे मंडळाच्या नेत्यामध्येही कमालीचा उत्साह जाणवत आहे.
Post a Comment