बेलापुर (प्रतिनिधी )- आमच्या ताब्यात असलेल्या संस्थांच्या माध्यमातून गावातील समस्या सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणखी काही राहीलेली कामे पुर्ण करण्यासाठी जनता विकास अघाडीच्या सर्व मतदारांना निवडून द्या असे अवाहन जनता अघाडीचे नेते रविंद्र खटोड यांनी केले जनता विकास अघाडीच्या वतीने विविध भागात घेण्यात आलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते आपल्या भाषणात जनता अघाडीचे नेते रविंद्र खटोड म्हणाले की पाच वर्षात गावात रस्ते गटारी स्ट्रिट लाईट स्वच्छता अशी अनेक कामे केली विरोधकांनी एकही काम न करता केवळ आरडा- ओरड अडथळा आणण्याचे काम केले सदस्यावर ग्रामसेवकावर कारवाई करण्यासाठी आपली ताकद पणाला लावली तीच ताकद गावाकरीता मोठा निधी आणण्यासाठी खर्च करा जनता तुम्हांला डोक्यावर घेईल पावसाळ्यात जशा छत्र्या उगवतात तसे निवडणूक आली की यांना जनतेची आठवण येते कोरोना काळात हेच बोंबा मारणारे कुठे दडून बसले होते यांना जनतेच्या नाही आपल्या जिवाची भिती होती म्हणून तर हे घरात दडून बसले होते त्यावेळेस गावातील लोकांच्या मदतीला आम्ही धावुन आहे ते आमचे कर्तव्ये होते सकाळ पासुन सायंकाळ पर्यत आम्ही गावात ठाण मांडून होतो कुणाला काय लागते कुणाला उपचाराची गरज आहे हे आम्ही कोरोनाला न घाबरता करत होतो हे काम सार्या गावाने पाहीले आहे ते तुम्हाला कसे दिसणार कारण तुम्ही आपल्या कुटुंबा समवेत घरात सुखरुप होता त्यामुळे कोण कामाचा कोण बिन कामाचा हे मतदारांना सांगण्याची गरज नाही सर्वांच्या सुख दुःखात आम्ही सहभागी होणारी माणसे आहेत आपल्या सारखी खोटे हसणारे तोंडावर गोड बोलणारे नाही आमच्या ताब्यात असणार्या संस्थेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न आम्ही सोडविले आपण काय केले याचे आत्मपरिक्षण करा असा मोलाचा सल्लाही खटोड यांनी दिला
Post a Comment