बेलापुर (प्रतिनिधी )-गावाच्या विकासासाठी गावकरी मंडळाच्या ताब्यात सत्ता द्या गावकरी मंडळाच्या कारभारावर नियंत्रण ठेवुन विकास कामे करुन घेण्याची जबाबदारी माझी आहे असे विधान गावकरी मंडळाचे नेते सुनिल मुथा यांनी केले गावकरी मंडळाच्या प्रचारार्थ खटोड काँलनी येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते आपल्या भाषणात मुथा पुढे म्हणाले की आपला स्वाभिमान गहान ठेवु नका आज पैशाच्या जोरावर तुमची मते विकत घेतली जातील परंतु पाच वर्षे तुम्ही विकास कामावर बोलुच शकणार नाही कुणी काम घेवुन गेले तर ते लगेच पैसे घेवुन मतदान केले हे म्हणतील त्यामुळे आपला मतदानाचा हक्क न घाबरता आपली
सदसद विवेक बुध्दी जागी ठेवुन मतदान करा समोरच्या पार्टीने काही दिले तरी ते घ्या पण मतदान गावकरी मंडळालाच करा या निवडणूकीत मोठ्या प्रमाणात पैशाची उधळपट्टी होणार असली तरी तो पैसा सत्तेतुनच मिळविलेला आहे तो गावाचा म्हणजे आपलाच पैसा आहे पैसा त्यांचा घ्या पण मतदान गावकरी मंडळाला करा मी आजपर्यत गावाच्या विकासासाठी भाडणे करत आलेलो आहे हे सर्वांनी पाहीले आहे मग ते अतिक्रमण असो रस्त्याचे काम असो की भंगार चोरीचे प्रकरण असो चुकणाराला जाब विचारण्याची आपल्यात दानत आहे दहा वर्ष सत्ता भोगली म्हणून काहींना वाटत असेल की आम्ही गावचे मालक झालो तर तो समज काढुन टाका कै मुरलीशेठ खटोड यांनी २२ वर्ष गाव गाडा हाकला पण कुणाची त्यांच्या कारभारावर बोट ठेवण्याची ताकद झाली नाही अन आज काय चालले आहे हे सर्व आपल्या समोर आहे या भागातील फार वर्षापासुनचा प्रलंबीत असलेला गटारीचा प्रश्न तातडीने सोडविला जाईल या बाबत संबधीत सोमाणी कुटुंबीयांशी चर्चा झालेली आहे अन मार्गही निघालेला आहे त्यामुळे गावकरी मंडळाचे सर्व उमेदवार तरुण तडफदार असुन ते निश्चितच गावचा चेहरा मोहरा बदलुन टाकतील असेही मुथा म्हणाले.
Post a Comment