श्रीरामपुर (प्रतिनिधी )-श्रीरामपुर पोलीस स्टेशनला नव्यानेच आलेले पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी कामकाजाच्या दुसर्याच दिवशी एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुसासह एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला नव्यानेच हजर झालेले पोलीस निरीक्षक संजय सानप यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की वार्ड नंबर सात पूर्णवाद नगर येथील आरोपी निरज वैद्य हा गावठी कट्टा विक्रीच्या उद्देशाने घेवुन फिरत आहे उपविभागीय अधिकारी संदिपं मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि सानप ऐ पी आय संभाजी पाटील पोलीस नाईक गणेश भिंगारदे पोलीस काँन्स्टेबल राहुल नरोडे यांनी मिळालेल्या गुप्त माहीतीच्या अधारे शोध घेतला असता निरज वैद्य हा संशयास्पद फिरताना आढळून आला त्याची अंग झडती घेतली असता त्याचा कमरेला एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस आढळून आले असुन संबधीता विरुध्द आर्म आँक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment