बेलापुर (प्रतिनिधी )-सत्ताधार्यांना दहा वर्षाच्या कार्यकाळात शासनाचा २० कोटी रुपयाचा निधी मिळाला अन या पैशात एकही ठोस काम झाले नाही मग हा निधी गेला कुठे असा सवाल करुन गावाच्या विकासाठी गावकरी मंडळाच्या सर्व सदस्यंना निवडणूक द्या असे अवाहन गावकरी मंडळाचे नेते जि प सदस्य शरद नवले यांनी केले.गावकरी मंडळाच्या प्रचारार्थ गावात गावठाण सुभाषवाडी शेलारवाडा राजवाडा खटोड काँलनी येथे आयोजित सभेत बोलताना जि प सदस्य शरद नवले म्हणाले की गावाच्या विकासाचा एक मास्टर प्लँन आपण तयार केलेला आहे आमच्या ताब्यात आपण सत्ता दिली तर आम्ही एकदम पारदर्शी कारभार करु ग्रामपंचायतीचे सर्व कामकाज संगणका मार्फत केले जाईल दररोजच्या कामाचा हिशोब कार्यालयाच्या फलकावर लावला जाईल ग्रामस्थांना आपल्या तक्रारी करीता ग्रामपंचायत कार्यालयात येण्याची गरज नाही त्याकरीता एक टोल फ्री नंबर दिला जाईल नागरीक घर बसल्या आपली तक्रार करु शकेल अशी व्यवस्था केली जाईल मागील बोगसगीरी
भ्रष्टाचाराला आमच्याकडे थारा नसेल पिण्याचे पाणी रस्ते गटारी नागरीकांचे आरोग्य या कामास प्राधान्य दिले जाईल एवढा मोठा निधी आला असताना त्याचा वापर सत्ताधार्यांनी केवळ खिसे भरण्यासाठी केला अन मी कामाला आडवे येतो असा कांगावा केला मी आडवे आलो पण चुकीच्या कामाला गावात चाललेल्या चुकीच्या कामावर बोट ठेवले बोगस बिले काढणार्या विरुध्द आवाज उठविली यांना पैसे खायला अडचण होवु लागल्यामुळे माझ्या नावाने ओरडायला लागले दोनदा सरपंच पद भोगलेली व्यक्ती चुकीच्या कामामुळे अपात्र ठरविली गेली काहींनी तर संबध नसतानाही ग्रामपंचायत ठेकेदारीवर चालवायला घेतली अन कुणीही विरोध केला नाही मन मानेल तसे काम करुन बोगस बिले काढली चुकीचे कामकाज चाललेले असतानाही कुणीही विरोध केला नाही आमच्या सदस्यांनी त्यास विरोध केला गावाचा निधी स्वतःच्या फायद्याकरीता वापरला दुसरीकडील रस्ता आपल्या काँम्प्लेच्या फायद्याकरीता बस स्टँडच्या मागे करुन घेतला झाडे तोडली चुकीच्या कामांना विरोध केल्यामुळे त्यांनी माझा धसका घेतला आहे स्वतःच्या काँम्प्लेक्ससाठी ४० फुटाचा रस्ता करुन घेतला अन ९ लाख रुपयाचे बिल काढले असे चुकीचे काम करणारांना मतदानाच्या माध्यमातून जाब विचारण्याची वेळ आलेली आहे गावकरी मंडळाच्या ताब्यात सत्ता द्या निधी आणण्याचे काम माझे आहे असेही जि प सदस्य शरद नवले म्हणाले.
Post a Comment