अपक्षामुळे बिघडली नेत्यांची गणीते मतांच्या बेरीज वजाबाकीत सफल झाले गावकरी मंडळ

 बेलापुर ग्रामपंचायत निवडणूक विश्लेषन

बेलापुर ( देविदास देसाई )- नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत रात्रीतुन झालेली युती अमान्य झाल्यामुळे अनेकांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला त्याचा फटका जनता विकास अघाडीला बसल्यामुळे त्यांना केवळ सहाच जागेवर समाधान मानावे लागले  मात्र गावकरी मंडळाने गाव विकासाचा आराखडा जनते सामोर ठेवुन सत्ताधार्यांनी केलेल्या कामाचे वाभाडे सभामधुन काढले ते जनतेला भावले त्यामुळे गावकरी मंडळाला अकरा जागा मिळाल्या                                             प्रभाग क्रमांक एक हा जनता अघाडीचा अभेद्य प्रभाग होता प्रत्येक निवडणूकीत या प्रभागात जनता अघाडीने कुणालाही उमेदवारी दिली तरी तो विजयी होत होता परंतु या निवडणूकीत जनता अघाडीचे नेते रविंद्र खटोड उभे होते परंतु यांवेळी त्यांचीही दमछाक झाली या प्रभागात सलग दोन पंच वार्षिक सदस्य राहीलेल्या शेख शिरीन जावेद यांना पराभव पत्करावा लागला तो ही केवळ ४५ मतांनी त्यात काहींना कोणते बटन दाबावयाचे हे न समजल्यामुळे नोटा बटन दाबले गेले तसेच जनता अघाडीने नाकारल्यामुळे सय्यद बेगम अबुताहेर यांनी अपक्ष निवडणूक लढविली त्यात त्यांना ९० मते मिळाली अपक्ष उमेदवारांचा फटका हा शिरीन शेख यांना बसला व गावकरी मंडळाचा विजय झाला रंजना बोरुडे या ही केवळ २१ मताच्या फराकाने विजयी झाल्या आहेत प्रभाग क्रमांक दोन मध्ये देखील अपक्ष उमेदवार कैलास चायल मुळे चुरशीची लढाई झाली दोन वेळेस सरपंच राहीलेले भरत साळुंके यांचा केवळ ६८ मतांनी विजय झाला गांवकरी मंडळाचे प्रफुल्ल डावरे यांनी जोरदार लढत दिली त्यांना ५५४ मते मिळाली तर अपक्ष असलेले कैलास चायल यांनी ५४१ मते मिळविली तर याच प्रभागात चुकुन उमेदवारी अर्ज राहीलेल्या पवार नंदा अनिल यांचा फटका जनता अघाडीलाच बसला या ठिकाणी गावकरी मंडळाच्या सविता उत्तम आमोलीक ६१ मताच्या फरकाने विजयी झाल्या तर  नंदा पवार यांनी जाहीरपणे जनता अघाडीला पाठींबा दिलेला असतानाही त्यांना ८६ मते मिळाली प्रभाग क्रमांक तीन हा अरुण पा नाईक यांच गड म्हणून ओळखला जात होता या भागातुन कुठल्याही निवडणूकीत अरुण पा नाईक यांना मताधैक्य असायचे परंतु या वेळी नवखा तरुण तडफदार उमेदवार अभिषेक खंडागळे याने ४४० मताच्या फरकाने विजयी झाला अरुण पा नाईक यांचे बंधु चंद्रकांत नाईक यांना ५७८ मते मिळाली तर अपक्ष असणारे शेख नवाज ईलीयास यांना ४५६ मते मिळाली प्रभाग क्रमांक  पाच मध्ये साळवी महेंद्र जगन्नाथ हे २१६ मताच्या फरकाने विजयी झाले या ठिकाणी अपक्ष उमेदवार अच्छेलाल यादव यांना १०७ मते मिळाली सुविध भोसले यांना ६२ मते मिळाली तर नोटा १७ मते मिळाली प्रभाग क्रमांक पाच मध्ये मिना अरविंद साळवी या ५२ मताच्या फरकाने विजयी झाल्या तेथे कविता झीने यांना ९३ मते मिळाली या ठिकाणीही अपक्षामुळे गडबड झाली प्रभाग क्रमांक सहा मध्ये नवखे उमेदवार चंद्रकांत नवले हे १४७ मताच्या फरकाने विजयी झाले या प्रभागात तीन जण अपक्ष उभे होते  प्रकाश पाटणी यांना ६३ अच्छेलाल यादव यांना ६३  राशिनकर राजेंद्र  यांना ५४ मते मिळाली त्यामुळे अपक्ष उमेदवारांनी सर्व उमेदवारांची बेरीज वजाबाकी बिघडवण्याचे काम केले हे ही तितकेच  सत्य आहे.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget