बेलापुर (प्रतिनिधी )- गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात बेलापुर परिसरात भरपुर विकास कामे केली असुन राहीलेली कामे पुर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा जनता विकास अघाडीच्या सर्व सतरा उमेदवारांना निवडणूक द्या असे अवाहन जनता विकास अघाडीचे नेते व वार्ड क्रमांक सहाचे उमेदवार सुधीर नवले यांनी केले आहे जनता विकास अघाडीच्या प्रचारार्थ रामगड गायकवाड वस्ती येथील आयोजित प्रचार सभेत बोलताना सुधीर नवले पुढे म्हणाले की रामगड येथे रस्ते गटारी मस्जिद व शाळेजवळ पेवींग ब्लाँक आदि कामे केली काही घराकुलाचा प्रश्न प्रलंबित आहे तो येत्या पाच वर्षाच्या काळात सोडविला जाईल रामगडला चोवीस तास वापरासाठी खारे पाणी उपलब्ध करुन दिलेले आहे विरोधक केवळ आमच्या नावाने बोंबा मारण्याचे काम करत आहे जि प चे पद असताना गावात केलेली कामे आगोदर सांगा मग आमच्यावर बोला आपल्या हातुन एकही ठोस असे विकासाचे काम झाले नाही त्यामुळै जनता आपल्याला मत देणार नाही आपला पराभव निश्चित आहे याची जाणीव झाल्याने दुसर्याला पुढे करुन खालच्या पातळीवर भाषा वापरण्याचे उद्योग या महाभागाने सुरु केले आहे शिवराळ भाषा वापरण्याचे बंद करा कायदेशीर सल्ला घेवुन त्या बाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे आम्ही पण त्या भाषेत बोलू शकतो परंतु आमचे ते संस्कार नाही विकास कामावर बोला असेही नवले म्हणाले या वेळी श्रीरामपुर नगरपालीकेचे नगरसेवक हाजी अंजुमभाई यांनी जनता विकास अघाडीच्या सर्व उमेदवारंना निवडून द्या विकासा कामे करवुन घेण्याची जबाबदारी आपली आहे या वेळी शेषराव पवार गोविंद वाबळे जनता अघाडीचे नेते रविंद्र खटोड पंचायत समीती सदस्य अरुण पा नाईक यांचीही भाषणे झाली.
Post a Comment