बेलापुर (प्रतिनिधी )- सत्तेच्या धुंदीत मद मस्त झालेल्यांना आता घरचा रस्ता दाखवुन गावकरी मंडळाच्या सर्व सतरा सदस्यांना निवडून द्या त्यांच्याकडून दर्जेदार काम करुन घेण्याची जबाबदारी माझी आहे असे अवाहन गावकरी मंडळाचे नेते सुनील मुथा यांनी केले गावकरी मंडळाच्या वतीने आझाद मैदान येथे आयोजित प्रचार सांगता सभेत अध्यक्ष पदावरुन बोलाताना मुथा म्हणाले की एका विकास कामाला दहा वर्षातुन एकदाच निधी येतो त्यामुळे त्या निधीचा विनियोग योग्य प्रकारे झाला पाहीजे सत्ताधार्यांनी गटारीची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची केली असुन गटारीतुन सांडपाणी वाहुनच जात नाही केवळ काम उरकायचे अन बिल काढायचे हाच एकमेव धंदा चालू असुन मतदानातुन या महाभागांना जाब विचारा चुकीच्या कामाचा जाब विचारण्याची जबाबदार आपलीच आहे मला त्याचे काय असा विचार जर सर्वांनी केला तर यांचे धंदे जोरात चालतील चुकीच्या कामांना अन चुकीच्या माणसांना पाठीशी घालु नका हीच वेळ आहे नाही तर पाच वर्ष पश्चात्ताप करण्याची वेळ येईल गावात चाललेल्या चुकीच्या कामाबाबत मीच वेळोवेळी आवाज उठविला असेही मुथा म्हणाले तुमच्या बापाबरोबर मी काम केलेले आहे ते करताना अभिमान वाटायचा आज तुमचे काम पाहुन लाज वाटते पैसा वाटला की निवडून येता येते हा गैरसमज काढुन टाका सत्तेतुन पैसा कमवायचा पैशातुन गुंड गोळा करायचे ते ग्रामसभेत आणायचे अन बोलणाराला दमबाजी करायची ही यांची पध्दत आहे ग्रामपंचायतीकडे लाखो रुपयाचे भंगार पडलेले आहे ते एका व्यक्तीच्या घरात पडलेले आहे गावची ग्रामपंचायत म्हणजे आपली घरची मालमत्ता असल्यागत ही मंडळी वावारत आहे गावात वेगवेगळ्या टोळ्या तयार झालेल्या आहे आता त्यात कर्मचाऱ्यांची टोळी देखील सामील झाली आहे आपल्या मर्जीने कर्मचारी भरले त्याचा बोजा आपल्यावर पडत आहे त्यामुळे आता जागे होवुन मतदान करा असे अवाहनही मुथा यांनी केले आहे.
Post a Comment