
गांवकरी मंडळाच्या प्रचार फेरीस चांगला प्रतिसाद मंडळाच्या नेत्यांचा विजयाचा दावा.
बेलापुर (प्रतिनिधी )-गावकरी मंडळाने काढलेल्या प्रचार फेरीस नागरीकांनी मोठ्या उत्सहात प्रतिसाद दिला महीला पुरुष मोठ्या संख्येने या प्रचार मोहीमेत सहभागी झाले होते महीलासह सर्वांच्याच डोक्यात टोप्या घातलेल्या होत्या त्या टोप्यावर दोन्ही बाजुने गावाकरी मंडळाची निशाणी ट्रँक्टर रोडरोलर रिक्षाचे चिन्ह छापलेले होते बाजारा पेठेतील हनुमान मंदिरापासुन प्रचार फेरीस सुरुवात झाली प्रत्येक गल्ली गल्लीतुन जात उमेदवारांनी मतदारांना मत देण्याचे अवाहन केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन फेरीची सांगता झाली सायंकाळी आझाद मैदान येथे झालेल्या प्रचार साभेतही नागरीकांची मोठी गर्दी पहावयास मिळाली प्रचार फेरीस मिळालेला प्रतिसाद पहाता व सभेची गर्दी पहाता या वेळेस गांवकरी मंडळ विजयी होईल असा दावा मंडळाच्या नेत्यांनी केला आहे.

Post a Comment