बेलापुर (प्रतिनिधी )- बेलापुर गटातुन दोन वेळा जिल्हा परिषदेत निवडून येवुन नऊ वर्षात या गावाला किती निधी दिला आगोदर याचा खूलासा करा मग आमच्या कामावर बोट ठेवा लोकांनी तुम्हाला जिरवा- जिरवी करीता निवडून दिले नाही याचे भान ठेवा असा सवाल बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांनी केला आहे जनता विकास अघाडीच्या वतीने गावात अनेक ठिकाणी काँर्नर सभा आयोजित करण्यात आल्या होत्या त्या सभेत बोलताना बाजास समितीचे संचालक व जनता विकास अघाडीचे नेते सुधीर नवले म्हणाले की आम्ही भ्रष्टाचार केला हीच एकच कँसेट शरद नवले वाजवत आहे कामावर चर्चा करा आम्ही न केलेली कामे दिसतात त्याच बरोबर केलेली कामे पण सांगा की जनतेला स्वतः काही करायचे नाही अन आम्ही केलेल्या कामावर खोट्या तक्रारी करुन अधिकार्यावर दबाव आणून चुकीच्या कारवाया करण्यास भाग पाडण्या पलीकडे आपण केले काय हे सांगा तुम्हाला आलेल्या निधीपैकी किती निधी गावाला दिला याचा खूलासा करा लोकांनी जिल्हा परिषद सदस्य केले ते विकास कामे करण्यासाठी कुणाच्या मागे चौकशीचा ससेमीरा लावण्यासाठी नाही आपण नेमलेले दलाल लोकाकडून पैसे उकळतात हे दिसत नाही का उगीच भूई थोपटू नका विकास कामावर बोला आमचे काम बोलते आहे काम करणारा थोडा फार चुकणार आहे पण आपण जि प सदस्य असताना काहीच केले नाही दुसर्यांच्या चौकशा लावण्या पलीकडे त्यामुळेच आता पराभव दिसु लागल्यामुळे बेताल आरोप सुरु केले असुन कोण कामाचा कोण बिन कामाचा हे जतनेला माहीत आहे कोण गोड हसातो गोड बोलतो हे ही ठाऊक आसल्यामुळे लोकही आता त्यांच्याबरोबर गोडच बोलत आहे १५तारखेनंतर सागळा खूलासा होणारच आहे मतदार सुज्ञ आहेत ते खोट्या भुलथापेला बळी पडणार नाही असेही सुधीर नवले म्हणाले.

Post a Comment