बेलापुर (प्रतिनिधी )--जिल्हा परिषदेत काम करत असताना जास्तीत जास्त निधी आणून गावाची विकास कामे केली तर विरोधकांनी बोगस कामे करुन शासनाच्या पैशावर डल्ला मारल्याचा आरोप जि प सदस्य शरद नवले यांनी केला आहे* *सत्ताधारी मंडळींनी 10 वर्षात काय कारभार केला तो आपल्या समोर आहे, आणि मी 15 वर्षापुर्वी सरपंच असताना काय विकासाचे कामे झालीत तेही आपल्यासमोर आहेत. - तुमच्या आशिवार्दाने आणि माजी मंत्री.
आ. राधाकृष्ण विखे पाटील व माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या* *मार्गदर्शनाखाली गेल्या 10 वर्ष जिल्हा परिषदेत काम करत आहे. त्यांनी दिलेल्या संधीचा वापर मी गावाला भरीव विकास निधी मिळवून देण्यासाठी केला.तर सत्ताधां-यांनी मिळालेल्या निधीतून मलिदा खाण्याचे काम केले. दोन्ही उमेदवारांच्या पॅनलची तुलना करण्याची खरी गरज आहे. ' वित्त ' आयोगातून बेलापूर ग्रामपंचायतीला कोट्यावधीचा निधी मिळालेला असताना हा निधी गेला कुठे? मिळालेल्या निधीतून गावामधील कामे झालीत का ? हा निधी सत्ताधाऱ्यांनी लाटला
असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे सदस्य शरद नवले यांनी गावकरी मंडळाच्या उमेदवारांच्या कुऱ्हे वस्ती, राजवाडा येथील झालेल्या प्रचार सभेत बोलताना केले. - नवले पुढे म्हणाले की, ग्रामपंचायत जशी बटाईने चालवण्यास घेतली होती सदस्य नसतानाही तिसरीच व्यक्ती सकाळ पासुन ग्रामपंचायत कार्यालयात ठाण मांडून बसायची.जे साधे सदस्य नाहीत ते जणू ग्रामपंचातीचे मालक बनले होते.ज्याचे केवळ 2 सदस्य निवडून आले होते, त्याने आमच्याबरोबर असणार्या इतरांना फोडाफोडीचे राजकारण केले. हा ठेकेदार ग्रामपंचायतीत निवडून आलेला नाही, त्यांचा काहिही संबध नाही, त्यांनी दीड ते दोन वर्षात १५ कोटीचा निधी हडप केला असल्याचा आरोप नवले यांनी केला आहे.-कामावर काहीच न बोलता फक्त लोकांची दिशाभूल करण्याची सत्ताधाऱ्यांची सवय आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर सीसीटीव्ही कॅमेरे, असताना सामानाची चोरी होते, तेथील चोरटे पकडणे आवश्यकता असताना लबाडांनी कॅमेरेचे बंद करून ठेवले. जर तुम्ही चोरांच्या हातात चाव्या दिल्यात तर, हे भामटे आश्वासनावर आश्वासने दाखवतील, त्यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, १० वर्षाच्या कामाचा हिशोब मागा, मगच तुम्हाला कळेल, ' दाल में कुछ काला है ' या - टोळीचा नायनाट करायचा आहे.अश्या लोकांना निवडून देणार आहात,का ? आपल्या सुख : दुःखात मीच आहे, आता दोन अफवा येणार आहे. -प्रचार सभेत बोलताना अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांनी आपलं अपयश झाकण्यासाठी काय प्रयत्न करणार आहोत, तुम्हीच्या सारख्याच सगळ्यांच्या आशिवार्दाने सहकाऱ्याने मला वयाच्या २६ व्या वर्षीच अशोक कारखान्यात संचालक म्हणून संधी मिळाली, सत्ताधाऱ्यांनी चुकीचे कामे होत असेल तर, त्यावर आम्ही विरोध दर्शविला अन् सक्षम विरोधाची भूमिका आम्ही बजावली,असल्याचा दावा अभिषेक खंडागळे यांनी केला दादागिरी, दमबाजी, सत्ता व पैश्याची मस्ती असणार्याना या निवडणूकीत , धडा शिकवीला पाहीजे- बेलापूर गावात असणार्या शंभर वर्षापूर्वीचे चिंचेचे आणि पिंपळाचे झाड हकनाक तोडले, गावात ४० फुट आकाराचा रस्ता आहेत का ? तो दाखवा त्यावर तुम्ही बोलण्याला तयार नाही, मग तुम्ही कुत्र्या - मांजरासारखे पळून जाता - इतक्या मोठ्या ग्रामपंचायतीला विकासकामांना निधी मिळत असताना कामे करण्याऐवजी फक्त खिसे भरण्यवयाचे गोरखधंदा सत्ताधाऱ्यांनी चालविला २५ हजार लोकसंख्या असलेल्या गावात विकासकामांचा अभाव असल्याचे पहायला मिळत असून कुठे नेऊन माझं बेलापूरगाव अशी म्हणायची वेळ ग्रामस्थांवर आली.
Post a Comment