बेलापुर (प्रतिनिधी )-श्रीरामपुर येथील एका व्हाँटसअप गृपवर दोन समाजात तेढ निर्माण होईल या उद्देशाने मजकुर टाकल्याबद्दल दोन व्यक्तीवर कारवाई करण्यात आली असुन सोशल मिडीयावर आक्षेपार्ह मजकुर टाकल्यास कडक कारवाई करण्याचा ईशारा पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी दिला आहे.श्रीरामपुर येथील एका गृपवर दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट टाकण्यात आली होती ही बाब बेलापूर येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक सानप यांच्या लक्षात आणुन दिली पोलीस निरीक्षक सानप यांनी तातडीने संबधीत गृप अँडमीनला बोलावुन घेतले व संबधीत आक्षेपार्ह पोस्ट बद्दल विचारणा केली त्यांनी ही पोस्ट दोन युवकांनी टाकली असुन त्या नंतर गृपचे सेटींग बदलुन ओन्ली अँडमीन असे करण्यात आल्याचेही सांगितले त्यामुळे पोलीस निरीक्षक सानप यांनी त्या दोघांना तातडीने ताब्यात घेण्याचे आदेश दिले पोलीस स्टेशनला आणल्या नंतर त्या दोघांनी ती आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचे कबुल केले त्यां नंतर त्यांचेवर दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या हेतूने पोस्ट टाकून समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला त्या दोघांना पोलीस स्टेशनला आणल्या नंतर श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला मोठा जमाव जमा झाला होता पोलीसा निरीक्षक सानप यांनी दोन्ही बाजुच्या लोकांना समजुन सांगीतले व अशा प्रकारे पोस्ट टाकणार्या व्यक्ती विरुध्द कडक कारवाई केली जाईल सोशल मिडीया हे चांगले प्रसार माध्यम असले तरी त्याचा गैरवापर कुणी करु नये व्हाँटस्अप गृप फेस बुक ट्विटर वर कुणी कुणाचा अपमान मानहानी होईल अशी पोस्ट टाकल्यास वा फाँरवर्ड केल्यास गृप अँडमीनसह पोस्ट फाँरवर्ड करणारावर कडक कारवाई केली जाईल सर्व व्हाँटस्अप गृपवर पोलीसांची नजर आहे समाजात अशांतता निर्माण होईल असे कृत्य कोणी करु नये असे अवाहनही पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी केले आहे.
Post a Comment